Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तडीपार असूनही सिद्धेश्वरनगरात वावर; पोलिसांच्या जाळ्यात निलेश काळे
    क्राईम

    तडीपार असूनही सिद्धेश्वरनगरात वावर; पोलिसांच्या जाळ्यात निलेश काळे

    editor deskBy editor deskAugust 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    शहरातील सिद्धेश्वरनगर परिसरात दंगल घडवून आणल्याच्या पार्श्वभूमीवर तडीपार करण्यात आलेला निलेश काळे याने तडीपारीच्या आदेशाला धाब्यावर बसवत पुन्हा वरणगाव शहरात प्रवेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून तो सिद्धेश्वरनगर परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवत सापळा रचला. अखेर दि. २६ रोजी रात्री सातच्या सुमारास सिद्धेश्वरनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. निलेश काळे याच्याविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक बागुल यांनी पोलिस पथकाला तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपपोलिस अधिकारी मंगेश बेंडकोळी यांच्यासह पोलिस कर्मचारी सुखराम सावकारे, गोपी सोनवणे आदींचे पथक सिद्धेश्वरनगर परिसरात रवाना झाले. पोलिसांनी परिसरात गुप्तपणे सापळा रचून संशयिताच्या हालचालींवर लक्ष ठेवले. रात्री सातच्या सुमारास निलेश काळे हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आढळून येताच पोलिस पथकाने त्याला घेराव घालत ताब्यात घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!

    September 13, 2026

    रूपाली महाजन यांनी घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद; शहर विकासासाठी दिला महत्त्वाचा सल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.