Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा मंगळवारी सकाळच्या सुमारास मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या संशयावरून त्याला परिसरातील चौघांनी असोदा शिवारात घेऊन जात बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-35) असे मयताचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-35) या तरुणाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चोरी केल्याचा शेजाऱ्यांना संशय होता. मंगळवारी सकाळी चौघे दुचाकीवर बसवून ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन गेले. दुपारी 2 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याचा मृतदेह असोदा शिवारात आढळला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गुजरात केडरचे 2004 बॅचचे IAS अधिकारी राहुल बाबुलालभाई गुप्ता यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी 2004 च्या बॅचचे IAS अधिकारी अशोक कुमार मीना सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रियंका मीना ( आय.पी. एस ) यांची जळगाव जिल्ह्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या निरीक्षक म्हणून त्या काम पाहतील. राहुल गुप्ता हे गुजरात औद्योगिक विकास महामंडळाचे (GIDC) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी गुजरातमधील राजकोटचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले होते. आनंद, नर्मदा,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी भाजपने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवालय कार्यालयात पार पडत आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तसेच इतर घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमधून शिवसेना – 21, काँग्रेस – 17, राष्ट्रवादी – 10 असा फॉर्म्युला फिक्स करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे संपूर्ण जागा वाटप… काँग्रेसच्या जागा: नंदुरबार, धुळे, अकोला,अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया ,गडचिरोली चिमूर,चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर , रामटेक, उत्तर मुंबई अशा…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करण्यासाठी अनेक ठिकाणी जाहीर सभाच धुमाकूळ सुरु झाला असून त्यात राज्यात गेल्या काही वर्षापासून सुरु असलेल्या मराठा समजाच्या आंदोलनावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी आता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. जरांगे पाटील सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह महाविकास आघाडी आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणुकीला उभे राहून स्वतः मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा भुजबळांचा धंदा आहे अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच आता राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला आम्ही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतात ट्रॅक्टर चालवून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या हर्षल विश्वनाथ चौधरी (वय २३, रा. गढोदा, ता. जळगाव) या तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील गाढोदा येथे हर्षल चौधरी हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. गावात ट्रॅक्टर चालवून तो आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता, सोमवार दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास हर्षल याने देवगाव ते किनोद रस्त्यावरील मंगल पाटील यांच्या शेतातील झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना जळगाव लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीने नाव जाहीर केल्यानंतर भाजपाच्या उमेदवार बदलीची चर्चा सुरु असतांना आता रावेर मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. उद्योजक श्रीराम पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले श्रीराम उद्योग समूहाचे चेअरमन तथा प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम पाटील हे १४ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर आज शरद पवार गटातर्फे रावेर लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यात येणार असून त्यांचे नाव रावेर…

Read More

रावेर : प्रतिनिधी निंबोल येथील श्रीकृष्ण केला चिप्स फॅक्टरीतील पाच लाख रुपयांच्या विविध यंत्रांची चोरी झाल्याची फिर्याद मालक नीरज सुनील पाटील यांनी दिली होती. मात्र विम्याच्या रकमेसाठी हा चोरीचा बनाव नीरज पाटील (वय २४) यानेच रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सविस्तर वृत्त असे कि, नीरज पाटील याने चिप्स फॅक्टरीवर पाच लाखांचा विमा काढला होता. या रकमेचा फायदा घ्यावा यासाठी त्याने दोन नोकराच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि चोरी केली. त्यानंतर स्वतः पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी या गुन्ह्यात तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे कारवाई केली. त्यात नीरज पाटील, उमेश शांताराम…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील नागदुली येथील एका मजुराचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील नागदुली येथील समाधान साहेबराव महाजन (१९) हा मजूर खेडगाव तांडा येथे देवराम पवारस यांच्या घराच्या सेंट्रिंगचे काम करीत होता. त्यावेळी विजेचा धक्का लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान हा तीन वर्षांपासून सेंट्रिंग कामावर मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी, दोन चुलते असा परिवार आहे. या परिवाराची घरची…

Read More

सावदा : प्रतिनिधी राज्यभर उन्हाचा कडाका वाढत असल्याने अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना अशीच एक घटना सावदा शहरात लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, सावदा बस स्थानकाजवळ दुकाने आहेत. त्यातील एका गॅरेजमधून धुराचे लोट निघू लागले असता नागरिकांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत आग शेजारील दुकानांमध्ये पसरण्यास सुरुवात झाली होती. सावदा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून ही आग विझवली. दरम्यान, या आगीत दोन्ही दुकानांमधील साहित्य जळून खाक झाले होते. या ठिकाणी जवळपास २० दुकाने एकमेकांना लागून आहेत. मात्र, सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठे…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या १५ वर्षीय मुलाचा झटके आल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ऐन गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमन मनोहर निकम (१५, रा.चिंचखेडा, ता. चाळीसगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अमन हा पोहण्यासाठी आला. त्याने पाण्यात उडी घेतली. मात्र काही वेळात पाण्यातच त्याला झटके येत असल्याचे गार्ड मधुकर चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी आवाज देत इतर गार्डच्या मदतीने अमनला बाहेर काढले आणि खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी तलावाचे…

Read More