बोदवड चौक ते परिवर्तन चौकापर्यंत धडक; संविधान बचावाच्या घोषणांनी परिसर दणाणलामुक्ताईनगर (प्रतिनिधी मनोज पाटील) : अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध तसेच संविधान बचाव आणि देश बचावाच्या भूमिकेतून मुक्ताईनगर येथे भव्य महामोर्चा काढण्यात आला. बोदवड चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा परिवर्तन चौकापर्यंत काढण्यात आला. यावेळी नागरिक, महिला, आंबेडकरी अनुयायी तसेच बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.मोर्चामध्ये सहभागी आंदोलकांनी निळे झेंडे, भारतीय राष्ट्रध्वज आणि विविध मागण्यांचे फलक हातात घेतले होते. ‘आरक्षण बचाव, देश बचाव’ आणि ‘संविधान बचाव, देश बचाव’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.मोर्चाच्या अग्रभागी ‘अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा’ असा मजकूर असलेला मोठा फलक झळकत होता. तसेच भारतरत्न डॉ.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
ओव्हरलोड कारवाईतील कथित अनधिकृत वसुलीचा मुद्दा ऐरणीवर; कार्यक्षेत्र व महसूलाबाबत स्पष्टतेची मागणीलाईव्ह महाराष्ट्र न्युज : ओव्हरलोड वाहतुकीवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांकडून होत असल्याचा आरोप असलेले कथित ‘कलेक्शन’ नेमके कोणत्या आरटीओच्या हद्दीत जमा होते, त्यावर अधिकार कोणाचा आणि त्याची नोंद व वाटप कोणत्या पद्धतीने केले जाते, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कथित वसुलीच्या हद्दीवरून निर्माण झालेल्या वादाचा परिणाम मालवाहतूक व्यावसायिकांवर होत असल्याची तक्रार वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी जिल्ह्यातील विविध भागांत ओव्हरलोड वाहतुकीसंदर्भात होणारे कथित कलेक्शन जळगाव येथील मुख्य आरटीओ कार्यालयाच्या स्तरावर एकत्रित होत असल्याचे सांगितले जात होते. तालुकानिहाय आरटीओ कार्यालये आणि स्वतंत्र कार्यक्षेत्राची व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतर या पद्धतीत बदल…
भुसावळ : भुसावळच्या राजकारणात आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुंबईतील नंदवन येथे प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे आणि निखिल संतोषभाऊ चौधरी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. भुसावळ आणि जळगावच्या विकासासाठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.या प्रवेशावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील, पाचोरा आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार बच्चूभाऊ…
कोट्यवधींच्या काँक्रीट रस्त्यावर मोठमोठे तडे; निष्पापांचे जीव गेल्यानंतरही कारवाईची प्रतीक्षा विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज जळगाव : पाळधी–तरसोद बायपासच्या कामातील निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातानंतर संबंधित कंत्राटदार कंपनी व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याने निकृष्ट रस्ते कामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणात कारवाई झाल्याचे समोर आले आहे.मात्र, पाळधी ते जळगाव या महत्त्वाच्या काँक्रीट रस्त्याची अवस्था पाहता आता दुसरा प्रश्न उपस्थित होत आहे—या रस्त्याच्या निकृष्ट कामाची जबाबदारी कोणाची?अवघ्या काही महिन्यांपूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या पाळधी–जळगाव मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे तडे व भेगा पडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव शहर महानगरपालिकेला लागून असलेल्या खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या विविध प्रश्नांबाबत जळगाव शहर हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपमहापौर मनोज चौधरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी हॉकर्सच्या समस्या जाणून घेत त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली.निवेदनानंतर उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख दीपकभाऊ सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस राहुल पाटील आणि उपायुक्त गोसावी यांच्या उपस्थितीत खाऊ गल्लीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी हॉकर्स संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.सन २०१४ पर्यंत नोंदणीकृत असलेल्या तसेच नोटरीधारक हॉकर्सचा विशेष विचार करण्यात आला. संबंधित हॉकर्सना गोलाणी मार्केटच्या मागील बाजूस उपलब्ध जागेत व्यवस्थितपणे…
चाळीसगाव (प्रतिनिधी) :चाळीसगाव शहरातील डोंगरी नदीकाठी चामुंडा माता मंदिराजवळ पोलिसांनी कारवाई करत तब्बल १८ किलो ६८६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ९ लाख ३४ हजार ३०० रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असून, एका ४५ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे.चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना २५ ऑगस्ट रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. डोंगरी नदीच्या काठी राहणाऱ्या एका व्यक्तीने विक्रीच्या उद्देशाने घरात गांजाचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार केले.विशेष पथकाने रात्री सुमारे १०.१० वाजता संबंधित घराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून झडती घेतली. यावेळी लोखंडी पलंगाखाली ठेवलेल्या दोन पिशव्यांमध्ये गांजा…
‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंतमुंबई / जळगाव, दि. २५ : जळगाव जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रांमधील प्रलंबित प्रश्न, भूसंपादन, पायाभूत सुविधा तसेच नवीन प्रकल्पांची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती द्यावी, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.मंत्रालयात जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. सुरेश भोळे, आ.किशोर पाटील, आ .प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ.अमोल जावळे यांच्यासह संबंधित भागातील लोकप्रतिनिधी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच महाराष्ट्र औद्योगिक…
तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी अॅक्शन मोडवर; तीन पथकांच्या कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणलेधरणगाव | प्रतिनिधी : तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि विनापरवाना वाळूसाठ्यांविरोधात महसूल विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या तीन स्वतंत्र पथकांनी तालुक्यातील विविध भागांत एकाचवेळी आकस्मिक तपासणी करत सुमारे १० ते १२ लहान-मोठे बेवारस वाळूसाठे जप्त केले. महसूल विभागासोबत पोलिसांनीही सहकार्य केल्याने अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.बांभोरीसह बाभुळगाव, नारणे परिसरात कारवाईमहसूल पथकांनी बांभोरी परिसरातील रेल्वे पूल, स्मशानभूमी, तुटका पूल, दत्तमंदिर परिसर, पत्रकार कॉलनी आणि सिद्धिविनायक परिसरात आकस्मिक तपासणी केली. याशिवाय बाभुळगाव आणि नारणे परिसरातही स्वतंत्र पथकांमार्फत कारवाई करण्यात आली.तपासणीदरम्यान विविध ठिकाणी विनापरवाना…
नशिबाची सोडत अन् गिफ्टचा जल्लोष! सेवा सुपर मार्टमध्ये 80+ ग्राहक ठरले विजेते पिंप्री | प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील सेवा सुपर मार्टमध्ये ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आलेला लकी ड्रॉ उत्साहात पार पडला. संसारोपयोगी वस्तू आणि संपूर्ण किराणा साहित्य एकाच छताखाली वाजवी दरात उपलब्ध करून देणाऱ्या सेवा सुपर मार्टच्या या उपक्रमाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्राहकांना खरेदीसोबत लकी ड्रॉचे कूपन देण्यात आले होते. उपस्थित नागरिकांसमोर लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली. कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता पारदर्शक पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात आली. 🎉 लकी ड्रॉमध्ये तब्बल ८० हून अधिक ग्राहक विजेते ठरले! विजेत्यांना विविध आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. बक्षिसे…
जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक छायाचित्रण दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) मलाबार गोल्ड अँड डायमंड्स आणि प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ तसेच सर्व वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा स्नेहमयी वातावरणात भव्य सत्कार व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि कॅमेरा पूजनाने झाली. याच औचित्याने मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या नवीन डायमंड दागिन्यांचे लॉन्चिंगही करण्यात आले.व्यासपीठावर शहराच्या महापौर दीपमाला काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, स्टोअर मॅनेजर प्रियंका पाटील, सुजित नायर आणि प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधीपाल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.”छायाचित्रकार हे समाजाचे डोळे” – महापौर दीपमाला काळेआपले मनोगत व्यक्त करताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “छायाचित्रकार…

