जळगाव | प्रतिनिधी: शहरातील आर.एल. चौफुली परिसरात रविवारी दुपारी अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात अयोध्या नगर येथील रहिवासी संदीप सुपडू अलकरी (वय ४८) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संदीप अलकरी हे एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. रविवारी दुपारी काम आटोपून ते नेहमीप्रमाणे दुचाकीने आपल्या घरी परतत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आर.एल. चौफुली येथे अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव जिल्ह्यातील 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीरविजय पाटील जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी 24 जुलै 2026 रोजी प्राप्त झाली असून जळगाव जिल्ह्यातील एकूण 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आले आहे. या पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव, संस्थेचे कार्यालय तसेच बँक स्तरावर उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे अग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार केंद्र/सीएससी केंद्रावर जाऊन…
धरणगाव प्रतिनिधी : आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी भाविकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या उधना–मिरज (पंढरपूर) विशेष रेल्वेचे धरणगाव रेल्वे स्थानकावर शिवसेना व युवासेनेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या प्रेरणेने तसेच जिल्हा परिषद सदस्य युवा नेते प्रतापराव (प्रतापभाऊ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.विशेष रेल्वे धरणगाव स्थानकावर दाखल होताच वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना प्रेमपूर्वक फराळाचे वाटप करण्यात आले. अल्पावधीत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या उपक्रमाला वारकरी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सेवाभावातून आयोजित करण्यात आलेल्या या…
दिंडी, पालखी, नाटिकेतून वारकरी संस्कृतीची ओळख; ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा हरित संदेशजळगाव प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (प्रायमरी) व अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (सेकंडरी) येथे दिंडी सोहळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी व दिंडीत सहभागी होत प्रत्यक्ष वारीचा आनंद अनुभवला.यावेळी विद्यार्थ्यांनी “पंढरीचा पांडुरंग विटेवर का उभा आहे?” या विषयावर आधारित विशेष नाटिका सादर केली. या नाटिकेतून वारकरी संप्रदायाचा इतिहास, संत परंपरा, भक्ती आणि विठ्ठलभक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. शाळेच्या प्राचार्या रेश्मी लाहोटी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना…
मुक्ताईनगरकडे गुटख्याची वाहतूक उधळली; बुलढाणा जिल्ह्यातील दोन आरोपी ताब्यातजळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, एक चारचाकी वाहन आणि दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासासाठी त्यांना मुक्ताईनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. एमएच-३० एझेड-४६६४ क्रमांकाच्या मारुती सुझुकी अर्टिगा वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक…
पाचोरा-भडगाव मतदारसंघ चाळीसगावला जोडण्याच्या हालचालींवर आमदार किशोर पाटील यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची चेतावणी पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघाला प्रस्तावित चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्याच्या हालचालींना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शुक्रवारी दुपारी ‘शिवालय’ शिवतीर्थ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, “हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. “आमदार पाटील यांनी सांगितले की, चाळीसगाव शहराला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय देण्यास त्यांचा विरोध नाही. मात्र पाचोरा-भडगाव मतदारसंघ त्याला जोडणे म्हणजे येथील नागरिकांवर अन्याय करणारा निर्णय ठरेल. जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, सत्र न्यायालय, कृषी व समाजकल्याण विभाग अशी महत्त्वाची कार्यालये असल्याने नागरिकांची कामे एका ठिकाणी…
जळगाव प्रतिनिधी: शहरातील पिंप्राळा शिवारातील देवकर नगरजवळील जाणता राजा नगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिव मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा गुरुवारी (दि. १६ जुलै) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या मंदिराचे भूमिपूजन आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी त्यांनी शिव मंदिराच्या उभारणीसाठी परिसरातील नागरिकांचे अभिनंदन करत धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली.कार्यक्रमाला नगरसेवक अतुल बारी, पठाण दादा आणि नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांचा परिसरातील नागरिकांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या सोहळ्याचे आयोजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सपना सोनवणे (कोळी) आणि उपाध्यक्ष सविता पाटील यांनी परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने केले. कार्यक्रमाला…
विजय पाटील जळगाव: सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांचा पदोन्नतीचा मार्ग वाढत्या तक्रारीमुळे बंद झाला असून राजकीय वजनही अपूर्ण पडत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठा लावून देखील प्रशांत सोनवणे यांची पदोन्नती रखडलेली आहे.सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक नेत्यांनी प्रशांत सोनवणे यांच्या विरोधात रान उठवल्यामुळे त्यांच्या पदोन्नतीच्या मार्गात काटे निर्माण झाले आहे. तसेच त्यांच्या अधीक्षक पदाच्या खुर्चीवर प्रभारी म्हणून अमळनेर विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी राऊत यांनी राजकीय नेत्यांकडे फिल्डिंग लावले असून प्रशांत सोनवणे यांच्या खुर्चीला त्यांनी सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे.सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी देखील प्रशांत सोनवणे यांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सार्वजनिक बांधकाम विभाग यामुळे चांगला चर्चेला…
जळगाव | प्रतिनिधीजळगाव शहरातील रस्ते अधिक सुरक्षित, सुशोभित आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या गेल्या दोन वर्षांपासूनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातून अपारंपारिक ऊर्जा विकास लेखाशीर्ष अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीतून अजिंठा चौफुली ते जळगाव विमानतळ या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिव्यांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होऊन वाहनचालक, पादचारी आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे. तसेच शहराच्या सौंदर्यातही लक्षणीय वाढ होणार आहे.या प्रकल्पासाठी आमदार राजूमामा यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा…
विजय पाटील :जळगाव | प्रतिनिधीजळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव शिवाराजवळील महामार्गावर शुक्रवारी भीषण कार अपघात झाला. जामनेरकडून जळगावकडे येणारी भरधाव कार रस्त्याच्या कडेला बंद पडून उभ्या असलेल्या ट्रकवर मागून जोरात धडकली. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला बंद पडलेला ट्रक उभा असताना भरधाव कार थेट त्याच्या मागील बाजूस धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस, स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविले. अपघातातील गंभीर जखमी चौघांना जळगाव येथील शासकीय…

