Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था : राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीत होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंट किंवा व्यावसायिक बांधकामांना परवानगी देताना अधिक कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत परवानगीशिवाय उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी संबंधितांना ६० दिवसांची मुदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुदतीत बांधकाम न हटवल्यास प्रशासनाकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.महामार्गाच्या कडेला अनधिकृतपणे उभारलेले ढाबे, हॉटेल, दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे महामार्गाची सुरक्षितता आणि वाहतुकीची सुरळीतता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे.नवीन ढाबे किंवा हॉटेल सुरू करण्यापूर्वी संबंधितांना राष्ट्रीय…

Read More

प्रतिनिधी जळगाव : नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली ठेकेदारांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणात ४०० ते ५०० कोटी रुपयांच्या बनावट ऑर्डर्सचा दावा करण्यात आला आहे.कुंभमेळ्याची कामे ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होत असताना काही व्यक्तींनी नाशिक महापालिका आणि कुंभमेळा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.या प्रकरणातील काही ठेकेदारांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर या प्रकरणातील संशयितांचे ‘जामनेर कनेक्शन’ असल्याचा दावा पुढे आला आहे.महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जामनेर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्युज : धरणगाव तालुक्यातील तरडे येथील विकास सोसायटीच्या चेअरमनपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत रंजनाबाई नंदलाल हिलाल पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.सोसायटीच्या सभासदांनी एकमताने रंजनाबाई नंदलाल पाटील यांच्या नावाला पसंती दिल्याने चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ, सोसायटीचे सभासद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.निवडीनंतर रंजनाबाई नंदलाल पाटील यांनी येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य देत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच सोसायटीला अधिक सक्षम आणि प्रगत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या अडचणींना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या हितासाठी काम…

Read More

पाळधी प्रतिनिधी : शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेना व शिवशक्ती कामगार सेनेच्या धरणगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सुनील राजेंद्र बिरले यांची धरणगाव तालुकाध्यक्षपदी, तर मनोज शांताराम महाजन यांची धरणगाव शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.जिल्हाध्यक्ष सुमित पाटील व जिल्हा उपाध्यक्ष समाधान वाघ यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हाध्यक्ष सुमित पाटील व राष्ट्रीय उपाध्यक्ष अशपाक शाह यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.शिवशक्ती वाहतूक सेना व कामगार सेना वाहनचालक, वाहनमालक तसेच परिवहन क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत आहे. वाहनचालकांच्या अडचणी, आरटीओशी संबंधित प्रश्न, परवाने, विमा, सुरक्षितता आणि इतर समस्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा…

Read More

स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० ला नवी गती; राज्यभर वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या सविस्तर मार्गदर्शक सूचनाधरणगाव / मुंबई, दि. ५ : स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत राज्यातील वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापन प्रकल्पांच्या प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी नगर विकास विभागाने दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, मलजल प्रक्रिया केंद्रे (STP), मलजल वाहिनी जाळे (Sewer Network) आणि नाला अडवणे व वळवणे (Interception & Diversion) यांसारख्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय नामांकित संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), तांत्रिक मान्यता, गुणवत्ता नियंत्रण, संचालन व देखभाल याबाबत स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. शासनाच्या…

Read More

जळगाव प्रतिनिधी : शहरातील १०३ निमखेडी शिवारातील वादग्रस्त खुल्या भूखंडाबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी जळगाव महानगरपालिकेचे महापौर व आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत संबंधित जागेचा पंचनामा करण्यात आला होता.पंचनाम्यात अतिक्रमण आढळल्याचा निष्कर्षअतिरिक्त आयुक्त सौ. बाविस्कर यांच्या आदेशानुसार नगररचना विभागाचे नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता अतुल पाटील, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर व मनपा कर्मचाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी जागेवरील खोल्यांचे मोजमाप करण्यात आले. पाहणीदरम्यान काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्य साठवलेले आढळले, तर काही ठिकाणी नागरिक वास्तव्यास असल्याचेही निदर्शनास आले.पंचनाम्यानंतर नोटीस देण्यास तब्बल एक महिन्याचा विलंबसंबंधित जागेचा पंचनामा…

Read More

पाळधी-तरसोद सेवा रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरGPS मित्र परिवाराचे NHAI ला निवेदन; १५ ऑगस्टपर्यंत उपाययोजना न झाल्यास ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा पाळधी, ता. धरणगाव : पाळधी ते तरसोद या सेवा रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सेवा रस्त्यावर आवश्यक सुरक्षाविषयक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी GPS मित्र परिवार, पाळधी यांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) जळगाव कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पाळधी-तळसोड सेवा रस्त्यावर गेल्या काही वर्षांत अनेक गंभीर अपघात घडले असून, त्यात अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षाव्यवस्था बळकट करणे…

Read More

धरणगाव | प्रतिनिधीआगामी गणेशोत्सव, यात्रा महोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता समितीची बैठक पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.बैठकीला शांतता समिती, मोहल्ला कमिटी, पोलीस मित्र, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, समाजप्रमुख आणि पत्रकार उपस्थित होते. यावेळी वरिष्ठांकडून प्राप्त सूचनांनुसार सण-उत्सव काळात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून कोणतीही उपयुक्त माहिती तातडीने धरणगाव पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी केले.बैठकीत शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पी. एम. पाटील, ॲड. वसंतराव भोलाने, आर.…

Read More

विजय पाटील :जळगाव प्रतिनिधी : गिरणा मोठा प्रकल्पात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने आज, 31 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता गिरणा धरणाचे दरवाजे उघडून 1,000 ते 2,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी दिली आहे.आज दुपारी 12 वाजेपर्यंत धरणात 97.06 टक्के पाणीसाठा झाला असून, सध्या धरणात 10,000 ते 15,000 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्गातही वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.यामुळे गिरणा नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठावरील पशुधन, शेतीतील मोटार पंप, साहित्य व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात…

Read More

एरंडोल | प्रतिनिधी : अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंजनी धरणातून कोणत्याही वेळी अंजनी नदीपात्रात अतिरिक्त पाणी सोडण्यात येऊ शकते, असा इशारा पाटबंधारे उपविभाग, एरंडोल यांनी दिला आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी ३१ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत सरपंच, पोलिस पाटील आणि नदीकाठच्या गावांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. पत्रानुसार, धरणातील आवक लक्षात घेऊन कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाईल. त्यामुळे अंजनी नदीकाठील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व मालमत्ता सुरक्षित ठिकाणी हलवावी आणि कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच…

Read More