मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या कामाची पद्धत बदलून व्यवस्थित राहिल्यास तुमचे काम लवकर पूर्ण होईल. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरच्या समस्या अनुभवी आणि जाणकार व्यक्तीच्या मदतीने सोडवाल. काही प्रतिकूल परिस्थितीही निर्माण होईल. आज कोणाशी वाद झाल्यास रागावर नियंत्रण ठेवा. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. कोणताही छोटा-मोठा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. विद्यार्थ्यांनी आपला मौल्यवान वेळ सोशल मीडियावर वाया घालवू नये.जर तुम्ही तुमची मेहनत चालू ठेवली तर तुम्हाला लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. मिथुन आज तुम्हाला लोकांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कार्यालयीन कामकाज…
Author: editor desk
चंद्रपूर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरात सभा पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकसभा 2024 ची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता याच्यामधली आहे. एकीकडे भाजपप्रणित एनडीए आहे. या एनडीएचं ध्येय हे देशासाठी मोठे निर्णय घेण्याचं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, त्यांचा मंत्र आहे की, जिथे सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खावी. इंडिया आघाडी नेहमी देशाला अस्थितरतेकडे नेलं आहे. एका स्थिर सरकारची आवश्यकता किती आहे…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे. या सभेच्या निमित्ताने प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. मोदीजी यांच्या सभेने सर्व वातावरण बदलते आहे. आज विदर्भात भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला अनुकूल परिस्थिती आहे. मात्र मोदींच्या सभेने महायुतीची अनुकूलता अधिक मोठ्या विजयात परावर्तित होईल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. चंद्रपूरनंतर रामटेक मध्ये देखील 10 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभांनी पूर्ण विदर्भातील वातावरण ढवळून निघेल, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहेत, या…
नागपूर : वृत्तसंस्था मानकापूर परिसरात भरधाव ट्रकने 12 गाड्यांना धडक दिली आहे. रविवारी रात्री कंटेनरने सिग्नलवर उभ्या असलेल्या डझनाहून अधिक कार-दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होतील की अनेक कारचा चेंदामेंदा झाला व एक कार तर थेट दुसऱ्या कारवरच चढली. या अपघातात 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते. मिळालेल्या माहितीनुसार, धडक दिलेल्या वाहनांमध्ये 9 कार, एक रुग्णवाहिका आणि दोन दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या धडकेत सुमारे पाच ते सहापेक्षा जास्त कारचे नुकसान झाले आहे. अनेक कारचा अक्षरशः चुराडा झाला. दरम्यान, कारमधील अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.…
जळगाव : प्रतिनिधी शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षाची विद्यार्थिनी करुणा संतोष बोदडे (२२, रा. वढोदा ता. यावल, ह.मु.दीक्षितवाडी, जळगाव) हिने राहत्या खोलीमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. मैत्रिणी गावाकडे गेलेल्या असल्याने खोलीत एकटी असतानाच करुणाने हा टोकाचा निर्णय घेतला. ही धक्कादायक घटना रविवार, ७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळची यावल तालुक्यातील वढोदा येथील रहिवासी असलेली करुणा बोदडे ही विद्यार्थिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयात (नर्सिंग) पदव्युत्तरचे (जीएनएम) शिक्षण घेत होती. ती अन्य तीन…
वरणगाव : प्रतिनिधी पिंपळगाव बुद्रूक येथील एका वाड्यामध्ये रविवारी सायंकाळी पत्ता जुगार खेळताना आठ जण आढळले. या सर्वांवर वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पीएसआय गणेश देशमुख, पो.कॉ. प्रमोद कंखरे, प्रशांत ठाकूर, विजय बावस्कर यांचे पथक गस्त घालत असताना, त्यांना काही जण जुगार खेळताना आढळले. आरोपींमध्ये सुपड्डू बावस्कर (४१), समाधान चव्हाण (४५), प्रकाश बावस्कर (४०), गोकुळ (४५), विनोद चव्हाण (४५), शुभम तळेले (३२), अर्जुन बेंडाळे (४५), ज्ञानदेव मावळे (६०), सुरेश सुरवाडे (३०) यांचा समावेश आहे. यावेळी आरोपींकडून ७८३० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याबाबतची फिर्याद पो.हे.कॉ. प्रशांत ठाकूर यांनी दिल्यावरुन वरणगाव पोलिसात गुन्हा…
जळगाव : प्रतिनिधी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत राहुल ताराचंद गुरव याने पत्नी ममता गुरव यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास चौघुले प्लॉट परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून राहला गुरव यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चौघुले प्लॉट परिसरातील ममता राहुल गुरव या विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचे पती काहीही कामधंदा करीत नसल्याने विवाहिता एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. विवाहितेचा पती हा वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत असून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण देखील करीत होता. दि. ५ एप्रिल…
वरणगाव : प्रतिनिधी वरणगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावरील कर्मचाऱ्यालाच शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. ही घटना शनिवार, दि ६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी रात्री ११ वाजता तीन जणांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये दि ६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी योगेश पाटील हे कर्तव्यावर असताना भुसावळ तालुक्यातील फुलगावातील महेंद्र काशीनाथ पाटील, राहुल काशीनाथ पाटील आणि ज्योती काशीनाथ पाटील हे पोलीस ठाण्यात आले. पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांनी राहुल पाटील यांना विचारपूस केल्यानंतर त्यांना राग आल्याने तिघांनी पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांना शिवीगाळ करत…
जळगाव : प्रतिनिधी कामानिमित्त बाहेर जातो सांगत घरातून बाहेर पडलेल्या भगवान मणिलाल चौधरी (वय २६, रा. वडनगरी, ता. जळगाव) या तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार दि. ७ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शहरातील समृद्धी अपार्टमेंटसमोर घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे भगवान चौधरी हा तरुण कुटुंबियांसह वासतव्यास होता. दोन्ही पायांनी दिव्यांग असतांना देखील तो टेन्ट हाऊस चालवून आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता. शनिवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता तो कामानिमित्ता जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. रविवारी ७…
मेष आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकत्र प्रवास करण्याचा विचार करू शकता. तुमचा जोडीदार तुम्हाला चांगल्या घरात राहण्याच्या नियोजनात खूप मदत करू शकतो. पण, तुमचा मूड बदलण्यासाठी आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी तुमचा दिनक्रम बदलण्यासाठी तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी किंवा साहसी सहलीची योजना करू शकता. वृषभ तुम्ही वेगळ्या संस्कृतीतील किंवा दुसऱ्या देशाच्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. तुम्हाला या व्यक्तीबद्दल खूप उत्सुकता आणि भावनिक वाटेल. जेव्हा तुम्ही या माणसासोबत असता तेव्हा तुम्हाला बाकीच्या जगाची काळजी नसते. देवाची इच्छा असेल तर हे नाते लवकरच आकार घेऊ शकते. मिथुन गेल्या काही काळापासून तुमच्या नात्यात तणाव आहे आणि त्याचा परिणाम बाहेरूनही दिसू शकतो.…

