Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वे रुळावर आढळले पोलीस अधिकाऱ्याचे दोन तुकडे
    क्राईम

    रेल्वे रुळावर आढळले पोलीस अधिकाऱ्याचे दोन तुकडे

    editor deskBy editor deskMarch 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    राज्यात गेल्या काही महिन्यापासून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना घडत आहे. आता नुकतेच एका अधिकाऱ्याने जीवन संपविल्याची माहिती समोर येत आहे. सुभाष दुधाळ असे मयताचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बीड पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी परळी रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर मयताच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याचे पहायला मिळाले. रात्री घटना केव्हा घडली याबाबत माहित नसून सात वाजता पोलिसांना स्टेशन मास्तरने सांगितल्यानंतर मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला आहे. परळी येथील घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

    महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गेल्या महिनाभरात तीन अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. नाशिक येथे पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन, उल्हासनगर येथे सहाय्यक निरीक्षकाने गळफास घेत जीवन संपविले होते. पोलीस दलातील घटनेने समाजमन सुन्न झाले असून पोलिसांचे मानसिक समुपदेशन करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप मंत्र्यांच्या वक्तव्याने राज्यात तापलं राजकारण : सर्वच पक्ष देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात

    December 5, 2025

    महायुती सरकारवर वडेट्टीवारांचा हल्ला : “जनतेच्या पदरी वर्षभर निराशाच”

    December 5, 2025

    सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय : २१ डिसेंबरलाच निकाल होणार जाहीर !

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.