• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

माथेफिरूने कोयत्याने केळी कापून फेकली !

editor desk by editor desk
December 1, 2024
in क्राईम, जळगाव
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील अट्रावल येथील शेतकऱ्याच्या राजोरा रस्त्यावरील शेतात अज्ञात माथेफिरूने कोयत्याने कापणी योग्य सुमारे १ हजार ८०० केळीची खोडं कापून फेकली आहेत. यामुळे शेतकऱ्याचे तब्बल ५ लाख ९४ हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार वर्षांत अट्रावल गावातील ही चौथी घटना आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी यावल पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अट्रावल, ता. यावल या गावातील शेतकरी मयूर सुरेश वारके यांनी आपल्या अट्रावल शिवारातील राजोरा रस्त्यावर असलेल्या शेतात ४ हजार ८०० केळी खोडं लागवड केली आहे. केळी कापणी योग्य झाली आहे. त्यातील २३० खोड केळी कापणी केली होती. १ हजार ८०० केळीचे खोड हे कापणी योग्य होते. येत्या दोन दिवसांत ती कापणी होणार होती. मात्र, तत्पूर्वीच शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात माथेफिरूने कोयत्याच्या साह्याने केळीचे घड कापून फेकले. हा प्रकार शनिवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिस ठाण्यात मयूर वारके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहेत.

Previous Post

दुचाकी अडवून लूट करणारे दोघे अटकेत

Next Post

चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील कर्मचारी ठार

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील कर्मचारी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

भुसावळात विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

June 20, 2025
खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !
क्राईम

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !

June 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group