मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा शिवारात ३५ वर्षीय महिलेचा खून करण्यात आल्याची माहिती सामोर आली आहे. महिलेच्या डोक्यात दगड टाकून, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करीत तिची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, महालखेडा येथील रहिवासी मालताबाई मनोज खाडे ( वय अंदाजे ३७ ) या आपल्या शेतात काम करण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या शेतातील काम आटोपून घरी येत होत्या. दरम्यान, शिवारातच कुणी तरी अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून त्यांचा खून करून पलायन केले. मालताबाई घरी न आल्यामुळे कुटुंबिय शेताकडे गेले असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान,…
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रहिवासी व पुण्यातील कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाचा मित्रांसोबत दिव-दमणला गेल्यानंतर किरकोळ वादातून खून करण्यात आल्याची घटना बुधवार, 3 रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी संशयीत आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेत धीरज अरुण जाधव (32) या तरुणाचा मृत्यू ओढवला. मयत तरुणावर गुरुवारी रात्री भुसावळात अंत्यसंस्कार करण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळच्या नारायण नगरात पोलीस दलातील निवृत्त सहायक फौजदार अरुण जाधव हे परिवारासह वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा धीरज हा पुण्यात अभियंता म्हणून कार्यरत आहे. सुटीनिमित्त तो भुसावळात आल्यानंतर मंगळवारी कारने येथून दिव दमणला चुलत भाऊ भूषण व अविनाश जाधव व अन्य दोन मित्रांसोबत…
पुणे : वृत्तसंस्था खडक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने लोहियानगर पोलीस चौकीत बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भरत अस्मार असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. भरत अस्मार खडक पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. मिळालेल्या माहितीनुसार, लोहियानगर पोलीस चौकीत ते गुरुवारी रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. मध्यरात्री ते आराम करण्यासाठी पोलीस चौकीतील खोलीत गेले. पहाटेच्या सुमारास त्यांनी बंदुकीतून स्वतःवर चार गोळ्या झाडून आत्महत्या केली. पोलीस चौकीत गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अस्मार यांच्या आत्महत्येमागचे कारण…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांत चारजणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) मधील एका जवानाचाही समावेश आहे. सविस्तर वृत्त असे कि, वीस वर्षीय तरुणीचे मार्च २३ ते १८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान अपहरण करण्यात आले. तिला छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणात स्वतः तरुणी समोर आल्याने हा प्रकार पोलिसांसमोर आला. मंगला कर उर्फ सुदाम संभाजी कोळी (३०) राहुल सुनील चौधरी सतीश रघुनाथ नाईक उर्फ…
अमळनेर : प्रतिनिधी नगरपालिकेच्या शेजारी खेळण्यांच्या एका दुकानाला आग लागून सुमारे ९ लाखांचे नुकसान झाल्याची घटना ४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील संदीप राजेंद्र पाटील यांचे शिवसागर गिफ्ट सेंटर या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घटना कळताच आजूबाजूचे दुकानदार आग विझवण्यासाठी धावले. आपआपल्या परीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन बंब बोलावण्यात आला अग्निशमन प्रमुख दिनेश बिन्हाडे, फारुख शेख फायरमन आनंदा झिंबल, मच्छिंद्र चौधरी, भिका संदांनशिव यांच्यासह नागरिकांनी आग विझवली. मात्र दुकानात मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने आतमध्ये प्रवेश करणेही अवघड होते. दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, कॅमेरा सेट अप, भेटवस्तू असा सर्व एकूण ९…
जळगावः प्रातिनिधी राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना जळगाव जिल्ह्यात अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता राजकीय चर्चेला उधान आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात शुक्रवारी रात्री आठ वाजता एमआयडीसीतील एका हॉटेलमधील खोलीत १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. उभय नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नाही; परंतु त्याला लोकसभा निवडणुकीची किनार असल्याचे सांगितले जात आहे. जळगाव व रावेर हे दोन्ही मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेले आहेत. स्थानिक पातळीवर असलेल्या शिंदेसेनेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि महाजन यांच्यातील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे धुळे येथील एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी जळगाव विमानतळावर आले होते. तेथून ते…
धुळे : प्रतिनिधी पाइप विक्री करण्याच्या बहाण्याने जळगाव येथील एका व्यापाऱ्याला साक्री तालुक्यातील हट्टी शिवारात बोलावून त्याला मारहाण करीत त्याच्याजवळील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा एकूण ३ लाख १६ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३१ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिसांत ४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, व्यापारी जावेद आबीद देशमुख (वय ४८, रा. रजा कॉलनी, मेहरूण जळगाव) यांनी निजामपूर पोलिसात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, पाईप विक्री करण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी हट्टी खुर्द येथे बोलावून आरापाना येथे पोहोचल्यावर संशयितांनी त्या…
मेष आजचा दिवस आनंद घेऊन आला आहे. तुमची सकारात्मक विचारसरणी तुम्ही अर्थपूर्ण कामात वापरली तर तुमची सर्जनशील प्रतिभा सर्वांसमोर येईल. लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल. आज घरातील एखादी गोष्ट दुरुस्त करावी लागेल. महिलांना घरातील कामातून दिलासा मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आज तुमचे सहकारी आणि नोकरीतील वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश होतील आणि तुमची प्रशंसा करतील. आज तुम्हाला तुमच्या कामानुसार फळ मिळेल. तुम्हाला जे मोठे ध्येय गाठायचे आहे त्याच्याशी संबंधित मार्ग तुम्हाला सापडेल. अंतिम परिणाम आपल्या कामावर अवलंबून असेल. कुटुंबातील वाद त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करा. वेळेचा योग्य वापर करून काम…
नाशिक : वृत्तसंस्था नाशिक जवळ एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी तालुक्यत भरधाव वाहन झाडावर आदळून अपघाताची घटना घडली. दिंडोरी रोडवर ढकांबेगावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ५ ते ६ जण ठार झाल्याची माहिती समजत आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातात तब्बल 5 जण ठार, तर 3 जण गंभीर जखमी झालेत. अपघातग्रस्त कारमधील नागरीक सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतत होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाचा घाला घातला. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा…
कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना अशाच एका घटनेने कोल्हापूर शहर हादरले आहे. साखरपुडा झाल्यानंतर मित्रासोबतच लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट धरणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा आई, भाऊ व मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या तिघांविरोधातही खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे कोल्हापूर व पंचक्रोशीत एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (24) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एका बँकेत नोकरीला होती. तिच्या लाघवी स्वभावामुळे तिचा मोठा मित्र परिवार होता. वैष्णवी कोल्हापूरमधीलच एका ढोल ताशा पथकाची सदस्याही होती. पण तिने मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट्…

