Author: editor desk

आजचे राशिभविष्य दि.२० एप्रिल २०२६ मेष राशी आज तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल आणि तुम्ही हा आनंद तुमच्या मित्रांसोबत वाटून घ्याल. थोड्याशा मेहनतीने तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. तुमचे मित्र तुमच्यासाठी एक सरप्राईज पार्टी आयोजित करून एक मजेदार वातावरण निर्माण करतील. तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल आणि तुम्ही एकमेकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घ्याल वृषभ राशी आज तुम्हाला एका शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. तुमचे वडील तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत करतील, ज्यामुळे तुम्हाला अधिक नफा मिळेल. आज महिला घरकामात व्यस्त राहतील आणि संपूर्ण कुटुंबाला आवडतील असे नवीन पदार्थ बनवतील. तुम्ही काहीतरी नवीन करण्याकडे आकर्षित…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असताना, बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी राज्यस्तरीय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले. राज्यातील सर्व सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना गावामध्ये होणाऱ्या विवाहांपूर्वी वधू-वरांच्या वयाची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाला समन्वयाने काम करण्यास सांगितले आहे. तालुका आणि ग्रामस्तरावर विशेष पथके स्थापन करण्यात येणार असून, देवस्थान, मंगल कार्यालये आणि इतर…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असताना, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी या प्रकरणासंदर्भात अत्यंत गंभीर आणि स्फोटक आरोप केले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांशी जोडलेले असल्याचा दावा करत त्यांनी तपास प्रक्रियेवरही संशय व्यक्त केला आहे. प्रा. मानव यांनी म्हटले की, “हे प्रकरण आज घराघरात पोहोचण्यामागे राजकीय संबंध हेच मुख्य कारण आहे. जर या बाबाचा संबंध सत्ताधाऱ्यांशी नसता, तर कदाचित पोलिसांनी हे प्रकरण दडपून टाकले असते.” त्यांनी पुढे असा आरोप केला की, काही राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठीच पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. अशोक खरातच्या कार्यपद्धतीवर…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी जळगाव शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातून चोरीस गेलेली अॅपे रिक्षा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोधून काढत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सिव्हील हॉस्पिटलच्या गेट क्रमांक ३ जवळील पार्किंगमधून MH19 BJ 4025 क्रमांकाची काळ्या-पिवळ्या रंगाची तीन चाकी अॅपे रिक्षा चोरीस गेली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्र. १०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे दि. १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना प्रभारी अधिकारी यांनी विशेष पथकाची स्थापना केली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कल्पेश ज्ञानेश्वर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृहविभागाची तातडीची आढावा बैठक घेत विविध संवेदनशील प्रकरणांच्या तपासाबाबत पोलिसांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण, आयटी धर्मांतर प्रकरण, तसेच गोरेगाव ड्रग्ज आणि परतवाडा प्रकरणांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. बैठकीस पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. या वेळी “कोणताही आरोपी असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे” असा ठाम संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. “पीडितांना पूर्ण विश्वास द्या आणि न्याय मिळवून देण्यासाठी तपासात कोणतीही कसूर ठेवू…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या हवामानाचा विलक्षण आणि चिंताजनक बदल पाहायला मिळत असून उष्णतेचा प्रचंड कहर आणि अवकाळी पावसाचा तडाखा अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. एका बाजूला तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे झेपावत आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागांत अचानक पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. विदर्भात उष्णतेने विक्रमी पातळी गाठली असून अकोला येथे ४४.१ अंश, वर्धा ४४.४, नागपूर ४४, गडचिरोली ४४ आणि अमरावतीतही ४४ अंशांच्या आसपास तापमान नोंदवले गेले आहे. चंद्रपूरमध्ये ४३.६, यवतमाळ ४२.८, गोंदिया ४२.९ आणि भंडारा ४२ अंशांवर पोहोचले आहे. या तीव्र उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताचा धोका वाढला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील मास्टर कॉलनी परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी, १६ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. शेख नयुम शेख मसुरोद्दीन असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार,  शेख नयुम हा तरुण हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटनेच्या दिवशी तो आपल्या घरातील एका खोलीत झोपलेला होता. सकाळी ११:५५ वाजेच्या सुमारास तो बराच वेळ बाहेर न आल्याने, त्याचा भाऊ त्याला उठवण्यासाठी खोलीत गेला. यावेळी नयुमने छताला गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. कुटुंबीयांनी तातडीने नयुमला खाली उतरवून उपचारासाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील बिबानगर परिसरात एका युवकाने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराबाबत युवकाला समज देण्यास गेलेल्या मुलीच्या पालकांनाच त्याने जीवे मारण्याची धमकी दिली असून, १६ एप्रिल रोजी थेट युवतीच्या घरावर दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित युवक पीडित विद्यार्थीनी शाळेतून घरी जात असताना सतत तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. याच त्रासातून त्याने तिला आपल्या प्रेमात ओढले. काही दिवसांपूर्वी तो युवतीला दुचाकीवर बाहेर फिरायला घेऊन गेला, तिथे त्याने तिची छेड काढत बळजबरीने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मुंबईतील एका प्रौढ महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावून तब्बल ६५ लाख रुपये उकळल्याच्या गंभीर सायबर फसवणूक प्रकरणात मुंबई सायबर क्राईम शाखेने मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइमच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम जाधव यांच्या पथकाने नशिराबाद येथे येऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयेश काळे (वय २६, रा. तरसोद, जि. जळगाव) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार संकेत सोपान महाजन (वय २८, रा. मेहरुण, जळगाव) आणि यशवंत शालिक धांडे (वय २९, रा. मेहरुण, जळगाव) यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने त्यांच्या राहत्या…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी  तालुक्यातील खडके बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आदिवासी मजूर कुटुंबाला त्यांच्या लहान मुलांसह ऊसतोडणी आणि शेतीची कामे करण्यास भाग पाडले, तसेच डांबून ठेवून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी ठेकेदार आणि त्याच्या मुलावर एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदार रंजीत पवार आणि त्याचा मुलगा राजेश पवार (दोन्ही रा. खडके बु, ता. एरंडोल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  नेपानगर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी गोरेलाल रामसिंग बारेला (३०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सप्टेंबर २०२५ पासून संशयितांनी बारेला कुटुंब आणि इतर मजुरांना कामासाठी आणले होते. या दरम्यान त्यांना खडके बुद्रुक…

Read More