Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात चोरट्यांच्या टोळीची दहशत; चार चोरटे सीसीटीव्हीत कैद
    क्राईम

    धरणगावात चोरट्यांच्या टोळीची दहशत; चार चोरटे सीसीटीव्हीत कैद

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMay 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


    चिंतामणी मोरया परिसरात तोंडाला मास्क लावलेले चार संशयित चोरटे कॅमेऱ्यात कैद; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


    धरणगाव | प्रतिनिधी
    धरणगाव शहरातील चिंतामणी मोरया परिसरात चोरट्यांच्या टोळीची दहशत निर्माण झाली असून तोंडाला मास्क लावलेले चार संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    पहा सीसीटीव्ही व्हिडीओ


    मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास चार संशयित चोरटे परिसरात फिरताना दिसून आले. यावेळी एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार येताच तिने तत्काळ आरडा-ओरडा केला. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.


    दरम्यान, चोरट्यांनी चिंतामणी मोरया परिसरातील एका बंद घरासह एका छोट्या दुकानाला लक्ष्य केले. बंद घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू हाती लागली नसली तरी दुकानातून काही साड्या तसेच अंदाजे चार ते पाच हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
    परिसरात संशयित चोरटे फिरत असतानाची संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून फुटेजमध्ये चार जण स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी, तसेच चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
    सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

    May 29, 2026

    भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात एसीबीची धडक!

    May 29, 2026

    तुम्ही पिताय ते दूध शुद्ध की कृत्रिम? धक्कादायक प्रकार उघड!

    May 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.