विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव विधान परिषद ची निवडणुकीचा राजकीय इतिहास पाहिला तर अनेक नेत्यांचे बेरजेचे राजकारण वजाबाकी झाले असल्याचा इतिहास ताजा आहे. आता होऊ घातलेल्या या निवडणुकीनंतर भाजपाची दिशा कुठल्या नेत्यांची फिरेल हे सांगणे अवघड आहे परंतु राजकीय इतिहास पाहता व नंदू महाजन यांची उमेदवारी म्हणजे भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे.
अगदी वीस वर्षांपासून चा राजकीय विधान परिषदेचा इतिहास पाहिला तर या निवडणुकीनंतर नेतृत्व अडचणीत येतं किंवा बदलविले जाते असा राजकीय इतिहास आहे. माजी खासदार ए टी पाटील व माजी आमदार गुरुमक जगवानी यांची 2004 ची निवडणूक झाल्यानंतर तेव्हाच्या राष्ट्रवादीमध्ये नेतृत्व बदल झाले होते. त्यानंतर माजी आमदार मनीष जैन व निखिल खडसे यांची राज्यात चर्चेत ठरली अशी निवडणूक लढत झाली या निवडणुकीनंतर संघर्षाचा काळ सुरू झाला यात निखिल खडसे पराभूत झाल्यानंतर घरकुल घोटाळ्याची फाईल उघडली गेली अनेक नेत्यांना न्यायालयाचा व तुरुंग वारीचा सामना करावा लागला.
त्यानंतर पोट निवडणूक लागली यात यात माजी आमदार गुरुमुख जगवाणी निवडून आले. यानंतर मात्र भाजपाचे नेते एकनाथराव खडसे यांना अडचणीचा काळ सुरू झाला . अवघ्या दोन ते तीन वर्षातच त्यांना पक्षांतर करावे लागले हा राजकीय इतिहास आहे. माजी आमदार चंदूभाई पटेल यांची निवडणूक झाल्यानंतर भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचा घोटाळा बाहेर निघाला यात मंत्री गिरीश महाजन भाजपाच्या अनेक नेत्यांना अडचणीचा सामना करावा लागला थोडक्यात राज्यात सत्तांतर झाल्यामुळे ते नशीबवान ठरले.
आता विधान परिषदेची निवडणूक सुरू झाली आहे अपेक्षेप्रमाणे डॉक्टर केतकी पाटील यांची उमेदवारी ऐन वेळेस कट करण्यात आली यामागे फार मोठे राजकीय षड्यंत्र रचले गेले. आणि जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या विरोधात इच्छा नसताना भाजपाच्या नेत्यांना विश्वासात न घेता भाजपातील जळगाव जिल्ह्यातील बी टीमने नंदू महाजन यांची उमेदवारी थेट दिल्लीतून फायनल केली हा राजकीय इतिहास आहे.
आता या निवडणुकीनंतर भाजपातील नेत्यांचे काय होणार सत्ता समीकरण कसे बिघडणार किंवा वर्चस्व कायम राहणार याकडे लक्ष लागून आहे परंतु विधान परिषद निवडणुकीच्या इतिहास विसरता कामा नये.



