• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुक्ताई-चांगदेव मंदिरावर आ.एकनाथराव खडसे, रोहिणी खडसेतर्फे हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

editor desk by editor desk
March 9, 2024
in मुक्ताईनगर, राजकारण, राज्य, सामाजिक
0
मुक्ताई-चांगदेव मंदिरावर आ.एकनाथराव खडसे, रोहिणी खडसेतर्फे हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

मुक्ताईनगर : वृत्तसंस्था

श्री संत मुक्ताई ह्या खानदेश, विदर्भ, मराठवाडा ,मध्यप्रदेशातील लाखो वारकरी भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत भागवत एकादशी आणि महाशिवरात्रीला या परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो मैल पायदळ चालून दिंड्यांसह लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला येत असतात. त्यानिमित्ताने श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर, मेहुण आणि चांगदेव येथे यात्रा उत्सव भरला जातो सध्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली असून लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी मुक्ताईनगर चांगदेव येथे दाखल झालेले आहेत त्यामुळे टाळ मृदुंगाचा गजर आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष भजन कीर्तनात सर्व परिसर निनादुन गेला आहे.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधुन माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या तर्फे आदिशक्ती मुक्ताई आणि योगिराज चांगदेव यांच्या पद स्पर्शाने पावन कोथळी,मेहुण,चांगदेव, मुक्ताईनगर या पावन तिर्थक्षेत्रांवर हेलिकॉप्टर मधुन पुष्पवृष्टी करण्यात आली.

रोहिणी खडसे यांनी हेलिकॉप्टर मधून आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान स्थळ कोथळी ,योगिराज चांगदेव मंदिर चांगदेव , आदिशक्ती मुक्ताई मंदिर मेहुण ,नविन आदिशक्ती मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर या तिर्थ स्थानांवर पुष्पवृष्टी केली यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान स्थळ श्री क्षेत्र कोथळी, आदिशक्ती मुक्ताई मंदिर श्री क्षेत्र तापीतीर मेहुण, योगिराज चांगदेव मंदिर श्री क्षेत्र चांगदेव , आदिशक्ती मुक्ताई मंदिर श्री क्षेत्र मुक्ताईनगर या पावन तिर्थ स्थानांवर हेलिकॉप्टर मधुन पुष्यवृष्टी करून आदिशक्ती मुक्ताई ,योगिराज चांगदेव यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले.

हेलिकॉप्टर मधुन पुष्पवृष्टी करताना टाळ मृदुंगाच्या गजरात आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषात भक्ती आणि श्रद्धेचा निस्सीम आनंद देणारा भरलेला वैष्णवांचा मेळा याची देही याची डोळा साठवता आला. यात्रोत्सवा निमित्त प्रथमच मुक्ताई, चांगदेव मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. उपस्थित वारकरी भाविक भक्तांमध्ये हा नयनरम्य सोहळा कुतूहल आणि औत्सुक्याचा विषय ठरला.

Previous Post

बापरे : शेतीसाठी त्याने घेतला आईचा जीव

Next Post

धक्कादायक : पोलीस कोठडीतील संशयिताने घेतला गळफास

Next Post
३० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

धक्कादायक : पोलीस कोठडीतील संशयिताने घेतला गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group