जळगाव : प्रतिनिधी भरधाव दुचाकीने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे सुनील श्रीश्रीमाळ (रा. सम्राट कॉलनी) हे जखमी झाले. ही घटना २७ डिसेंबर रोजी एकलव्य क्रीडा संकुलजवळ घडली. याप्रकरणी ३१ डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीश्रीमाळ हे दुचाकीने (एमएच १५ डीजी ७३२०) एकलव्य क्रीडा संकुलाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीने (एमएच १५ जेटी ९३३९) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात श्रीश्रीमाळ जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला. यश सुनील श्रीश्रीमाळ यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोहेकों प्रशांत पाठक करीत आहेत
Author: editor desk
पाचोरा : प्रतिनिधी वाहनात अवैधरीत्या घरगुती गॅस इंधन म्हणून भरत असताना सहा सिलिंडरसह गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप व इतर साहित्य हस्तगत करीत एकाविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जारगाव चौफुलीवर एका दुकानात घरगुती गॅसचा वाहनामध्ये इंधन म्हणून वापर करण्यासाठी अवैधरीत्या पंप सुरू असल्याची खबर पाचोरा पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी स्वतः पोलिस पथकासह दुकानावर छापा टाकून सहा गॅस सिलिंडरसह मशीन, तसेच एक हॉर्सपॉवरची इलेक्ट्रिक मोटार गॅस भरण्याची मशीन स्प्रेयर मशीन, तसेच इतर साहित्य असा एकूण ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. तसेच चारचाकी गाडी (एमएच१९/डीव्ही७३९४) पोलिसांनी जप्त केली. यावेळी वाहनात…
धरणगाव : प्रतिनिधी हॉर्न वाजवूनही रस्ता न दिल्याने मंगळवारी रात्री येथे झालेल्या हाणामारी, जाळपोळ व लुटालुट प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात वाहन चालकाच्या फिर्यादीनंतर आता बुधवारी दुस-या गटाकडूनही विरोधी तक्रार देण्यात आली आहे. गावात संचारबंदी गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र विक्रम पाटील यांच्या नावे असलेल्या वाहनावरुन हा वाद झाल्याने आता पोलिस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये घनश्याम दिनेश माळी, निलेश गणेश माळी अनिल ऊर्फ विकी रामदास…
मेष राशी आज नोकरीत बॉससोबत चांगला सलोखा राहील. ऑफिसमध्ये एखाद्यासोबत विनाकारण मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. जमिनीशी संबंधित कामांच्या संदर्भात काळजी घ्या. व्यवसायात खूप मेहनत करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन अस्वस्थ राहील. आज आरोग्याच्या छोट्या-मोठ्या कुरबुरी जाणवतील. प्रवासामुळे थकवा येईल. वृषभ राशी अचानक आर्थिक लाभ होईल. यामुळे तुम्हाला तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचणे सोपे होईल. एखाद्या लांबच्या मित्राची भेट होईल. वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. आत्मविश्वास कायम राहील. मात्र नोकरीत काही अडचणी येऊ शकतात. तुम्ही बदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराजीचे सूर उमटतील. काही जणांना नोकरीत प्रगती मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला राहील. मिथुन राशी…
मुंबई : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील खून प्रकरण मोठे चर्चेत येत असतांना नुकतेच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज जलसमाधी आंदोलन करीत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. वाल्मीक कराडला अटक झाली आहे, आता मोठे मासे सापडतील, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. ते आज माध्यमांशी बोलत होते. बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड मंगळवारी दुपारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. मात्र, तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. यावरून मस्साजोगचे ग्रामस्थ आणि मनोज जरांगे आक्रमक झाले आहे. आरोपींना अटक करण्याच्या…
जालना : वृत्तसंस्था देशभरात आज नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सोलापूर- धुळे महामार्गावर अंबड तालुक्यातील महाकाळा येथे उभ्या ट्रकला कार धडकून हा भीषण अपघात आज (दि. १) दुपारी बाराच्या सुमारास झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर येथील कुटे व जालना येथील चौरे कुटुंबीय हे अक्कलकोट येथून देवदर्शन करून परत येत होते. ते आपल्या कारने (एमएच २० सीएस ६०४१) घरी परत येत होते. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातातील मृतांची नावे अनिता…
मुंबई : वृत्तसंस्था जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत होत आहे तर दुसरीकडे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याची चमक वाढली आहे. आज बुधवारी (दि. १ जानेवारी २०२५) शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेटच्या दरात ३७२ रुपयांची वाढ होऊन ते प्रति १० ग्रॅम ७६,५३४ रुपयांवर पोहोचले आहे. मंगळवारी (३१ डिसेंबर २०२४) शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७६,१६२ रुपये होता. त्यात आज वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ११७ रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७६,५३४ रुपये, २२ कॅरेट ७०,१०५ रुपये, १८ कॅरेट ५७,४०१ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४४,७७२ रुपयांवर…
मुंबई : वृत्तसंस्था जगातील अनेक देशात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना 2025 या नववर्षांच स्वागत मंगलमय स्वरुपात व्हावे, यानिमित्ताने राज्यातील सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबले आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, शिर्डी साईबाबा संस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक मंदीर, गणपतीपुळे मंदीर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षानिमित्त राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, भरभराटीचे आणि निरोगी असावे, अशी प्रार्थना सर्व भाविकांकडून केली…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात एका डॉक्टरच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने पैसा, आणि रोकडवर डल्ला मारल्याची घटना ताजी असतानाच तशीच आणखी एक घटना समोर आली आहे. रेल्वेस्टेशन परिसरातील एका नामांकित हॉटेल आणि लॉजिंगच्या पैशांचा नोकरानेच अपहार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ८ लाख १४ हजारांची रोकड चोरी केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत रामदास पेठकर हे विनोद वाईन्स येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. त्यांचे मालकांचे रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेल सिल्व्हर पॅलेस नावाचे नामांकित हॉटेल आहे. हॉटेलमध्ये दररोज जमा होणारी रक्कम लॉजिंग काऊंटरच्या व्यवस्थापकाकडे जमा करण्यात येते. दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी…
जळगाव : प्रातिनिधी विषारी पदार्थ सेवन केलेल्या तरुणावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना या तरुणाची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील परवेश जब्बार खाटीक (वय २६, रा. म्हसावद, ता. जळगाव) या तरुणाने विषारी पदार्थ सेवन केले होते. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातदाखल केले होते. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना दि. ३० रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

