Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूनंतर संतापाचा भडका; वाहन पेटवले, पोलिसांच्या कामात अडथळा १० जणांवर गुन्हा
    क्राईम

    चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूनंतर संतापाचा भडका; वाहन पेटवले, पोलिसांच्या कामात अडथळा १० जणांवर गुन्हा

    editor deskBy editor deskAugust 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    कावड यात्रेमध्ये रस्त्याने पायी जाणाऱ्या चिमुकल्याला वाहनाने चिरडल्यानंतर संतप्त जमावाकडून वाहन चालक उबेद खान इकबाल खान (वय चालक उबेद खान इकबाल खाना जात होती. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर जमावातील काही जणांनी पोलिसांना धक्काबुक्की करीत चालकाला बाजूला करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी जमावाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  जळगावकडून ममुराबादकडे जात असलेल्या आयशने वाहनाने म्हाळसा देवी मंदिराजवळ कावड यात्रेतील चिमुकल्याला चिरडले. त्यानंतर चिरडले त्यानंतर बालकाला चिरडणारे (एमएच २०, ईजी ३५९३) क्रमांकाचे वाहन पेटवून दिले होते. घटनेच माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोनि शशिकांत पाटील, प्रदीप राजपूत, किरण पाटील, बापू कोळी, प्रकाश चिंचोरे व जयेंद्रसिंग पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जमावाकडून वाहन चालकाला मारहाण करुन त्याला पेटत्या ट्रकमध्ये टाकून द्या अशी आरडाओरड करीत होते.

    पोलिसांनी ट्रक चालकाला संतप्त जमावाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाकडून पोलिसांना देखील धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच जळणाऱ्या वाहनाची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र जमावाने तो बंब अडविण्याचा प्रयत्न केला. पोलींसांची फौज घटनास्थळी आल्यानंतर वाहन चालक उबेदखान इकबालखान पठाण याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघाताच्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याप्रकरणी आठ ते दहा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विजय पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अल्पवयीन मुलीचा पाठलाग, ; आरोपीला न्यायालयाचा दणका, ६ महिने सश्रम कारावास!

    August 27, 2026

    ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुण ठार, दीड वर्षाच्या चिमुकल्याने गमावला वडिलांचा आधार!

    August 27, 2026

    भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले; तरुण जागीच ठार, मित्र गंभीर जखमी

    August 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.