Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आधी मुलगा बुडाला… वाचवायला गेलेले वडीलही बुडाले! अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
    क्राईम

    आधी मुलगा बुडाला… वाचवायला गेलेले वडीलही बुडाले! अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

    editor deskBy editor deskAugust 27, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील खवशी येथे तलावात बुडून १० वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या वडिलांचाही बुडून मृत्यू झाल्याने तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र अण्णा तलवारे (वय १०) हा तलावात गेला असता तो पाण्यात बुडू लागला. मुलाला बुडताना पाहून त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तलावात धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोघांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खवशीसह परिसरात शोककळा पसरली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही जीव गेल्याने या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलिसांचा ‘एमपीडीए’चा धडाका ; चाळीसगावच्या वाजिद खानची नागपूर कारागृहात रवानगी !

    August 27, 2026

    अल्पवयीन मुलीचा पाठलाग, ; आरोपीला न्यायालयाचा दणका, ६ महिने सश्रम कारावास!

    August 27, 2026

    ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुण ठार, दीड वर्षाच्या चिमुकल्याने गमावला वडिलांचा आधार!

    August 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.