Author: editor desk

नाशिक : वृत्तसंस्था सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नाशिकच्या तत्कालीन आयजी दत्तात्रय कराळे आणि महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तृप्ती देसाई म्हणाल्या की, अशोक खरात हा दत्तात्रय कराळे यांचा गुरू होता, त्यामुळे त्यांनी खरातला पाठिशी घालणे शक्य आहे, परंतु त्यांच्यावर कशी कारवाई होईल? तसेच, त्यांनी भोंदू अशोक खरातच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली. बोलताना सांगितले की, अनेक बडे नेते, आमदार, खासदार, आयएएस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होते आणि त्यांच्यात आर्थिक संबंध देखील होते. “या सर्वांची नावे बाहेर येऊ नयेत म्हणून एकच मार्ग उरतो – खरातला संपवणे,” असे तृप्ती देसाई म्हणाल्या. त्यामुळे अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कालीचरण महाराज यांनी केलेले विधान चर्चेचा विषय बनले आहे. अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या चौकशीसाठी एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणात त्याचे विकृत स्वरूप, महिलांचे लैंगिक शोषण, व्हिडीओ पुरावे आणि त्याच्या नावावर असलेली बेनाम संपत्ती समोर आली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची मागणी केली जात आहे. पत्रकारांशी संवाद साधताना कालीचरण महाराज म्हणाले की, धर्माच्या नावावर पैसे घेणे चुकीचे नाही, परंतु लोकांना ठगणे किंवा कूकर्म करणे हा गुन्हा आहे. “जो लोक कूकर्म करतो, तो नरकात जाईल आणि शासकीय दंडही मिळेल,” असे ते म्हणाले. महाराज पुढे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाला नग्न करून खांबाला बांधून मारहाण केल्याची खळबळजनक घटना भुसावळ तालुक्यात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील तरुण- तरुणीने १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली आणि दोघे जण तरुणाच्या मामाच्या घरी मुक्कामी होते. २० मार्च रोजी तरुणीचे नातेवाइक व इतर १० ते १२ जणांनी तरुणाच्या मामाच्या घरी जाऊन तरुणीला मारहाण करत पळवून नेले. यानंतर संशयितांनी तरुणास…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  तालुक्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ९१ हजार रुपये किंमतीचा १३ किलो २५४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर ते चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर बोर अजंटी शिवारात बापु नरसिंग बारेला यांच्या शेताजवळ संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. या वेळी इम्रान रहेमान पठाण (वय २१), रहेमान निहामत पठाण (वय ५९) आणि अतिक रफिक शेख (वय ४५) हे तिघे गांजाची तस्करी करताना पोलिसांच्या तावडीत सापडले. तिन्ही आरोपी हे परतूर तालुक्यातील सातोना खुर्द येथील…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  आई-वडीलांसह घरातील सदस्यांना नाहक त्रास देत असल्याच्या संतपातून मोठ्या भावाकडून लहान भाऊ रोहन पानाचंद पाटील (वय २३, रा. नारोद, ता. चोपडा) याची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखविताच संशयित किरण पानाचंद पाटील (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील नारद येथील रहिवासी असलेला रोहन पाटील हा दि. २१ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नारोद येथील गूळ नदी पात्रात संशयास्पद स्थितीत मृत अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आला. यात मयत रोहन च्या डोक्याला, गळ्याला तसेच पायाला दुखापत झाल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी सदर घटना नारोद-खरदचे पोलीस पाटील विजय पाटील यांना…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  मोबाइल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीकडून तब्बल १७० लिटर चोरीचे डिझेल जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव तालुक्यातील तरसोद येथील आसोदा रोडवरील जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवरवर ही घटना घडली होती. १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्याने टॉवरच्या जनरेटरचे नुकसान करून सुमारे १५ हजार ९३४ रुपयांचे १७० लिटर डिझेल लंपास केले होते. याप्रकरणी कंपनीचे सुपरवायझर विजय नगराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक फौजदार राजेश मेंढे यांच्या पथकाने घटनास्थळावरील टॉवर डेटा, सीडीआर आणि एसआरडीच्या माध्यमातून तांत्रिक पुरावे गोळा केले.…

Read More

आजचे राशीभविष्य दि.२२  मार्च २०२६ मेष राशी आज ऑफीसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा केली होईल. तुम्ही समाजकार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. मुलांनी आज अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, तरच यश मिळेल . वृषभ राशी आज तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एका धार्मिक स्थळाला भेट द्याल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखाल. नातेवाईकांसोबतचा तुमचा संवाद वाढेल. तुम्ही एक नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्सुक असाल. मिथुन राशी आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, ज्या तुम्ही नीट पार पाडाल. काही वैयक्तिक बाबींबद्दल तुम्ही थोडे भावुक होऊ शकता. आज शिक्षक एका सभेसाठी उपस्थित…

Read More

विकासकामांचा धडाका — रस्ते, काँक्रिटीकरण व इतर कामांचेही लोकार्पण व भूमिपूजन जळगाव   : प्रतिनिधी  दोन वर्षांपूर्वी नंदगाव-फेसर्डी परिसरातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे.” त्यांनी मागील काळातील आपल्या आंदोलनाच्या दिवसांची आठवण करून देत सांगितले की, “पूर्वी शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मर व वीज उपकेंद्राच्या प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन केले. आज त्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढत आहोत.” शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज आणि रस्ता या तीन मूलभूत गरजा अत्यंत महत्त्वाच्या असून त्यासाठी शासन सातत्याने काम करत आहे. मतदारसंघात तसेच जिल्ह्यात वीज समस्या दूर करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्रे व इतर सुविधा मोठ्या प्रमाणावर मंजूर करण्यात आल्या आहेत. जळगाव – धरणगाव तालुक्यात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्याचे राजकारण भलतेच ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कठोर टीका केली आहे. त्यांनी रुपाली चाकणकर यांचे राजीनामा देण्याचे स्वरूप ‘मॉडेलसारखे’ असल्याचा आणि त्यांच्या वक्तव्यांमध्ये विनम्रतेऐवजी अहंकार असल्याचा आरोप केला. अंजली दमानिया म्हणाल्या, “महिला आयोग हे न्याय देणारे संस्था असायला हवे. मात्र, रुपाली चाकणकर यांनी आयोगाच्या अध्यक्षपदी असताना भोंदू अशोक खरातसारख्या व्यक्तीला आधार दिला. त्यांनी या प्रकरणातील काही केसेस दाबल्या असण्याची शक्यता आहे.” त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. तसेच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी लावून धरली होती. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकरांनी राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. तसेच वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या…

Read More