लाईव्ह महाराष्ट्र न्युज : फैजपूर शहरातील नगरसेवक हाजी अनवर खाटीक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली असून, मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात त्यांना निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाने तसेच आमदार एकनाथराव खडसे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा नेते रवींद्र पाटील, श्रीराम पाटील आणि माजी आमदार संतोष चौधरी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न; तहसीलदारांनी स्वीकारले निवेदन, मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासनलाईव्ह महाराष्ट्र न्युज : वसंत सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली वसंत सहकारी साखर कारखाना बचाव सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला तालुक्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर नेते, शेतकरी, कारखान्याचे सभासद, कामगार आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तीव्र आक्रोश व्यक्त केला. आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती गंभीर बनली. शेतकऱ्यांच्या या तीव्र भावना आणि आंदोलनाची दखल घेत प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांनी उपस्थित शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी वसंत सहकारी साखर कारखान्याचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील बिबा नगर परिसरात अवैधरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई करत दोन महिला व एका पुरुषाला ताब्यात घेतल्या असून या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन विभागीय पोलीस अधिकारी सह्याद्री बिरले यांनी त्यांच्या पथकासह जळगाव शहरात सुरू असलेल्या बिबा नगर येथे सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर छापा टाकला. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता केली. दरम्यान या कारवाईमध्ये पोलिसांनी काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या असून दोन महिला व एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या संदर्भात जळगाव तालुका पोलीस…
१६ ड्रेनेजचे सांडपाणी तलावात जाण्याचा प्रश्न; गणेश विसर्जनापूर्वी दोन पंप हाऊस सुरू करण्याच्या सूचनाविजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव शहराचे वैभव आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या मेहरूण तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तलावात शहरातील गटारीचे सांडपाणी जाणार नाही, यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.उपमहापौर मनोज सुरेश चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका वैशालीताई पाटील, नगरसेवक नितीन सपके, नगरसेवक अमर जैन आणि नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.मेहरूण तलावात एक-दोन नव्हे तर तब्बल १६ ड्रेनेजचे सांडपाणी सोडले जात…
शासकीय कार्यालये, व्यापारी आणि व्यावसायिकांकडून पैसे उकळण्याचे आरोप; ओळखपत्राचा धाक दाखवून वसुली सुरू असल्याची चर्चाजळगाव (विशेष प्रतिनिधी) — जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कथित ‘तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट वाढल्याची चर्चा आहे. पत्रकारितेच्या नावाखाली शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी तसेच विविध व्यावसायिकांना ओळखपत्राचा धाक दाखवून पैशांची मागणी केली जात असल्याचे आरोप पुढे येत आहेत. या प्रकारांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि व्यावसायिकांकडून होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पत्रकारितेचा किंवा प्रसिद्धीचा दबाव आणत असल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी…
संस्थापक दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचेही होणार लोकार्पण विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव तर्फे गुरुवारी, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दूध संघाच्या प्रांगणात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून दूध संघाचे संस्थापक चेअरमन व माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण लोकार्पण करण्यात येणार आहे.याचबरोबर शेतकरी प्रशिक्षण केंद्राची नूतनीकरण झालेली इमारत तसेच मुख्य दुग्धशाळेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण आणि वाढीव क्षमता प्रकल्पाचे उद्घाटनही याप्रसंगी पार पडणार आहे.राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन…
जळगाव प्रतिनिधी :जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगाव येथे दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये युवाशक्ती फाउंडेशन, जळगाव व लिग्रेंड प्रा. लि जळगाव असे नांमाकीत उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास १० वी, १२वी, ग्रॅज्युएट इत्यादी पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या महा स्वयंरोजगार व रोजगार पोर्टल या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेली असल्यास आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉग-इन करून उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. ज्या उमेदवारांनी अद्याप नाव नोंदणी…
धरणगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या वतीने मागील तीन वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामात पीक पाहणीचे काम करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील पीक पाहणी सहाय्यकांनी थकीत मानधन मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन सादर केले.मागील तीन वर्षांपासून पीक पाहणीचे काम करूनही मानधन थकीत असल्याने सहाय्यकांमध्ये नाराजी आहे. दरवर्षी मानधन नियमित मिळावे, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.याशिवाय नैसर्गिक आपत्ती तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून सुरक्षा कवच मिळावे, सर्व पीक पाहणी सहाय्यकांना शासकीय ओळखपत्र देण्यात यावे, शेतातील पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र मिळण्याबाबत शासन स्तरावरून स्पष्ट आदेश काढण्यात यावेत, पीक पाहणीसाठी 5G मोबाईल उपलब्ध करून द्यावा आणि सर्व सहाय्यकांना विमाकवच लागू…
सतखेडा गावच्या भगवान नन्नवरे यांना वकिलीची सनदसतखेडा येथील कष्टकरी कुटुंबातील भगवान अंकुश नन्नवरे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण करून वकिलीची सनद मिळवली आहे. मुंबई कोर्टात वकील म्हणून ते आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत.भगवान नन्नवरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरणास्थान मानून शिक्षण आणि संघर्षाचा मार्ग स्वीकारला. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर शिक्षण पूर्ण केले.त्यांचे वडील अंकुश नाना यांनी हातमजुरी व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. कष्टकरी कुटुंबातून आलेल्या भगवान यांनी मिळवलेल्या या यशामुळे नन्नवरे कुटुंबासह सतखेडा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.भगवान नन्नवरे यांच्या यशाचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वकिलीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा…
शालार्थ घोटाळ्यात जळगाव ‘हॉटस्पॉट’; ८४९ शिक्षक-कर्मचारी तपासाच्या रडारवरलाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या सुमारे १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात जळगाव जिल्ह्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील तब्बल ६६ शिक्षण संस्थांचा समावेश असल्याचे तपास यंत्रणेच्या दोषारोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने सुमारे ११ हजार पानांचे दोषारोपपत्र नाशिक रोड न्यायालयात दाखल केले आहे. दोषारोपपत्रात राज्यातील एकूण १११ शिक्षण संस्थांचा उल्लेख असून, त्यापैकी ६६ संस्था जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे, प्रकरणातील एकूण १,१९९ संशयितांपैकी ८४९ जण जळगाव जिल्ह्याशी संबंधित आहेत. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष आणि सचिव यांचा समावेश असल्याचे…

