Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी बनावट पत्ता देऊन पशुखाद्य मागविल्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करीत जळगावातील व्यापारी कांचन सुरेश येवले (३८, रा. पिंप्राळा) यांची दोन लाख ३४ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १२ ते १३ ऑगस्ट दरम्यान घडला. या प्रकरणी गोरख कैलास दुधारे (रा. गल्ले बोरगाव, ता. खुलताबाद, जि.छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांचन येवले यांचा पशुखाद्याचा व्यवसाय असून, त्यांचे औद्योगिक वसाहत परिसरात कार्यालय आहे. त्यांच्याशी गोरख दुधारे याने संपर्क साधून आपला पशुखाद्याचा व्यवसाय असून तुमच्याकडून पशुखाद्याच्या १७० गोण्या पाठवा असे सांगितले. त्यानुसार येवले हे दोन लाख ३४ हजार रुपये किमतीच्या पशुखाद्याच्या १७०…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आठवडे बाजारामध्ये आलेल्या ज्योती भानुदास कापुरे (४९, रा. कोठारी नगर) यांची २४ हजार रुपये किमतीची सोनपोत अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना २४ डिसेंबर हरिविठ्ठलनगरमध्ये घडली. याप्रकरणी ३० डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों सुशील चौधरी करीत आहेत. ज्योती कापुरे या हरिविठ्ठलनगर येथे आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.

Read More

जळगाव : प्रतिनिधी लहान मुले खेळत असल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन लोखंडी रॉड व विटांनी दुखापत करण्यात आली. ही घटना सोमवारी (३० डिसेंबर) घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गटातील दिलीप फकिरा थोरात (३२, रा. पिंप्राळा हुडको) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लहान मुले खेळत असताना वाद होऊन अबरार हमीद खाटीक उर्फ चिरक्या (१९) याच्यासह चार जणांनी थोरात व त्यांचे शालक कन्हैया अहिरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. दुसऱ्या गटातील अबरार हमीद खाटीक (१९, रा. उस्मानिया पार्क) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लहान मुलांच्या खेळण्यावरून दिलीप थोरात यांच्यासह चार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वीज मीटर नादुरुस्त असून गुन्हा दाखल होऊ नये यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या धनराज वायरम व गोटू वायरमन (पूर्ण नाव समजू शकले नाही) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील ३० वर्षीय तक्रारदार यांच्या घरचे पाच वीज मीटर महावितरणच्या भरारी पथकाने काढून नेले व ते नादुरुस्त असल्याचे सांगितले. या प्रकरणात वीजचोरीचा गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसल्यास एक लाख ५० रुपयांची मागणी केली. यात तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारण्याचे दोघांनी मान्य केले. या विषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने लाचेच्या मागणीविषयी पंचांसमक्ष खात्री केली असता एका मीटरसाठी ३० हजार रुपये याप्रमाणे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहराजवळील दीपनगर महामार्गावर वरणगावकडून भुसावळच्या दिशेने येत असताना कारची ट्रकला जोरदार धडक बसली. यात कारमधील पाच जण जखमी झाले असून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना मंगळवारी तीन वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक एम. एच. १९ ई.ए. ३८७६ मंगळवारी दुपारी वरणगावकडून भुसावळच्या दिशेने येत असताना त्याच वेळेस समोर जात असलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक लागली. कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमधून प्रवास करीत असलेले ५ जण जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आले आहे.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथे किरकोळ कारणावरुन मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास वाद झाला. त्यातून कारचालकाला मारहाण करुन कारची तोडफोड करण्यात आली. यामुळे संतप्त जमावाने चार ते पाच दुकानांची जाळपोळ केली. घटनेची तीव्रता पाहून जळगावातून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. एका भागात दगडफेकीचा प्रकार घडला. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती धरणगावचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी दिली. दरम्यान, वादात जमावाने काही दुकाने फोडून त्यातील साहित्यांची नासधूस केली. रात्री १२ वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पाळधीत भेट देवून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. एकीकडे नवीन वर्षाचा जल्लोष होत असताना दुसरीकडे पाळधीत झालेल्या वादाने तणावाची परिस्थिती निर्माण झाली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनामध्ये गॅस भरणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत ११ गॅस सिलिंडरसह गॅस रिफिलिंगचे साहित्य जप्त केले. वसीम चंगा शहा (रा. ख्वॉजा नगर, पिंप्राळा), फिरोज अलाउद्दीन शेख (रा. पिंप्राळा हुडको), जुबेर खान उस्मान खान पठाण (रा. पिंप्राळा हुडको), अकलाख खान जहाँगीर खान (रा. ख्वॉजा नगर) या चौघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ईच्छादेवी चौकामध्ये वाहनामध्ये गॅस भरताना स्फोट होवून सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर आता पिंप्राळा परिसरात हा प्रकार आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड व पथकाने कारवाई केली. कारवाईत ११ घरगुती गॅस सिलिंडर,…

Read More

मेष राशी आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. तुमच्यासाठी आज फार लाभदायक असेल. नवीन वर्षाची सुरुवात धनलाभाने होईल. व्यवसायात तुम्हाला आनंददायी बातमी ऐकायला मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. कुटुंबात सलोख्याचे वातावरण राहील. प्रवासाचे योग संभावतात. वृषभ राशी नवीन वर्षाचा पहिला दिवस फारच आनंददायी असेल. नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. जवळच्या व्यक्तीकडून मोलाची मदत होईल. मानसन्मान मिळेल. उत्पन्न वाढेल. यामुळे मानसिक समाधान मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्या कामात तुमची पूर्ण साथ देईल. कुटुंबासोबत धार्मिकस्थळी जाऊ शकता. मिथुन राशी आजचा दिवस नेहमीपेक्षा थोडा वेगळा असेल. आज एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आहे. तुमची एखाद्या जुन्या मित्राशी गाठ-भेट होईल. तसेच आज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी  श्री.आयुष प्रसाद सर यांनी जिल्हा महिला बालविकास विभागाच्या मासिक आढावा बैठकीत जिल्ह्यातील बालविवाह निर्मूलन जनजागृती संदर्भात आदेश दिले असता. मा.जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री आर.आर.तडवी सर यांनी जिल्ह्यातील हॉटस्पॉट १७० गावांची निवड केली . जिल्हा महिला बालविकास विभाग व युनिसेफ, एसबीसी – थ्री यांच्या आर्थिक साहाय्याने जळगाव जिल्ह्यातील 50 हॉटस्पॉट गावांमध्ये बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यासाठी सर्वप्रथम युनिसेफ एसबीसी – ३ समन्वयकांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले यामध्ये बालविवाह निर्मूलनाची संपूर्ण माहिती PPT च्या सहाय्याने दाखवली – कायदा, तरतुदी, निकष, बालविहाचे परिणाम, कारणे, व NFHS -4 आणि NFHS -5 नुसार जळगाव जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी दि.30 रोजी सकाळी दिवे अंजुर गावाच्या हद्दीत एका वेरणा चारचाकी वाहनाला अचानक आग लागली. नाशिकच्या दिशेने जाणारे वाहन दरम्यान दिवे अंजूर भागात आली असता, अचानक वाहनाच्या पुढील भागाला आग लागली. अचानक धूर निघायला लागल्यावर वाहनचालकाने प्रसंगावधान दाखवत वाहन थांबवले आणि इतर सहप्रवासी बरोबर बाहेर पडल्याबरोबरच वाहनाने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे वाहनाचा पुढील भाग जळून खाक झाल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

Read More