• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वेच्या धडकेत एक मित्र ठार तर एक गंभीर

editor desk by editor desk
December 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
रेल्वेच्या धडकेत एक मित्र ठार तर एक गंभीर

जळगाव : प्रतिनिधी

नंदुरबारहून जळगावला येत असलेल्या दोन मित्रांना जळगाव रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी १.३० वाजता घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  ओम विजय वाघेला (वय २३, अहमदाबाद) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. समर्थ रघुवंशी (वय २२,रा. नंदुरबार) हा गंभीर जखमी झाला आहे. स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. रेल्वे पोलीस कर्मचारी सचिन भावसार व रवींद्र पाटील यांनी अपघातातील दोघांना जीएमसीत दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी ओम वाघेला याला मृत घोषित केले.

दोन्ही मित्र जळगावला येत असताना सुरतहून येणारी रेल्वे आऊटरला काही वेळ थांबली. रेल्वे थांबली असल्यामुळे दोन्ही मित्रांनी रेल्वेमधून उतरून रेल्वे रूळा लगतच चालत रेल्वे स्टेशन गाठण्याच्या निर्णय घेतला. काही वेळानंतर जळगावकडून जाणाऱ्या तुलसी एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत दोन्ही मित्र रेल्वे रूळ लगत फेकले गेले. त्यात ओम वाघेला याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. ओम व समर्थ हे दोन्ही मित्र बडोदा येथे एकाच महाविद्यालयात शिकायला होते. जळगावहून काही मित्रांसोबत ते नाशिकला रवाना होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जळगाव रेल्वे स्टेशनवर ओम व समर्थ यांचे काही मित्र त्यांना घ्यायला देखील आले होते. मात्र रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच हा अपघात झाल्यामुळे मित्रांची भेट ही होऊ शकली नाही.

Previous Post

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे ; आ.गुलाबराव पाटील !

Next Post

आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोकभाऊ जैन

Next Post
आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोकभाऊ जैन

आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोकभाऊ जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group