Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
    राजकारण

    जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

    editor deskBy editor deskApril 30, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजिक कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो. युवा हे मानव संसाधन विकासाचे मुख्य स्त्रोत मानले जातात. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील आवश्यक भाग आहे. समाजातील युवांची संख्या पाहता त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास करून युवकांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात जोडण्यासाठी प्रतिवर्षी 1 मे रोजी जिल्हा युवा पुरस्कार दिले जातात.

    सामाजिक क्षेत्रामध्ये अत्युच्च कामगिरी केलेल्या जळगाव जिल्ह्यातील युवकांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने मागविण्यात आले होते. या प्रस्तावांची छाननी करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सन 2025-26 या वर्षांचे पुरस्कार जाहीर केले आहेत. हे पुरस्कार 1 मे 2026 रोजी जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी दिली.

    समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इत्यादी बाबतचे कार्य, शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रुण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वागिण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, इत्यादी बाबत कार्य. साहस इत्यादी बाबतचे कार्य, ग्रामीण, शहरी, अनुसूचित जाती व जनजाती, झोपडपट्टी, दुर्गम प्रदेशात केलेले कार्य इत्यादी निकषांव्दारे युवकांच्या कार्याचे मुल्यमापन केले जाते.

    सन 2025-26 या वर्षात कमलेश प्रल्हाद सोनवणे यांना युवक विभागातून, डॉ.अमृता चंद्रकांत सोनवणे यांना युवती विभागातून तर ग्लोबल बंजारा अस्तित्व फौडेशनला नोंदणीकृत संस्था विभागातून जिल्हा युवा पुरस्कार जाहिर करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या कार्यालयाकडून कळविण्यांत आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लढायची वेळ आली की इतरांना पुढे करतात” : शिंदेंचा ठाकरे यांच्यावर निशाणा

    April 30, 2026

    केंद्रीय विद्यालयांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय : जमिनी विनामूल्य देण्यास मंजुरी !

    April 30, 2026

    बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी : विधान परिषद तिकीट निश्चित !

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.