Author: editor desk

मेष : आज सकारात्‍मक दृष्‍टीकोनासाठी काहीवेळ अध्यात्मिक कार्यात व्‍यतित करा. ध्येयपूर्तीसाठी केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. कोणतीही अशुभ सूचना मिळाल्यानेही तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. वृषभ : सकारात्मक कृती करणाऱ्या व्यक्तीच्‍या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढेल. तुमच्‍या प्रतिभेला चालना मिळेल. भविष्यात उत्पन्नाचे साधनही मिळू शकते. कुटुंबातील सदस्याच्या प्रकृतीविषयी चिंता जाणवेल. वादविवाद टाळा. व्यवसायाशी निगडीत कामात अधिक मेहनत करावी लागेल. मिथुन : : विद्यार्थी आणि तरुणांच्‍या प्रतिभेला चालना मिळेल. मालमत्तेसंबंधी वाद मिटला जाईल. अनावश्यक खर्चात कपात करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. घरातील वातावरण आनंददायी राहिल. कर्क : कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता तुमची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जीवनशैलीतील बदल…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, असे आदिती तटकरे म्हणाल्या. आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांनाच या योजनोचा लाभ घेता येणार आहे. सध्या सरसकट छाननी होणार नाही. केवळ स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या अर्जाबाबत तक्रार दिली केवळ त्या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकणा-या मनू भाकर हिला खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. यासोबतच डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ची घोषणा केली. 17 जानेवारी 2025 (शुक्रवार) रोजी सकाळी 11:00 वाजता राष्ट्रपती भवनात एका विशेष समारंभात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य छाननीनंतर सरकारने अनेक खेळाडू, प्रशिक्षक, विद्यापीठे आणि संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. ज्यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक किंवा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अनेक प्रकरणाच्या माध्यमातून विरोधक टीका करीत आहे तर आज दैनिक सामानाच्या माध्यमातून ठाकरे गटाने महायुतीतील मंत्र्यांवर व सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात अनेक मंत्र्यांनी शपथ घेऊन कार्यभार स्वीकारलेला नाही. ज्यांनी तो स्वीकारला ते त्यांच्या कमिशनबाजीच्या खेळात गुंतले आहेत. ज्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यातील कुणी रुसले आहे तर कुणी रुसून कोपर्‍यात बसले आहेत. अनेकांना चांगली खाती मिळाली नाहीत म्हणून त्यांचे जगणे बेचव बनल्याचे सामनातून प्रकाशीत झाले आहे. फडणवीस, नवे वर्षे उजाडले. ही जळमटे दूर करा ! अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने करीत नऊ मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याचे म्हटले आहे. एक महिना उलटून गेल्यावरही…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र बीडचे वाल्मिक कराड यांची चर्चा सुरु असतांना नुकतेच बीडचे शरद पवार गटाचे खा.बजरंग सोनावणे यांनी एक धक्कादायक आरोप केल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. खा.बजरंग सोनावणे म्हणाले कि, अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, ज्या दिवशी अजित पवार शनिवारी 16 तारेखला मस्साजोग येथे आले, त्यांच्या ताफ्यामध्ये कराडची गाडी होती. त्या गाडीत हा आरोपी होता, तो तिथे जाऊन सरेंडर होतो. याचा अर्थ काय? ताफ्यामधील आरोपी तिथे…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराजवळ एकाने अल्पवयीन मुलीला फूस लावून त्याच्या भाच्यासोबत पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून एकाने त्या शेजारच्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याचे शिरच धडापासून वेगळे केले. इतकेच नव्हे तर ते शिर हातात घेऊन ३०० मीटर चालत जात तो पोलिस चौकीत पोहोचला व खुनाची कबुलीही दिली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भरदिवसा सकाळी अकराच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृताच्या नातलगांनी तब्बल सहा तास पोलिस चौकीवरच ठिय्या दिल्याने तणाव निर्माण झाला होता. मिळालेली अमाहितीनुसार, गुलाब रामचंद्र वाघमारे (३८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून संशयित आरोपी सुरेश…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील वाघरे येथील ५२ वर्षीय प्रौढाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ डिसेंबरला घडली. ३१ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वाघरे येथील विजय गुलाबराव पाटील (वय ५२) यांनी आपल्या राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुती दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना समजताच नागरिक व इतरांनी त्यांना खाली उतरवले व कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. याबाबत संदीप पाटील यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्ता ओलांडत असतान भरधाव बसने धडक दिल्यामुळे मयाराम फुलसिंग बारेला (वय २५, रा सुनसगाव, ता. जामनेर) हा तरुण ठार झाला. हा अपघात ३१ डिसेंबर रोज दुपारी उमाळा गावाजवळ झाला एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयाराम बारेला हे उमाळा येथे रस्ता ओलांडत असताना दुभाजकावरून्न खाली उतरले व त्याच वेळ जळगावकडे येणाऱ्या बसने त्यांन धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करीत आहेत

Read More

जळगाव : प्रतिनिधी इलेक्ट्रिक दुकानात नायलॉन मांजा विक्री होत असताना, शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत महेंद्र कैलास गोयल (१९, रा. सागरनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा हजार ७०० रुपये किमतीच्या नायलॉन मांजाच्या नऊ चक्री जप्त करण्यात आल्या.या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागरनगरामध्ये नायलॉनचा मांजा विक्री होत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांनी पोउनि. योगेश ढिकले, पोलिस नाईक किरण वानखेडे, विकी इंगळे, मुकुंद गंगावणे यांना कारवाईच्या सूचना दिल्या.पथकाने महेंद्र गोयल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा हजार ७०० रुपयांचा नायलॉनचा मांजा जप्त केला. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गोयलविरुद्ध गुन्हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर कामांकडे पोलिस निरीक्षकांचे दुर्लक्ष असून, ते सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. यामध्ये पोलिस ठाण्यात कामानिमित्त गेलेल्या प्रवीण अशोक महाजन (३३, रा. गणेश कॉलनी) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली व पोलिस ठाण्यात डांबून ठेवल्याने निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपाचे जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, मारहाण झालेले प्रवीण महाजन यांनी पोलिस अधीक्षकांना वेगवेगळे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोर मुले विद्यार्थ्यांना मादक पदार्थ देतात व व्यसन लावतात. तसेच भजे गल्लीमध्ये हॉटेलमध्ये…

Read More