छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्ग अपघातांमुळे नेहमीच चर्चेत येत असतांना पुन्हा एकदा या महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच आहे. कंटेनरला कारने जोरदार धडक दिल्याचं समोर आलं आहे. समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने धडक दिल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने धडक दिली. समृद्धी महामार्गावर हडस पिपंळगाव जवळील टोल नाक्याजवळ हा अपघात झाला आहे. परंतु, सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. घटनास्थळी मदत कार्यासाठी नागरिक धावून आले होते. समृद्धी महामार्ग नेहमी अपघात होत असल्याचं समोर आलं आहे. मागील महिन्यात छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी पक्ष संघटनेत काम करत असताना अनेकांना संध्या द्याव्या लागतात तर अनेकदा थांबावे लागते. कामाचे मूल्यमापन करून पक्ष नवीन संधी व जबाबदाऱ्या देत असतो. हरिभाऊ जावळे, ए.टी.नाना, स्मिताताई वाघ यांच्यासारखी अनेक उदाहरणे आपल्या जिल्ह्यातील देता येतील, त्यांना पुढे पक्षाने दुसऱ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र एक संधी नाकारताच पक्ष सोडून जाने म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व आपल्याला मत देणाऱ्या जनतेची फसवणूक करणे आहे. त्यामुळे येणारा काही दिवसातच त्यांना त्यांची जागा कळेल. लोकांचा विश्वास मोदिजींवर आहे, त्यांनी केलेल्या विकासकामांवर आहे, त्यांच्या विकसित भारताच्या संकल्पावर आहे. गेल्या १० वर्षात रेल्वे, हायवे, सिंचन सुविधा यात झालेला आमुलाग्र बदल जनते समोर आहे तसेच जळगाव जिल्हा…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पारोळा तालुक्यातील एका गावातील महिलेला गेल्या दोन महिन्यापूर्वी समाधान रमेश पाटील याने छोटा सॅमसंग कंपनीचा मोबाईल वापरण्याकरीता दिला होता. त्यावर तो नेहमी महिलेशी बळजबरी संभाषण करत असे. तर ४ रोजी शेतात जात असताना या महिलेचा हात धरून त्याने शरीर सुखाची मागणी केली. यास महिलेने नकार दिला असता, त्याने महिलेचे काढलेले फोटो गावात व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी आज पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : प्रतिनिधी एकाच परिसरातून वेळोवेळी १५ बकऱ्या चोरणाऱ्या सरफराज उर्फ सोनू सईद खान या रिक्षाचालकासह त्याची पत्नी मजीना सरफराज खान या दोघाना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. बकऱ्या चोरीसाठी वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातून बकऱ्या चोरी होण्याचे प्रमाण वाढून एका पाठोपाठ १५ बकऱ्या चोरीला गेल्या या संदर्भात इंदुबाई रामा माळी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना बकऱ्यांची चोरी सरफराज खान व त्याची पत्नी मजीना खान यांनी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोउनि दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहायक…
जळगाव : प्रतिनिधी शेतातून मोटर बंद करून मित्रासोबत घरी पायी जात असताना भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे किशोर दयाराम चव्हाण (५५, रा. भोकर, ता. जळगाव) हा शेतकरी ठार झाला. हा अपघात गुरुवार, ४ एप्रिल रोजी रात्री जळगाव ते चोपडा रस्त्यावर भोकर गावाजवळील एका नर्सरीनजीक झाला. याप्रकरणी शुक्रवार, ५ एप्रिल रोजी तालुका पोलिस ठाण्यात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील भोकर येथील किशोर चव्हाण यांचे गावानजीक शेत आहे. गुरुवार, ४ एप्रिल रोजी शेतातून पाण्याची मोटर बंद करून त्यांचे मित्र नीलेश शंकर गिरनारे यांच्यासोबत जळगाव ते चोपडा रस्त्यावरून घरी जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमपी ६८…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आ.एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता आमदार खडसे यांनी आपण लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे शनिवारी बोलताना सांगितले. हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे हे खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्ली येथे गेले होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्यावेळी खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. मात्र, त्यास खडसेंनी नकार दिला. आता मात्र त्यांनी स्वतःच भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले. गौणखनिजप्रकरणी एकनाथ खडसे व कुटुंबाला १३७ कोटींचा दंड ठोठावला होता. नुकताच हा निर्णय शासनाने रद्द केला.…
मेष : भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु, यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यत्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकतात. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर…
नंदुरबार : वृत्तसंस्था धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या या पुलावरूल दोन तरुणांनी उडी घेतल्याने गावात विविध चर्चा सुरू आहेत. सारंगखेडा येथील तापी पुलावरून एकाच दिवशी दोन तरुणांनी नदी पात्रात उडी टाकत आपलं जीवन संपवलं आहे. दोन वेगवेगळ्या घटना आहेत मात्र एकाच जागेवरून या दोन तरुणांनी तापी नदी पुलावरून उडी टाकल्याने एकच खळबळ माजली आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनची पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केलेली होती. सारंगखेडा येथील तापी पूल आता सुसाईड पॉईंट झाल्याची चर्चा रंगू लागले आहे. हे दोन्ही तरुण कोण आहेत त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील नाहाटा चौफुली परिसरात राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेला धमकी व मारहाण करून वेळीवेळी अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नाहाटा चौफुली परिसरात ३७ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्या एका खासगी प्रशिक्षण केंद्रात नोकरीला आहे. दरम्यान, १४ जानेवारी २०२३ ते ९ जानेवारी २०२४ दरम्यान संशयित आरोपी रविंद्र गोलांडे रा. चोरवड ता. भुसावळ याने महिला एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिचा अश्लिल शिवीगाळ व मारहाण करत…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील विप्रो पुल ते बोरी नदी पुलाच्या दरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने तांबेपुरा येथील २४ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निखिल श्याम पाटील वय २४ रा. तांबेपुरा अमळनेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात निखिल पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. निखिल पाटील हा सुरत येथून अमळनेर येथे येण्यासाठी सुरत भूसावळ पॅसेंजरने येण्यासाठी गुरूवारी ४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता रेल्वेत सुरत येथून बसला होता. शुक्रवारी…

