Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत घेतलेल्या कृषी पीक कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसीसह आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात केले.या योजनेनुसार दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ होणार आहे. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत उर्वरित कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.जिल्ह्यात सुमारे ८७ हजार ८२६ कर्जखाती पात्र असून त्यापैकी ६५ हजार ३४३ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा…

Read More

विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : वाढदिवस साजरा करताना करूया विचार, पडत्या पावसात देऊया गरजूंना आधार. हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत जळगाव महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवला.वाढदिवसानिमित्त बुके, केक, बॅनर यावर अनावश्यक खर्च न करता तो निधी गरजूंसाठी वापरण्याचे आवाहन त्यांनी आपल्या मित्रपरिवाराला केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंप्राळा स्टॉप येथे आयोजित कार्यक्रमात वार्डातील सफाई कर्मचारी, आशा वर्कर, वायरमन आणि पोस्टमन यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोटचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे समाजातील कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी मा. अमर जैन, अतुल बारी, सागर पाटील, रवींद्र…

Read More

विजय पाटील जळगाव : जिल्ह्यात बहुचर्चित शालार्थ आयडी जवळपास 638 शिक्षकांचे असून यात अमळनेर हे केंद्रबिंदू आहे. विशेष म्हणजे मनोज वर विश्वास ठेवून मराठा समाजाच्या अनेक मातब्बर नेत्यांनी या बोगस शालार्थ आयडी मध्ये सहभाग घेतला आहे त्यामुळे मोठ्या अडचणी मराठा समाजाच्या नेत्यांच्या वाढले आहेत.कार्यालयीन सचिव दिपक गरुड यांनाही नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जवळपास या गुन्ह्यात बाराशे संशयित आरोपी असून सर्वाधिक आरोपींची संख्या जळगाव जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात 842 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तयार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात 638 शिक्षक तर कर्मचाऱ्यांचे आयडी आढळले आहे. विशेष म्हणजे संजय गरुड यांना आयडी तयार करून देण्यास…

Read More

विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्युज : बहु चर्चित शालार्थी आयडी घोटाळ्यात मराठा समाजाचे नेते तथा शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरुड यांना अटक झाली आहे यांच्या पाठोपाठ सहकार क्षेत्रातील डॉन जळगाव शहरात व ग्रामीण वर हात ठेवणारे नेतृत्व म्हणजेच मनोज हा देखील लवकरच या घोटाळ्यात अडकणार आहेत. मनोज पाठोपाठ पारोळा व मुक्ताईनगर येथील मराठा समाजाच्या दोन मातब्बर नेत्यांची विकेट पडणार आहे. शालार्थ आयडी घोटाळा चौकशी एसआयटी मार्फत सुरू असून यात बहुतेक मराठा समाजाचे नेते मंडळी अडकलेले आहे. संजय गरुड यांनी लोकसभेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर या शालार्थ या आयडी घोटाळ्यात संजय गरुड हे…

Read More

चाळीसगावमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्नचाळीसगाव, दि. २७ : शेतकरी समृद्ध होणे ही राज्य शासनाची प्राथमिकता असून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले गिरणा नदीवर बलुन बंधाऱ्याऐवजी राज्य शासनाच्या अखत्यारीत सुमारे ₹९०० कोटी खर्चून पारंपरिक पद्धतीचे आठ बंधारे उभारले जाणार आहेत. लवकरच याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, या कामांमुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आणि धरणगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचनाचा लाभ मिळेल, अशी घोषणा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केली.आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव शहर व तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या सुमारे ६० कोटींच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राज्याचे पाणीपुरवठा व…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्युज : नाशिक विभागातील बहुचर्चित १६० कोटी रुपयांच्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) आणखी एक मोठी कारवाई करत जळगावचे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक केली आहे. त्यांना धुळे येथून ताब्यात घेण्यात आले असून, नाशिक रोड पोलिसांनी ही कारवाई केली. तपासानुसार, बनावट शालार्थ आदेश आणि बोगस शालार्थ आयडींच्या माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनेक बनावट शिक्षकांची नोंद करून वेतन आणि थकबाकीची रक्कम काढण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या घोटाळ्याचा तपास सुरू असून, आणखी काही शिक्षणाधिकारी, संस्थाचालक आणि संबंधित व्यक्तींची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. SITकडून पुढील…

Read More

जळगाव | प्रतिनिधीजळगाव शहरातील दुभाजकांवर (डिव्हायडर) लावण्यात आलेल्या भंगाळे गोल्डच्या नियमबाह्य जाहिरात फलकांवर अखेर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत संबंधित फलक हटवले. सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर उपायुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.महानगरपालिकेने शहरातील विविध दुभाजक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO) आणि उद्योजकांना निश्चित अटी व शर्तींवर विकसित करण्यासाठी दिले होते. या करारानुसार जाहिरात फलकांमध्ये किमान १० मीटरचे अंतर ठेवणे, फलकांवर ४० टक्के जागा मनपाच्या जनजागृती व सार्वजनिक हिताच्या जाहिरातींसाठी राखीव ठेवणे आणि उर्वरित ६० टक्के जागेवर संबंधित संस्थेची किंवा व्यावसायिकांची जाहिरात करण्याची अट होती. तसेच सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जाहिरात फलक लावण्यापूर्वी मनपाची…

Read More

विजय पाटील :लाईव्ह महाराष्ट्र न्युज : वयाच्या अल्पावधीत शैक्षणिक संस्थांचे जाळे गावागावात विखरणारे शिक्षण क्षेत्रातील डॉन आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना खिशात घेऊन काम करणारा जळगाव ग्रामीणचा रहिवासी डॉन मनोज यांच्यावर कुठल्याही क्षणी नाशिकच्या पथकाकडून कारवाई होण्याची संकेत व्यक्त होत आहे दरम्यान मोबाईल स्विचऑफ असून फरार म्हणजेच अज्ञात ठिकाणी डॉन मनोज लपून बसला असल्याचे समजते.शालार्थ आयडी प्रकरणाचे जाळे हळूहळू जळगाव जिल्ह्यात पोहोचले असले तरी जळगाव ग्रामीणचा मनोज नावाचा मोठा डॉन लवकरच रडारवर असून काही प्रमाणात दोन महिन्यापासून राजकीय नेत्याच्या पीए कडून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु त्या पीएची सुपारी आता फेल जाणार असून अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेंदुर्णी एज्युकेशन…

Read More

अमळनेर प्रतिनिधी : सत्ता महत्त्वाची नाही, तर विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा आवाज महत्त्वाचा आहे, अशी भूमिका घेत अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे माजी सभापती तथा भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी श्याम जयवंतराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी भाजपचे जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याकडे पाठवले आहे.राजीनामा पत्रात श्याम पाटील यांनी दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद भवन परिसरात शिक्षण, भविष्य आणि न्यायाच्या मागणीसाठी शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिसी कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आल्याने आपण व्यथित…

Read More

विजय पाटील : भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याचा राग मनात धरून पतीने तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले.मृत महिलेचे नाव ललिता आत्माराम राठोड (वय ३६) असून, आरोपीचे नाव आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०, रा. वसंतवाडी तांडा) असे आहे.प्राथमिक माहितीनुसार, आत्माराम राठोड याने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, ललिता यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने घरातील धारदार चाकूने त्यांच्या पोटावर वार…

Read More