मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांंच्यावर टीका करताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी अश्लिल आणि निंदनिय विधान केले. या प्रकरणी प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाकडून या तक्राराची दखल घेण्यात आली असून, या प्रकरणाच्या चाैकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज (दि.३०) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी चाकणकर म्हणाल्या की, “तक्रार अर्जाची प्रत बीड पोलीस अधिक्षक, मुंबई पोलीस अधिक्षक तसेच सायबर क्राईम यांना पाठवण्यात आली आहे. बीड सायबरकडून प्राजक्ता…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीला मोठे यश आल्यानंतर महायुतीने सरकार स्थापन केले आहे. नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, असे त्यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात भाषण करताना हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वेळी नितेश राणे म्हणाले की, केरळमध्ये फक्त अतिरेकी प्रियंका गांधींना मतदान करतात. त्यांच्या भाषणापूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना मंत्री नितेश राणे भडकाऊ भाषण करणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले होते. मात्र, आता राणे यांच्या या…
एरंडोल : प्रतिनिधी शहरातील नारायणनगरमध्ये लोखंडी जिन्याला दोर बांधून ४२ वर्षीय इसमाने रविवारी पहाटे आत्महत्या केल्याचे उघडकीस झाले. मृताचे नाव समाधान नारायण पाटील असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान पाटील हा काली-पिली गाडी चालवून त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. चार वर्षांपूर्वी समाधान पाटील हा अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यात त्याला इन्फेक्शन झाल्याने औषधोपचार करण्यासाठी त्याची पत्नी त्याना मुंबई येथे घेऊन गेली होती. त्यांना शस्त्रक्रिया करण्याचे सांगण्यात आले होते. मुंबई येथून ते दोघेजण खासगी वाहनाने एरंडोल येथे रविवारी भल्या पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास घरी पोहोचले. दीड तासानंतर समाधान नारायण पाटील याने त्यांच्या घराच्यासमोर गॅलरीला असलेल्या लोखंडी…
जामनेर : प्रतिनिधी मामाचे लग्न झाल्याने त्यांच्यासोबत तीर्थस्थळावर गेलेल्या युवतीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. साक्षी भागवत वराडे (वंजारी) (१७, तळेगाव) असे मयत युवतीचे नाव आहे. हा अपघात पुसद (जि.यवतमाळ) जवळ घडला. मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील भागवत सुधाकर वंजारी यांच्या शालकाचे लग्न झाल्याने ते कुटुंबातील सदस्यांसह तीर्थस्थळी दर्शनासाठी गेले होते. रविवारी पहाटे ५चे सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात साक्षी हिचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच गावात शोककळा पसरली. साक्षी ही जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ११वी विज्ञान वर्गात शिक्षण घेत होती. तिच्यावर दुपारी तळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अमळगाव रस्त्यावर जळोद फाट्याजवळ एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध इसमाला धडक दिल्याने जबर जखमी झाल्याची घटना २८ रोजी घडली आहे. प्रवीण शालिग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील शालिग्राम मंसाराम पाटील (६५, दोधवद) हे २८ रोजी दुपारी रच्या सुमारास स्वतःच्या दुचाकीने अमळगावकडे जात असताना जळोद फाट्याजवळ वळणावर समोरून येणाऱ्या एसटी बस (एमएच २० बीएल ०९३४) वरील चालकाने भरधाव वेगाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे शालिग्राम पाटील यांच्या चेहऱ्याला, तोंडाला, हातापायाला व छातीला जबर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी डॉक्टरच्या घरातून सोन्याच्या बिस्कीटांसह २० लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या छाया संग्राम विसपुते या मोलकरणीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (२९ डिसेंबर ) सायंकाळी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद नगरातील डॉ. प्रकाश चित्ते यांच्या घरात काम करणाऱ्या छाया संग्राम विसपुते या मोलकरणीने मे ते डिसेंबर २०२४ या दरम्यान घरातून २० लाख रुपयांची रोकड आणि चार लाख रुपयांचे सोन्याचे बिस्किट चोरून नेले होते. डॉ. चित्ते यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून छाया विसपुते विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत असून त्यांनी शनिवारी…
जळगाव : प्रतिनिधी औद्योगिक वसाहत परिसरातील डी-८१ सेक्टरमधील सिद्धिविनायक चटई कंपनीला आग लागून कंपनीतील तयार मालासह साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणालाही काही दुखापत झाली नाही. मात्र आग एवढी भीषण होती की, आगीचे लोळ व धूर उंच आकाशात जात होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना रविवारी (२९ डिसेंबर) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरातील डी-८१ सेक्टरमध्ये उन्मेष चौधरी यांची सिद्धिविनायक नावाने चटई कंपनी आहे. रविवारी रात्री नियमितपणे शिफ्ट सुरू असताना सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कंपनीमध्ये अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच कंपनीतील सर्व कामगारांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली. क्षणातच आगीने…
मेष राशी तुमच्यासाठी आजची ग्रह स्थिती अनुकूल असणार आहे. आज तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह जाणवेल. आपण कोणत्याही कठीण कार्याला समजून घेऊन आणि शांतपणे सोडवू शकाल. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्याकडेही आज आपला कल राहील. पूर्वजांशी संबंधित कोणत्याही मुद्द्यांमुळे तणाव होऊ शकतो. मित्र आणि नातेवाईकांसोबत सलोख्याचे वातावरण राहील. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या, त्यामुळे तुमचे संबंध सुधारतील. वृषभ राशी आजचा दिवस प्रामुख्याने कुटुंबासोबत घालवल्याने मन शांत राहील आणि आनंद मिळेल. भविष्यातील योजनांची आखणी कराल. वरिष्ठांच्या अनुभवांपासून शिकाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. जर कोर्टाशी संबंधित काही प्रकरण प्रलंबित असेल तर आज त्यावर गंभीर विचार करा.…
मुंबई : वृत्तसंस्था देशभरात वर्षा अखेर सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुचा तोरा वाढला होता. या वर्षात सोने आणि चांदीत मोठी उलथापालथ दिसली. सोन्याने 81 हजारांचा तर चांदीने 1 लाखांचा टप्पा ओलांडला. तर डिसेंबरच्या मध्यानंतर दोन्ही मौल्यवान धातुला चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. या 15 दिवसात मोठी उभारी घेता आलेली नाही. किंमतीत चढउताराचे सत्र आहे. या महिन्यात 9 ते 15 डिसेंबर दरम्यान सोन्याचा तोरा दिसून आला. या काळात सोने उच्चांकावर असल्याचा दावा गुडरिटर्न्सने आलेखाद्वारे केला आहे. त्यानंतर जितकी किंमत वधारली. तितकाच भाव कमी झाला. या आठवड्यात 25 डिसेंबरला 100 रुपये, 26 तारखेला 280 रुपये, तर 27 डिसेंबर…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथे किराणा व्यापाऱ्याची ९६ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना बसस्थानकापासून जवळच असलेल्या पहूर ते जामनेर रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात व्यापाऱ्याने धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानक परिसराला लागून असलेल्या जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत मयूर प्रोव्हिजन हे किराणा दुकान आहे. दररोजच्या किराणा मालाच्या विक्रीची रक्कम जामनेर रस्त्याला लागून असलेल्या चंदन कुमावत येथील शॉपिग कॉम्प्लेक्समध्ये वर्धमान स्टील दुकानाचे मालक उज्ज्वल सिसोदिया यांच्याकडे ते जमा करतात. किराणा दुकानातील कर्मचारी कैलास सटाले (३५) हे शनिवारी संध्याकाळी किराणा दुकानाची ९६ हजारांची रक्कम सायकलवरून घेऊन निघाले. तेवढ्यात तीन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून…

