Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  नाशिक जिल्ह्यातील वनी गडाहून येत असताना एका घाटात महामंडळाची बस ४०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात एक महिलेचा मृत्यू झाला असून तर १५ जण जखमी झाल्याची माहिती करताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून त्यांची काळजी घेण्याचे सांगत शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देऊ असं देखील गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील तब्बल 15 भाविक या अपघातग्रस्त बस मध्ये प्रवास करीत असताना त्यांना देखील जखमी झाले असून त्यांची विचारपूस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फोन द्वारे करीत प्रशासनाला योग्य ते आदेश देखील दिले असल्याचे समजते.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  सप्तशृंगगड ते खामगाव (बुलढाणा) या बसचा नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड घाटात भीषण अपघात झाल्याची घटना पहाटे समोर आली होती. या अपघातात एकूण २१ प्रवासी असून यातील १ महिला प्रवासीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हि महिला भाविक जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वणी गडावरील घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी देवी ट्रस्ट, पोलिस प्रशासन, ग्रामस्थ, आपत्ती व्यवसथापन घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या घटनेत जळगाव जिल्ह्यतील १६ भाविक जखमी असून त्यातील आशा राजेद्र पाटील या महिला भाविकाचा मृत्यू झाला असल्याची बातमी मिळाली…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात या विषयांवरून मध्यरात्री बैठका घेऊन खल सुरू आहे. मंगळवारी रात्रीदेखील 1 वाजेपर्यंत या तिन्ही नेत्यांमध्ये खातेवाटपावर दोन तास चर्चा झाली. मात्र, अजूनतरी खातेवाटपावर तोडगा निघालेला नाही. बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरावे लागत असल्याने आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी अर्थ, सहकार, सांस्कृतिक, महिला व बालविकास, वस्त्र उद्योग, अन्न व पुरवठा, क्रीडा, पशुसंवर्धन, वैद्यकीय शिक्षण व आदिवासी कल्याण या खात्यांसाठी आग्रह धरला आहे. तर, सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थ खाते अजित पवार यांना द्यावे, अशीही मागणी केली जात आहे. मात्र,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथील ग्रामीण रुग्णालयाने सप्तश्रृंगी गड बस दुर्घटनेमधील नावे जाहीर केली आहेत. या अपघातात १६ भाविक हे जळगाव जिल्ह्यातील असल्याची देखील माहिती समोर आली आहे. यात अकोला येथील गजानन पांडुरंग टपके (वय २५) अमळनेर तालुक्यातील मुडी येथील प्रमीलाबाई गुलाबराव बडगुजर (सुनिल गुलाबराव बडगुजर, मुलगा) वय ६५ , तर जळगाव तालुक्यातील भोकर येथील रघुनाथ बळीराम पाटील (वय ७०), बाळु भावलाल पाटील(वय ४८), गडावरील लक्ष्मीबाई काळू गव्हाणे (वय ४०), अमळनेर तालुक्यातील मुडी येथील संजय बाळीराम भोईर (वय ६०), सुशीलाबाई सोनू गुजर(वय २७), वच्छालाबाई साहेबराव पाटील(वय ६५), सुशिलबाई बबन नजान (वय ६४), निफाड तालुक्यातील पंचेश्वर येथील…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  जिल्ह्यात असलेले वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असताना एसटी बस थेट 400 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये २३ प्रवासी होते. पैकी एका प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला आहे. आज सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात घडला. खामगाव डेपोची मुक्कामी बस अपघात ग्रस्त झाली. जखमी प्रवाशांवर वणी येथे उपचार सुरू आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावहून घटनास्थळी रवाना झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, यंत्रणेला सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था  राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील विविध तक्रारदार, अन्यायग्रस्त, पिडीत आणि त्रस्त नागरिकांनी छत्रपती संभाजी नगर क्रांती चौक येथे आंदोलन  केले. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कॅबिनेट कृषिमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी देखील मागणी केली आहे. शिंदे गटातील आमदार कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महेश शंकरलाल शंकरपेल्ली, गजानन अप्पाराव गोराडे, आशाबाई धोंडू बोराडे, तय्यब बडे मियाखां पठाण, मुक्तार सतार बागवान, शकील साहेबखां पठाण, कृष्णा कडूबा कापसे, संजय माणिकराव निकम, भगवान सुखदेव जीवरग, सुनील प्रभाकर मिरकर, मनोज गंगाराम मोरेल्लु, कमलेश गोविंदराम कटारिया, विष्णू गंगाराम काटकर इत्यादी जवळपास 60 ते 70…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील  कंडारी येथून बेपत्ता असलेल्या व रायपूर येथे पाटचारीत मृतदेह आढळून आलेल्या राहुल उर्फ गोलू युवराज भिल या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील भूषण उर्फ भुरा पाटील (रा. वसीम, ता. भुसावळ) या होमागार्डला अटक करण्यात आली असून, दुसरा संशयित जयराम धोंडू कोळी याला यापूर्वीच दुसऱ्या एका गुन्ह्यात नशिराबाद पोलिसांनी अटक केली आहे. जळगाव तालुक्यातील कंडारी येथील राहुल भिल येथून २ जुलैपासून बेपत्ता होता. ६ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता राहुलचा मृतदेह रायपूर शिवारातील पाटचारीजवळ संशयास्पदरीत्या आढळून आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व १० जुलै रोजी भूषण उर्फ…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी  जळगाव एरंडोल महामार्गावर दुपारच्या सुमारास इगतपुरी बसच्या अपघाताची घटना होत नाही तोच रात्री ८ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून एरंडोलकडे येणारी बस व पुढे चालणारी रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षामधील चार प्रवासी जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एरंडोलपासून पारोळ्याकडे तीन किलोमीटर अंतरावर हॉटेल फाउंटनपासून थोड्या अंतरावर मंगळवारी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास घडला. यात एकाच परिवारातील तीन वर्षांच्या बालकासह आई-वडील जखमी झाले. जखमींपैकी एकाचा रुग्णालयाच्या वाटेतच मृत्यू झाला. फारुख रमजान खाटीक (२६, फकीरवाडा, एरंडोल), मुस्कान फारुख खाटीक (२२), फयीजाआन फारुख खाटीक (३), गणेश शांताराम महाजन (४५, पारोळा) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी फारूख खाटीक याला रुग्णालयात नेत…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील महामार्ग क्र.६ वर नियमित अपघाताची संख्या वाढत असतांना आज दुपारी पुन्हा एकदा बसचा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हि घटना  जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एक लग्न यागावाजवळ  घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एक लग्न या गावाजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास इगतपुरी बस डेपोतील जळगाव शहरातील बस स्थानकावरून इगतपुरी जाणारी बस क्र.एम.एच.४०.एक्यू.६०१० या बसने भरधाव कंटेनरला मागून धडकल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांनी लागलीच खाजगी रुग्णावाहिका पाठवून अपघातग्रस्ताना मदत मिळवून दिली.  या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करीत असून अपघातात २ प्रवसी जखमी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. अजित पवार व त्यांच्या समर्थकांसह शिंदे भाजप सरकारमध्ये सामिल झाले आहेत. तेव्हापासून अजित पवार गटाकडून शरद पवारांवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अजित पवार व शरद पवार यांच्यातील संबंध बिघडले आहेत. या सर्व फोडाफोडीला एक आठवडा झाला असून अद्याप दोन्ही नेते एकमेकांसमोर आलेले नाहीत. मात्र येत्या 1 ऑगस्टला पुण्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात शरद पवार व अजित पवार हे पहिल्यांदाच एका मंचावर असणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या…

Read More