मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना भेट घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लगेच निर्णय होतो. याच्या मागे काही लपले आहे, हा संशोधनाचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की शरण आला म्हणजे गुन्हा संपत नाही. 14 गुन्हे असूनही बॉडी गार्ड घेऊन फिरतो. या सगळ्या आरोपींना मोक्का लावणार असे तुम्ही म्हणाला होता, त्यावर मोक्का लावणे महत्त्वाचे आहे. संभाजीराजे म्हणाले, खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केली आणि नंतर बेल घेऊन बाहेर पडणार हा खेळखंडोबा आम्ही सहन करणार नाहीत. तुम्ही मोका कसे लावणार, खुनाचा…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांनी मोठे बंड करून महायुतीसोबत आले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला प्रंचड बहुमत मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाचे काही आमदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी आग्रही दिसत असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. विधानसभेला पुन्हा पाच वर्षांसाठी विरोधात बसण्याची वेळ आल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही आमदार, खासदार प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. ८, ९ जानेवारीला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय पक्षाने घ्यावा यासाठी आग्रही भूमिका मांडण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. आपला पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन करून एकच राष्ट्रवादी जोमाने वाढवावी अशीही त्यांची भूमिका आहे. त्यावर शरद…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील उपसरपंच पदी शिवसेनेच्या शोभाताई दिलीप माळी पाटील यांची दि 30 डिसेंबर 2024 रोजी उपसरपंच पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रामपंचायत मध्ये जाऊन शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर यांनी केला. या प्रसंगी युवा सेनेचे उपतालुका प्रमुख उगलाल पाटील,तालुका संघटक हेमंत भाऊ चौधरी,युवा सेनेचे अजय महाजन,दिलीप महाजन, रविंद्र माळी प्रशांत माळी राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख धनराज माळी सर,भावडू पाटील तसेच ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच उपस्थित होते. ग्रामसेवक पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. शोभाताई यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब,युवा नेते प्रतापराव पाटील,तालुका प्रमुख देविदास पाटील,गजानन नाना पाटील,मोती आप्पा पाटील, विलास महाजन,विजय महाजन पप्पू…
पाचोरा : प्रतिनिधी जळगाव चौफुली परिसरातील रहिवासी असलेल्या ऊसतोड मजुराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सुरेश उदागे (३२, वरखेडी नाका, जळगाव चौफुली, पाचोरा) याने घरी कुणीही नसताना दुपारी ४:३०च्या सुमारास राहत्या घरी रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील हा ऊसतोड कामगार व वाहन चालक होता. गेल्या महिन्याभरापासून सुनील हा ऊसतोड कामावरून घरी परत आला. होता. त्याची पत्नी व लहान २ मुले, मुलगी हे बारामती साखर कारखान्यात ऊसतोडणीसाठी गेलेले आहेत. सुनील हा आई व बहीण यांच्यासोबत राहत होता. आई व बहीण हे बाहेर गेल्याची वेळ साधून त्याने छताला रुमाल बांधून गळफास घेतला व जीवन…
जळगाव : प्रतिनिधी खून, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आकाश ऊर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (२३), पवन ऊर्फ बद्या दिलीप बाविस्कर (२३) व आकाश ऊर्फ आक्या ब्रो रवींद्र मराठे (२२, सर्व रा. तुकारामवाडी) या तिघांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तरीदेखील वर्तवणुकीत सुधारणा होत नसलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाईचा बडगा उचलला जात आहे. यामध्ये तुकारामवाडी परिसरातील आकाश ठाकूर याच्यावर सात, पवन बाविस्कर याच्याविरुद्ध सहा तर आकाश मराठेविरुद्ध खुनासह चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या हद्दपारीचा…
जळगाव : प्रतिनिधी रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप काशिनाथ वानखेडे (५४, रा. खोटेनगर) यांचा उपचार सुरू असताना सोमवारी (३० डिसेंबर) दुपारी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप वानखेडे हे गुरुवारी (२६ डिसेंबर) दुपारी शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात कॅफोसह गेले होते. जेवणाचा डबा नसल्याने महाराष्ट्र बँकेलगत ते पराठे घेण्यासाठी आले. पोलिस निवासस्थानाजवळ वाहन लावून ते पायी रस्ता ओलांडत असताना क्रीडा संकुलाकडून भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली होती. यात ते हवेत फेकले जाऊन खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. इतर सहकाऱ्यांनी त्यांना खासगी…
जळगाव : प्रतिनिधी अवैध वाळू चोरीविरुद्ध कारवाई सुरूच असून तालुक्यातील धानोरा गावाजवळील गिरणा नदी पात्रात अवैधपणे वाळूचे उत्खनन करणारे मशीन महसूल पथकाने जप्त केले. ही कारवाई २८ डिसेंबर रोजी रात्री करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कालिंका माता चौकात झालेल्या अपघातानंतर वाळूविरुद्ध कारवाई सुरू आहे. त्यात तालुक्यातील धानोरा गावाजवळील गिरणा नदीपात्रात अवैधपणे वाळूचा उपसा सुरू असताना महसूल पथकाने रात्री कारवाई केली. यावेळी नदीपात्रात लोखंडी वायर रोपफावडा मशीन आणि उपसा केलेली पाच ब्रास वाळू आढळून आली. पथकाने हे सर्व साहित्य जप्त केले. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी मयूर महाले यांनी तालुका पोलिस…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी कार्यात गुंतून नाव कमावण्यासाठी उत्तम आहे. दान-पुण्य कराल. व्यापारात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. कोणी कोणताही सल्ला दिला तरी त्यावर योग्य तो विचार करूनच निर्णय घ्या. तुमचे मन काही गोष्टींमुळे अस्वस्थ असेल. मैत्रीणीसोबत डेटिंगला जाण्याचा योग आहे. घरात छोट्या-मोठ्या कुरबुरी होतील. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीदायी ठरेल. तुमचा कमाई वाढवण्यावर भर असेल. यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदलही करु शकता. नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध राहा. व्यवहार करताना जपून करा, नाहीतर फसवणूक होऊ शकते. आई-वडिलांची सेवा करण्यासाठी तुम्ही दिवसाचा काही वेळ काढाल. तुमचा जोडीदार तुमच्या कामात तुमची पूर्ण साथ देईल.…
जालना : वृत्तसंस्था राज्यातील जालना शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्रिकेट खेळताना एका 32 वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे. या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला प्राण गमवावे लागले असल्याचे समजते. आपल्या सहकारी फलंदाजाशी बोलून थोडे पुढे गेल्यावर तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि थेट जमिनीवर कोसळला. यावेळी मदतीसाठी इतर खेळाडू धावले, मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि तरुणाचा मृत्यू झाला. जालना येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धा सुरू असताना विजय पटेल हा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. सामान्यादरम्यान त्याने आपल्या सहकारी फलंदाजाशी संवाद साधला त्यानंतर विजय पटेल फलंदाजी करण्यासाठी परतत असतानाच त्याला अचानक हृदयविकाराचा झटका…

