• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तीन वर्षीय बालकाचा नाल्यात पडून मृत्यू

editor desk by editor desk
March 11, 2024
in क्राईम, भुसावळ
0
तीन वर्षीय बालकाचा नाल्यात पडून मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील खडका रोड भागात तीन वर्षीय बालकाचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी रात्री आठ वाजता उघडकीस आली. घटनेमुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या बालकाचा शोध लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, रसलान उर्फ बाब बिहारी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे वडिल नसरुद्दीन हे खडका रोड येथे मुजम्मिल खान यांच्याकडे भाड्याने वास्तव्यास आहे. वरच्या बाजूस घर आणि खाली दुकान आहे. रविवारी सकाळी ११ वाजता देखील तो वडिलांसोबत आला. खडका रोडवरील बिलाल कांडप मशिन या दुकानाबाहेर खेळत होता. याच ठिकाणी ३० फूट खोल व सहा फूट रुंद नाला आहे. अरसलाम हा खेळता खेळता नाल्यामध्ये पडला. अर्धा-एक तास झाला तरी अरसलान हा कुठेच आढळून न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी शोध घेतला.

अखेर सोशियल मीडियावर अरसलान हरविल्याची पोस्ट वाऱ्यासारखी पसरली. मात्र रात्री उशिरापर्यंत देखील काहीच पत्ता लागला नाही. माजी नगरसेवक आशिक खान यांच्या दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता तर अरसलान हा खेळता खेळता नाल्यात पडल्याचे दिसले. मात्र हे फुटेज तपासण्यास उशिर झाल्यामुळे या बालकाचा नाल्याच्या गाळात अड कून मृत्यू झाला होता. काही नागरिकांनी शिडी लावून ३० फुट नाल्यात उतरून रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास या बालकाचा मृतदेह बाहेर काढला.

Previous Post

खान्देशात उद्या राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा

Next Post

दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला; चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Next Post
दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला; चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला; चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group