Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोहोडी-गुरु पेट्रोल पंप मार्गाच्या दुरुस्तीसाठी वैशाली अमित पाटील यांचे निवेदन; आयुक्तांची तत्काळ दखल, अधिकाऱ्यांना सूचना
    जळगाव

    मोहोडी-गुरु पेट्रोल पंप मार्गाच्या दुरुस्तीसाठी वैशाली अमित पाटील यांचे निवेदन; आयुक्तांची तत्काळ दखल, अधिकाऱ्यांना सूचना

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJune 21, 2026Updated:June 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील मोहोडी रस्ता ते गुरु पेट्रोल पंप मार्गे पाचोरा रोडवरील मलंग शाह बाबा दर्गा परिसरातील सुमारे ३०० मीटर लांबीच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

    नगरसेविका वैशाली पाटील यांनी दिलेल्या निवेदनात संबंधित रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याचे नमूद केले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग परिसरातील नागरिक, व्यापारी, शाळकरी विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर वापरत असल्याने अपघाताचा धोका वाढला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

    विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक महिला आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. रस्त्यावरील धूळ, खड्डे आणि असमतल पृष्ठभागामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.

    स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनाने तात्काळ पाहणी करून अंदाजे ३०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण व आवश्यक दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घ्यावीत, अशी मागणी नगरसेविका वैशाली पाटील यांनी केली होती.

    दरम्यान, निवेदनाची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्तांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. याबद्दल नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांचे तसेच जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

    नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पहाटेचा पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ऑपरेशन ड्रॉप केसमध्ये ८ आरोपी जेरबंद, ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त !

    June 19, 2026

    गौमांस वाहतुकीच्या संशयावरून तणाव; तरुणांवर जीवघेणा हल्ला

    June 19, 2026

    मुंबईत जळगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नशिराबादवर शोककळा

    June 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.