Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महायुतीचा विजयाचा जल्लोष; नंदकिशोर महाजन विधान परिषदेत
    जळगाव

    महायुतीचा विजयाचा जल्लोष; नंदकिशोर महाजन विधान परिषदेत

    editor deskBy editor deskJune 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा तब्बल ५७७ मतांच्या फरकाने पराभव केला. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाजन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. या निकालामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    जिल्ह्यातील एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणीसाठी प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली होती.

    दरम्यान, मतमोजणी सुरू असताना महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी काही वैध मते अवैध ठरविण्यात आल्याचा आरोप करत मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला. तसेच प्रशासन आणि भाजपमध्ये मिलीभगत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यामुळे काही काळ मतमोजणी केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व आक्षेपांची नोंद घेत नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केली.

    अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर नंदकिशोर महाजन यांनी तब्बल ५७७ मतांच्या फरकाने विजय मिळवत विधान परिषदेत दमदार प्रवेश केला. या विजयामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

    निकालानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी हा विजय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महायुती सरकारच्या विकासकामांवर मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास असल्याची प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निकालाचा सखोल आढावा घेऊन पुढील रणनीती ठरविणार असल्याचे सांगितले.  जळगाव विधान परिषद निवडणुकीचा हा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात असून, जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

    June 22, 2026

    मोहोडी-गुरु पेट्रोल पंप मार्गाच्या दुरुस्तीसाठी वैशाली अमित पाटील यांचे निवेदन; आयुक्तांची तत्काळ दखल, अधिकाऱ्यांना सूचना

    June 21, 2026

    पहाटेचा भीषण स्फोट : गॅस सिलिंडर फुटून महिलेचा होरपळून मृत्यू; ९ जणांना नागरिकांनी वाचवले !

    June 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.