धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चोपडा रोडवर आज गुटख्याची गाडी पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी ही कारवाई केली आहे. चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले हे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धरणगाव येथे नियोजित कार्यक्रमासाठी येत होते. याचवेळी क्रीडा संकुलजवळ एक संशयित वाहन त्यांना आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात विमल गुटखा, सिगारेट, सुगंधी सुपारी यासह विविध पदार्थ आढळून आलेत. यावेळी पोलिसांनी संतोष राजेंद्र चौधरी (रा. धरणी चौक, धरणगाव) या संशयितास ताब्यास घेतले. संशयितास ताब्यात घेतल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी त्याच्या घराची देखील झाडाझडती घेतली. त्यात आणखी दोन-तीन पोते भरून माल आढळून…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था ईडीच्या रडारवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे आले आहेत. रोहित पवार यांच्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशीस सुरुवात झाली आहे. आधी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेंही सध्या कारागृहात असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील कारागृहात आहेत. त्यातच आता ईडीकडून रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे. रोहित पवार यांच्यासह राकेश वाधवान हे देखील कंपनीच्या संचालकपदी होते. यामध्ये बाबासाहेब सुर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. शिवाय ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स…
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे खिरोदा प्र.यावल येथे आज दि २७ ऑगस्ट २०२२ रोजी कै.राजराम इच्छाराम चौधरी (गुरुजी) यांचे स्मरणार्थ “सार्वजनिक व्यायाम शाळा” तसेच “दादासाहेब – भाऊसाहेब व्यापारी संकुल” अशा विकास कामांचे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, श्री.भरत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, महिला आघाडी तालुकाध्यक्षा रेखा बोंडे, नथू धांडे, हरलल कोळी, गोटूभाऊ गाजरे, भाजयुमो सरचिटणीस शुभम पाटील, सरपंच संताबाई भारंबे, उपसरपंच राहुल चौधरी, ग्रा.पं.सदस्य पंकज इंगळे, संजय नेहेते, करुणा चौधरी, सरिता तायडे, पी.आर.चौधरी सर, भरत चौधरी, भास्कर चौधरी, राहूल बडगे यांच्यासह ग्रामस्थ…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर उड्डाणपूलाजवळ एस.टी.बसने समोरून धडक दिल्याने शिवाजी नगरातील तरुणी जखमी झाली आहे. जखमी तरुणीच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शिवाजी नगरातील राशी जगदीश पटेल ही तरूणी मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता दुचाकीने (क्र. एमएच.१९.एए.५९५८) क्रिकेटच्या क्लासला गेली होती. क्लास संपवून ती सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने घराकडे जाण्यासाठी निघाली. याचवेळी शिवाजीनगर उड्डाणपूलाजवळ इदगावकडून आलेल्या एसटी बसने तिच्या दुचाकीला समोरून धडक दिली. हा अपघात होताच राशी ही जखमी होऊन बेशुध्द झाली. त्यानंतर तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था न्यायमूर्ती उदय उमेश ललित आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश झालेत. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. दरम्यान, नवीन न्यायमूर्ती ललित यांचा कार्यकाळ केवळ 74 दिवसांचा असेल. ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. राष्ट्रपती भवनात आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, कायदा मंत्री किरेन रिजिजू, माजी सरन्यायाधीश एनव्ही रमना, सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायाधीश आणि न्यायमूर्ती ललित यांचे कुटुंबीय उपस्थित होते. तत्पूर्वी काल शुक्रवारी मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना निरोप देण्यात आला. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या हा चिंतेचा विषय असल्याचे रमणा यांनी आपल्या निरोपाच्या भाषणामध्ये सांगितले. साधे वकील…
जळगाव : प्रतिनिधी जैन स्पोर्टस अॅकडमी आयोजित तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. पुरस्कृत 12 वर्षाखालील आंतरशालेय जैन चँलेंज जिल्हास्तरीय कॅरेम स्पर्धेत मुलींच्या गटात विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिने कुणालाही एकही गुण न मिळू देता एकतर्फी विजय मिळवित अंतिम फेरीत अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलच्या पुर्वी भावसार हिचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. तसेच मुलांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलचा पियुष भुईकर याने रायसोनी पब्लिक स्कूलच्या ऋतिक अग्रवालचा पराभव करून विजेते पद प्राप्त केले. मुलींमध्ये् विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या श्रावणी मोरे आणि पुर्वा भुतळा यांनी तसेच मुलांमध्ये अॅंग्लो उर्दू हायस्कूलचा माज पठाण आणि रायसोनी पब्लिक…
जळगाव : प्रतिनीधी संबळचा तालबद्ध सूर… ऋषभराजाला पांघरलेले झूल… पायातील घुंगरू गळ्यातील घंट्याचा एक स्वर… डौलात निघालेली मिरवणूक… पावरी नृत्य, आदिवासी नृत्य सोंग व घोडा, गुरख्या डेंगा… हनुमान पार्वती मोर नंदीनृत्याविष्कार.. ढोल बाजाचा गजर… ऋषभराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक सहकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद… ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशन अध्यक्ष श्री. अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्या फुगडीसह… विदेशी नागरीक डॅनियल हदाद (इस्त्राईल) यासह मान्यवरांनी, अनुभूती स्कूलचे विद्यार्थ्यांनी, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्यांवर नृत्यांसह ठेका धरत आनंद द्विगणीत केला. जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास केंद्रावर बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. जैन…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील अभोणे गावात दारूच्या नशेत असलेल्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात बैल पूजनाची लोखंडी पास डोक्यात घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दि. 26 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील अभोणे गावात बैल पोळा सण उत्साह साजरा केला असताना दुसरीकडे अवघ्या तालुक्याला हादरवणारी घटना घडली. मोठा भाऊ पिंटू तुकाराम पाटील (३८) व लहानभाऊ शिवाजी तुकाराम पाटील (३२) हे घरी बैल पूजनासाठी आले. लहान भाऊ शिवाजी पाटील याने दारूच्या नशेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, लहानभाऊ…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील लोणवाडी येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पोळ्याच्या दिवशीच तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनोद वसंत चौधरी (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पिंपळगाव देवी रस्त्याजवळील बोरलोन या ठिकाणी असलेल्या तलावात, ते बैल धुण्यासाठी गेले होते. बैलांना अंघोळ घालत असताना अचानक बैल बिथरले. तसेच बैल तलावातील खोल पाण्यात शिरले. यावेळी शेतकरी विनोद चौधरी यांनी बैलांचा दोर धरून ठेवलेला होता. त्यामुळे ते देखील बैलांसोबत पाण्यात ओढले गेले. तलावातील गाळामधे फसत असल्याचे लक्षात, आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी विनोद चौधरी यांना तलावाबाहेर काढले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील कराडी येथे शेतमजूर सालदारचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील बैताकवाडी येथील रुख्माबाई कमल चव्हाण (वय ३२, ता. पानसमेल, जि. बडवानी) यांनी या संदर्भात पारोळा पोलिसांत फिर्याद दिली अाहे. त्यात म्हटले अाहे की, कमल चव्हाण हे दोन वर्षांपासून तालुक्यातील कराडी येथे बबलू पाटील यांच्या शेतात सालदारकीचे काम करत हाेते. बबलू पाटील यांनी या कमल चव्हाण यांना घर बांधून दिले असून ते परिवारासह तेथे राहत होते. १७ मे रोजी शेतात मिरची लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी रुख्माबाई घरी पाणी पिण्यास आली असता बबलू पाटील…

