Author: editor desk

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे प्रकरण तापले असतांना आता या वादात महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मंत्र्यांसह सरकारवर खळबळजनक आरोप केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि, महाराष्ट्रात 2014 ते 19 दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजप युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही, तर संपूर्ण भाजप युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल यांनी केला आहे. भाजप युती सरकारचे मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी, खुनी आहे, एका मंत्र्यांवर…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जुना सातारा रोडवरील विटभट्टीजवळ जुन्या वादातून एका ट्रॅक्टर चालकाला शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता घडली होती. याप्रकरणी ३ रोजी मध्यरात्री भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. सविस्त्र्र वृत्त असे कि, शहरातील जुना सातारा रोड परिसरात संजय राजू पवार (वय ३५) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला  असून ट्रॅक्टर चालवून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील चोरवड गावात राहणारा गोलू कैलास मोरे (वय २२) याने जुन्या वादातून संजय पवार याला शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २ फेब्रुवारीला रात्री…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी जुन्या घराची सौदा पावती करून एक कोटी १५ लाख रुपये घेऊनही मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करून बांधकाम व्यावसायिक सुनील मधुकर चौधरी (५२, रा. धरणगाव) यांची फसवणूक करण्यात आली. खरेदी होत नसल्याने रक्कम परत मागितल्यानंतर त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार १५ मे २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव महापालिका हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांक २११२/६० या जुन्या बांधीव घराचा व्यवहार ठरवून सौदा पावती करण्यात आली. त्यासाठी चौधरी यांच्याकडून समोरील व्यक्तींनी एक कोटी १५ लाख रुपये घेऊन करारनामा केला. त्यानंतर मिळकतीची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घरात कुटुंबातील सदस्य असताना बेडरूममध्ये जाऊन विशाखा गौतम सोनवणे (१९, रा. संभाजीनगर) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३ रोजी संध्याकाळी घडली. मू, जे. महाविद्यालयात शिक्षण घेत होती. वडिलांचा वाढदिवस असल्याने विशाखाने दुपारी तसे स्टेटस ठेवले होते. सविस्तर वृत्त असे कि, विशाखा हिचे वडील गौतम सोनवणे यांचा ३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. तिने संध्याकाळी टोकाचा निर्णय घेत स्वतःचे जीवन संपविले. यामुळे सोनवणे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ३ फेब्रुवारी रोजी घरात सर्व सदस्य असताना विशाखा बेडरूममध्ये गेली व गळफास घेतला. काही वेळाने तिची आई तिला बोलवण्यासाठी गेली असता त्यांना मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. शासकीय…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी १०० क्विंटल कापसाच्या चोरी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल सोमवारी जप्त करण्यात आला आहे. दीपक नामदेव बागुल (रा. विद्यानगर, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी प्रशांत सुधाकर गोल्हार रा. खरजई नाका यांनी दि. २१ रोजी चाळीसगाव शहर पोलिसांत फिर्याद दिली होती. गोल्हार यांनी १०० क्विंटल कापूस दि. २१ रोजी मालवाहू वाहन क्रमांक एम.एच.४१ ए.यू. ५९५४ वरील चालकाकडे पातोंडा येथून दिला होता. त्याची किंमत सात लाख रुपये होती. आरोपीने लावलेली ही नंबर प्लेट बनावट होती. आरोपीने गुन्ह्याच्या वेळी वापरलेला मोबाइल चोरीचा होता. तसेच आरोपीने मोबाइल गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकून दिला होता.…

Read More

मेष राशी आज मुलांच्या आनंदात वाढ होईल. जवळच्या मित्राची भेट होईल. परीक्षा स्पर्धेत यश मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन सहकारी मिळतील. उगाच कोणाच्या बोलण्यात अडकू नका. अन्यथा व्यवसायात अडथळे येऊ शकतात. संगीत, कला, नृत्य इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना विशेष यश मिळेल. वृषभ राशी आज तुमची आर्थिक स्थिती थोडी खराब असेल. पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यवसायातील स्पर्धेमुळे उत्पन्न कमी होईल. कुटुंबात जास्त खर्च होईल. कुटुंबातील सर्व सदस्यांना ऐषारामात अधिक रस असेल. त्यामुळे लक्झरी वस्तूंवर खूप पैसा खर्च होईल. मिथुन राशी आज तुमची मित्राशी मैत्री गाढ होईल. प्रेमसंबंध सुधारतील. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या लोकांना सकारात्मक उत्तर मिळेल. दूरच्या देशातून किंवा परदेशातून प्रिय व्यक्तीबद्दल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजपचे आ.नितेश राणे नेहमीच विविध वक्तव्याने चर्चेत येत असतांना आता धर्मांतर विरोधी कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी  , देशातील सर्वात कठोर धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात आणला जाणार असल्याचे म्हटले. महाराष्ट्र मंत्रिमंडळात सरकार लवकरच यावर निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात अनेक लव्ह जिहादची प्रकरणे नोंदवली गेली होती, परंतु आता राज्यातील माता, बहिणी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी देशातील सर्वात कठोर धर्मांतर विरोधी कायदा आणला जाणार असल्याचे म्हटले आहे. नितेश राणे म्हणाले, “वादळ निर्माण करणाऱ्या या जिहादींनी एकदा समजून घ्यावे की हे हिंदूत्ववादी सरकार आहे. जर लव्ह जिहाद केला तर सरकार जे काही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरण मंत्री मुंडे यांच्या अंगलट येत असतांना दिसत आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राज्याचे राजकारण तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या कि, धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात तब्बल 275 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दमानिया यांनी पोलखोल केली. या योजनेअंतर्गत सरकार जे पैसे देते, त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय, त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, असा दावा दमानिया यांनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात बीड खुन प्रकरणी वातावरण तापले असतांना आता दुसरा वाद समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या एका वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले,” असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला. यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील राहुल सोलापूरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले होते? अभिनेते…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मैदानात महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलीच लढत रंगली होती तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्यानंतर ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात दाखल होत असतांना आता पुन्हा एकदा भाजपने ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का दिला आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत इंडिगोचे कर्मचारी आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबई व गोवा विमानतळावरील २ हजार कर्मचारी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या संघटनेला चांगलाच धक्का बसला आहे. युनियन क्षेत्रात याआधी आम्ही काम केलं नाही, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करतो . पण…

Read More