जळगांव : प्रतिनिधी
जळगांव जिल्हयातील मोठी बाजार पेठ असल्याने जिल्हयातील नागरीकांची खरेदीसाठी खूप गर्दी होत असते याचाच फायदा घेवून काही चोरटयांनी नागरीकांच्या दुचाकी चोरण्याचा धडाकाच लावला होता, विशेषता शहरातील मुख्य मार्केट भागात चोरीचं प्रमाण खूप वाढले होते. त्यावरून जळगांव शहर पो.स्टेला मो.सा. चोरीचे गुन्हे दाखल इ आलेले आहेत.
जळगाव शहरात बरेच दुचाकी चोरीचे प्रकार हे घडत असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय अधिकारी संदिप गावित जळगांव भाग जळगाव. यांनी मो.सा. चोरीचे गुन्हे उघडकीस आणने बाबत विशेष लक्ष देवुन सुचना केल्या होत्या त्यावरु दि.१४ रोजी रात्री १२.३० आरोपी हे गुन्हयातील चोरीची मो.सा.घेवुन फिरत आहेत अशी खात्रीशिर बातमी पाथकातील सपोनि किशोर पवार, पोकों.तेजस मराठे, पोना.किशोर निकुंभ, यांना मिळाली होती त्यामुळे पुर्वीच सापळा लावुन बसलेल्या पथक अधिकच सर्तक झाले आणि रात्री १.०० वा. सु. चोरटे एस.एम. आयटी कॉलेज परीसरात येताच सपोनि किशोर पवार सफौ बशिर तडवी, पोहेकॉ.विजय निकुंभ पोहेकॉ . उमेश भांडारकर, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोना.प्रफुल्ल धांडे, पोना.किशोर निकुंभ पोना .गजानन गुजर पोना.योगेश पाटील, पोना .राजकुमार चव्हाण, पोकों.रतन गिते, पोकों.तेजस मराठे, पोका .योगेश इंधाटे, पोकों.अमोल ठाकुर यांनी बालकांना ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असुन आता पावेतो ६ मो.सा. जप्त करण्यात आल्या आहेत. सदर मो.सा. जिल्हापेठ पो.स्टे चे २ गुन्हे व शहर पो.स्टे. येथे २ गुन्हे असे एकूण ४ गुन्हे उप झाले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक श्री विलास शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोना.किशोर निकुंभ हे करीत आहेत.