जळगाव : प्रतिनिधी जळगावहून धरणगावकडे जाणाऱ्या धावत्या कारचा स्टिअरिंग रॉड अचानक तुटल्याने ती झाडाला धडकली. या अपघातात कार चालक ठार तर एक जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुसळी गावाजवळ घडली. सविस्तर वृत्त असे कि, शरद पाटील (वय २५, रा.सारवे) असे मृत झालेल्या चालकाचे तर सुरेश अशोक अहिरे (वय ४०, रा. सारवे) हे जखमी झाले आहे. ते दोघे गुरुवारी दुपारी जळगावहून धरणगावकडे कार (क्रमांक एमएच- ०९, डीएक्स- ८९९१) ने जात होते. मुसळी गावाजवळ गाडीचा स्टिअरिंग रॉड अचानक तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार झाडाला धडक देऊन रस्त्याचे बाजूला शेतात घुसली. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 7 खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला असून शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे महायुतीच्या विशेषतः शिंदेंच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे हे नाराज खासदार स्वगृही म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत परतण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. त्यात विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त दावा केल्यामुळे या चर्चेला चांगलीच हवा मिळाली आहे. शिंदेंच्या 7 खासदारांची काय गत झाली? उद्धव ठाकरे भेटत नसल्याची ओरड करणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही. त्यांचे निम्मे…
धरणगाव : प्रतिनिधी तांब्याची तार चोरल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी गोरगावले (ता. चोपडा) येथील एकाला अटक केली असून, त्याच्यावर अमळनेर व चोपडा येथे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. मिळालेल्या माहितीनुसार, तांब्याची तार चोरल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरु असताना धरणगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून संशयित आरोपी प्रशांत जगन वार्डे (२९) याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ४.५ किलो तांब्याची तार हस्तगत केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्यावर चोपडा तसेच अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीचा शोध घेण्याकामी पोकॉ प्रवीण पाटील, चंदन पाटील…
यावल : प्रतिनिधी नंदुरबारहून भुसावळ येथे अवैध वाळू नेणारा ट्रॉला यावल तालुक्यातील किनगावजवळ यावलच्या महसूल पथकाने पकडला. ही कारवाई ४ रोजी मध्यरात्री करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२:३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील अंकलेश्वर- बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावर साडेसहा ब्रास अवैध वाळू वाहकरताना हा ट्रॉला किनगावजवळ साकळी मंडळाधिकारी व तलाठी यांनी पकडून यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखा यांनी नंदुरबार येथून भुसावळ येथे वाळू वाहतुकीचा दिलेला चालकाजवळील परवाना पाहिला असता वाळू वाहतूक परवान्याची मुदत वेळ बुधवारी, ३ रोजी सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत होती. परवान्यात नमूद वेळेव्यतिरिक्त अवैधपणे वाहतूक करताना ट्रॉला (एमएच १५ एमएम ६०६०) आढळल्याने हा…
जळगाव : प्रतिनिधी गुरे वाहतुक करण्याचा कुठलाही परवाना नसतांना एका वाहनात तब्बल १७ म्हशी कोंबून त्यांची निर्दयीपणे वाहतुक करणारे वाहन नशिराबाद पोलिसांनी टोल प्लाझा रोडवर पकडले. ही घटना दि. ३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी हरफान हिरू खान रा. देवास, इसाक रुस्तम रा. सारबेडे बु. हबीज हुसना रा. देवास यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल प्लाझाजवळील रोडवर दि. ३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास (एमएच १८, बीजी ७२१२) क्रमांकाच्या आयशर वाहनात सुमारे १७ म्हशींची निर्दयीपणे वाहतुक करीत होते. दरम्यान, नशिराबाद पोलिसांच्या पथकाने हे वाहन अडवून तपासणी केल्यानंतर म्हशी वाहतुक करतांना वाहनात मॅटींग…
जळगाव : प्रतिनिधी सोनसाळखी चोरी करणारे चोरटे हे मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील जुलवानिया येथे असल्याची माहिती मिळाली. पथक दोन दिवस वेशांतर करुन त्याठिकाणी सापळा रचला. त्यानंतर पाच गुन्ह्यात फरार असलेल्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी बुधवार दि. ३ एप्रिल रोजी इराणी वस्तीतून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देला जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गायत्री नगरात पायी जात असलेल्या सुलोचना वसंत खैरनार (वय ६०) या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाळची दुचाकीवरुन आलेल्यांनी लांबवल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथकाकडून तांत्रिक विश्लेषणासह माहिती गोळा केली जात होती.…
जळगाव : प्रतिनिधी बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या काकांना तरुण रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेला होता. तेथून घरी परत जात असतांना त्याच्या दुचाकीचा अपघात होवून प्रणव प्रशांत कुदळे (वय २२, रा. तुळजाई नगर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ घडली. एकुलत्या एक मुलावर दुर्देवी काळाने झडप घातल्याने त्याच्या कुटुंबियांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात असलेल्या तुळजाई नगरात प्रणव कुदळे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. वडीलांसोबत तो शहरात बॅनर लावून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. चार दिवसांपुर्वी त्याच्या बहिणे लग्न झाले आहे. तसेच त्याचे काका राहुल कुदळे हे त्याच्या बहिणीला…
जळगाव : प्रतीनिधी शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत वैद्यकीय व्यवसायिक पंकज विश्वासराव पाटील (वय ४४, रा. निंबोल, ता. जळगाव) यांची १९ लाख चार हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक केली. त्यामुळे वैद्यकीय व्यवसायीकाला शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक पडणे चांगलेच महागात पडले. ही घटना दि. १९ डिसेंबर २०२३ ते दि. २ फेब्रुवारी रोजी दरम्यान घडली. याप्रकरणी दि. ३ एप्रिल रोजी सायबर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील निंबोल येथे पंकज पाटील हे वास्तव्यास असून त्यांचा वैद्यकीय व शेती व्यवसाय आहे. दि. १९ डिसेंबर २०२३ ते दि. २ फेब्रुवारी या दरम्यान व्हाटसअॅप ग्रुप व फेसबुकवरील अनोळखी लिंकद्वारे…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. कौटुंबिक सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. विद्यार्थी आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला तुमच्या दिनचर्येत काही बदल करावे लागतील. ऑफिसमध्ये काही खास लोकांशी काही महत्त्वाच्या विषयावर बोलण्याची संधी मिळेल, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. आज तुमचे विरोधकही तुमच्या कामाचे कौतुक करतील. आज तुम्ही तुमच्या बुद्धीने सर्व कामे हाताळाल. काम करणाऱ्या लोकांना सहकाऱ्यांची मदत मिळेल त्यामुळे त्यांची कामे लवकर पूर्ण होतील. आज तुम्हाला व्यवसायासाठी राज्याबाहेर जावे लागेल. या राशीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेबद्दल जागरूकता निर्माण होईल. आज तुम्हाला गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. अचानक आर्थिक लाभामुळे आज…
नंदुरबार : वृत्तसंस्था राज्यात उन्हाळा कहर सुरु असतांना यात हंगामी फळ म्हणून आंबा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यांची आवक होत असून मागणी देखील मोठी असते. दरम्यान, यंदा वातावरण बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहरात असताना ढगाळ वातावरण, वारा, पाऊस यामुळे मोहोर गळून पडला. त्यामुळे कैरी उत्पादनात घट होणार आहे. परिणामी कच्च्या कैरीपासून तयार होणाऱ्या आमचूर उत्पादनावर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधव कैरीपासून तयार होणाऱ्या आमचूर उत्पादनासाठी तयारी करत आहेत. परंतु यंदा निसर्गाने मोहोरवर अवकृपा दर्शवल्याने कैरी उत्पादन दीड महिना लांबवणीवर पडले आहे. सातपुड्यातील पहिला मोहोर आल्यानंतर लागलीच हवामान दोन…

