वरणगाव : प्रतिनिधी शहराजवळ अज्ञात दोन चोरट्यांनी मोटार सायकलस्वारास अडवुन २ हजार ६०० रुपये लंपास केले. ही घटना दि. ९ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता महामार्गावरील नागराणी पेट्रोल पंपाजवळील फॅक्टरी हतनूर जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील नितीन पंडीत गाढे हे किन्हीहुन कार्यक्रम आटोपून मुक्ताईनगर जात होते. यावेळी वरणगावच्या पुढे नागराणी पंपाच्या जवळ अज्ञात मोटार सायकल स्वारांनी त्यांना पेट्रोल मागण्याचा बहाना करून त्यांची गाडीसमोर गाडी आडवी लावली. त्यांनी हेल्मेट वर दगड मारला व खिशातून २ हजार ६०० रुपये काढून पसार झाले. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेरहून कळमसरे येथे दुचाकीने येत असताना उड्डाणपुलावर तरुणाचे नियंत्रण ढासळल्याने दुचाकी खाली कोसळली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दरम्यान, गुरुवारी उपचारादरम्यान धुळे जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे कि, मृताचे नाव विकास शंकर साळुंखे (पारधी, ३५) असे आहे, या घटनेने पारधी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विकास साळुंखे हा बांधकाम कारागीर होता. बांधकामाचे मटेरियल घेण्यासाठी बुधवारी दुपारी अमळनेरला गेला होता. सायंकाळी परत येत असताना रेल्वे उड्डाणपुलाच्या वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दुचाकी पुलावरून खाली कोसळली. नागरिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डोक्याला मार बसल्याने गंभीर अवस्थेत धुळे येथे हलविण्यात आले. गुरुवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावदा येथील दहावीच्या वर्गात शिकत असलेला सावदा ख्वाजानगर येथील परिसरातील शे. ताबिश शे. रमजान मोमीन या १५ वर्षीय मुलाचा गारबर्डी धरणात बुडून मृत्यू झाला. ईदच्या दिवशी ही दुर्घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत सकाळची ईदगाह वरील सामूहिक नमाज झाल्यानंतर येथून जवळच असलेल्या गारबर्डी धरणावर फिरायला गेला होता. यावेळी पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. पश्चात आई-वडील तसेच एक मोठा आणि एक लहान भाऊ आहे.
मेष – आजचा दिवस संमिश्र अनुभवाचा असेल. आज ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. आज तुम्ही सामाजिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. आज मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कौटुंबिक नात्यात गोडवा येईल. वृषभ – आज तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन धार्मिक स्थळाचा आनंद मिळेल. नवीन व्यवसाय सुरू कराल. नातेवाईकांशी तुमचा संवाद वाढेल. आज तुम्ही काही नवीन काम सुरू करण्यासाठी उत्साहित असाल. मिथुन – आजचा दिवस आयुष्यातील मैलाचा दगड ठरेल, अतिशय महत्वाचा असेल. तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, ज्या तुम्ही पूर्ण कराल. आज तुम्ही काही वैयक्तिक बाबींवर थोडे भावूक होऊ शकता. शिक्षक आज बैठकीला उपस्थित राहणार…
पुणे : वृत्तसंस्था नुकतेच पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे समोशात कंडोम आणि दगड आढळला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. असे असताना ही घटना ताजी असतांना आता बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्याच्या उकड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण विविध शीतपेय घेत आहेत. यामुळे मात्र तुम्ही बर्फमिश्रीत पदार्थांना पसंती देत असाल तर तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. अशी ही घटना घडली आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याठिकाणी बर्फातच मृतावस्थेत उंदीर आढळला आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बर्फ तयार केला जातो. हे बर्फ ऊसाचे गुऱ्हाळ, सरबत, गोळा यांसह…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था येत्या १९ रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून निवडणुकीला 8 दिवस बाकी आहेत, त्याआधी भाजपने उमेदवारांची ११ वी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील एकाच उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील जागांचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची ११ वी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकाच उमेदवाराची घोषणा केली आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील भदोही लोकसभा मतदारसंघातून डॉ. विनोद कुमार बिंद यांना तिकीट दिले आहे. भाजपने आतापर्यंत उत्तर प्रदेशातील 71 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. कैसरगंज, रायबरेली, देवरिया आणि फिरोजाबाद लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. कैसरगंजमध्ये…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी योगशिक्षक सुनिल गुरव यांची नियुक्ती करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. याबाबत अधिक असे की, योगा फाऊंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघाची स्थापना करण्यात आली आहे. या संघाच्या माध्यमातून संपुर्ण राज्यात योगासंदर्भात मार्गदर्शन आणि जनजागृती केली जात आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी योगशिक्षक सुनिल गुरव यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांनी केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. योगशिक्षक सुनिल गुरव हे मु.जे.महाविद्यालयात ग्रंथालय विभागातून सेवानिवृत्त झालेले आहे. सन २००६ ते २०१२ दरम्यान त्यांनी मु.जे.…
अमळनेर : प्रतिनिधी सकाळी घरात स्वयंपाक सुरु असताना अचानक गॅस सिलेंडरमधून गॅस लिकेज झाला. यामुळे आगीचा भडका उडून दोन घराणं आग लागल्याची घटना अमळनेर तालुक्यातील करणखेडा या गावात घडली. या आगीत दोन्ही घरातील संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले असून सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथे बापूराव राजधर धनगर यांच्या पत्नी १० एप्रिलला सकाळी स्वयंपाक करीत होत्या. यावेळी गॅस पेटविताच अचानक आगीचा भडका झाला. आगीचा भडका उडाल्याने त्या लागलीच घराबाहेर पडल्या. त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धावत येत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु माती व लाकडाचे घर असल्याने घराने लागलीच पेट घेतला. दम्यान शेजारील…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील प्रशासकीय इमारतीच्या आवारातील कृषी कार्यालयाच्या परिसरात बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी तरुणाचा संशयास्पदरीत्या जळीत अवस्थेतीत कुजलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील प्रशासकीय इमारतीच्या आवारात असलेल्या रोहित्राजवळ दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा संशयास्पदरीत्या जळालेला आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या परिसरात दुर्गधी येत असल्याने हा प्रकार उघडकीला आला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उल्हास चहाटे, पो.कॉ. महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. रुग्णावाहिकेतून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोजोरे रस्त्यावर सुदर्शन पेपर मिल फाट्यावर मिनी ट्रक व मोटारसायकल यांचा अपघात होऊन दोन परप्रांतीय जागीच ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला. सविस्तर वृत्त असे कि, रामसिंग गमरीया भिलाला (४७, रा. कोटबैंडा, जि. खरगोन, मध्य प्रदेश) व मोटला छितरीया भिलाला (४०, रा. मसानिया फाल्या, जि. खरगोन) हे दोघे मोटारसायकलने (एम.पी. १० झेड. बी. ०४०१) ने शेताकडून सुनसगाव गोजोरा रोडवर आल्यावर सुनसगावकडून गोजोराकडे जाणाऱ्या ट्रकने (एम.एच. १५ डी.के. १५६९) जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. दोन्ही जण रस्त्यावर फेकले…

