Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील झामी चौकात सलून व्यवसाय करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा रेल्वे खाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, येथील झामी चौकातील सलून व्यावसाय करून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने अमळनेर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमळनेर- सुरत रेल्वे मार्गावरील चांदणीकुहे रेल्वे गेटच्या पुढे घडली. याबाबत रात्री उशिरा अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. रवींद्र सखाराम वारुळे (रा. मोहाडीकर प्लॉट, शारदा कॉलनी, अमळनेर) असे मृताचे नाव आहे. त्याचा मृतदेह १२ रोजी सायंकाळी रेल्वे लाइनलगत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नेहरु चौकात मद्यप्राशन करुन रस्त्यावर धिंगाणा घालत राजेंद्र भगवान पाटील (वय ३८, रा. मारोती पेठ, जळगाव) याने पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी राजेंद्र पाटील याला अटक करण्यात आली असून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११ वाजता नेहरु पुतळ्यासमोर राजेंद्र पाटील याने मद्याच्या नशेत धिंगाणा घातला. स्वत:ची दुचाकी रस्त्यावर आडवी लावून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर शहर पोलीस ठाण्याचे हवालदार विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, बापू मोरे, अय्युब खान मसूद खान असे घटनास्थळी गेले. पाटील याची समजूत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अज्ञात भामट्यांनी अट्रावल शिवारात शेतकऱ्याकडून मोबाइल हिसकावून पळ काढला होता. हा मोबाइल एक तरुण भालोद गावात विक्री करण्याच्या ही माहिती मिळताच एलसीबीने त्यास अटक केली. रोहित मधुकर लोखंडे असे त्याचे नाव आहे. अट्रावल येथील शेतकरी सुनील निवृत्ती चौधरी हे सांगवी खुर्द येथील शेतात काम करत होते. तेथे आलेल्या दोन भामट्यांनी धाक दाखवून त्यांचा मोबाइल हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल आहे. यावल पोलिस व जळगाव एलसीबी या प्रकरणाचा तपास करत होते. एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना भालोद या गावात एक तरुण चोरीचा मोबाइल विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहायक फौजदार इनुस शेख इब्राहिम…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था 100 कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात आहेत. आता पुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा न्यायालयातील मुक्काम वाढला आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 100 कोटी वसुली प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा न्यायालयातील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना 27 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडी विशेष कोर्टात आज…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईच्या मनसे विभाग प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेच्या एका 33 वर्षीय विभाग अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा वि. प. मार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. आरोपीने 42 वर्षीय महिलेला येणाऱ्या मनपा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचे आमिष दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. तसेच, सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 दरम्यान विविध आमिष दाखवून विविध ठिकाणी शारिरीक संबध ठेवत फसवणूक केल्याची तक्रार पीडितेने केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी वृशांत वडके यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376, 500 आणि 420…

Read More

जयपूर : वृत्तसंस्था जोधपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या फलोदी शहरात एका शिक्षकाचं राक्षसी कृत्य समोर आलं आहे. शिक्षकाने पत्नी आणि मुलीला बेदम मारहाण केली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिक्षकाने मारहाण केल्यानंतर पत्नीला अर्धनग्न अवस्थेत उन्हात बसवलं आणि स्वतः घरामध्ये जेवायला बसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. यासोबत पीडितेच्या माहेरच्या लोकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. फलोदीचे पोलीस अधिकारी राकेश ख्यालिया यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि खाजगी शाळेतील शिक्षक कैलाश सुथार याला अटक केली. सध्या त्याला शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नेहरू चौकातून एका ६५ वर्षीय वृद्धाची दुचाकी अद्यात व्यक्तींनी लांबविल्या प्रकरणी शहर पोलिसात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील दादावाडी परिसरातील रहिवासी सागरमल पन्नालाल सोमाणी (वय ६५) हे कामानिमित दि ६ रोजी नेहरू चौकात दुचाकी पार्किंग करून आपल्या कामासाठी बाहेर गेले होते. यावेळी कुणी तरी अद्यात व्यक्तीने त्यांची होंडा कंपनीची दुचाकी क्र.एम.एच.१९ सी.के.७११९ हि चोरून नेली याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसात धाव घेत दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास योगेश बोरसे करीत आहेत.

Read More

जळगांव : प्रतिनिधी गणेशोत्सव निमित्त मेहरुन तलाव परिसरात दरवर्षी प्रमाणे गणेश घाटात गणपती विसर्जन केले जाते. त्या ठिकाणी भरपुर प्रमाणात प्लास्टिक पिशवी, निर्माल्य असतात. त्यामुळे पाणी दूषित होऊ नये या अनुषंगाने जळगांव प्लॉगर आयोजित स्वच्छता अभियानात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, मौलाना आझाद फाऊंडेशन या संस्थांनी सहभाग नोंदवला व मेहरुन तलाव व गणेश घाट परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आले. जळगांव प्लॉगर्स चेतन जैन, ओम साहित्य, खुशी सांगोर,रेवती पाटील,कुणाल भंगाळे,हितेश नेरकर,घनश्याम सूर्यवंशी,प्रयाग पाटील,संभव मेहता, मनिषा पाटील, नुतन तासखेडकर, रेणुका हिंगु, योगिता बाविस्कर, भारती कापडणे,गायत्री चौधरी,कविता पाटील,आशा मौर्य,मनोज भालेराव,सलीम इनामदार, इम्रान शेख, प्रेम केळकर, नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव – यावल रस्त्यावर एका २८ वर्षीय तरुण लोखंडी गावठी पिस्तुल बाळगताना आढळून आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, तालुक्यातील किनगाव – यावल रस्त्यावरील मेष ठिबक कंपनीजवळ दि १२ रोजी ३ वाजेच्या सुमारास एक २८ वर्षीय तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीसोबत ३० हजार रुपये किमतीची गावठी पिस्तुल व मॅक्झीनसह आढळून आला. संशयित आरोपी गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया (वय २८, रा.) बेह्राम्पुरातील जि.खरगोन मध्यप्रदेशयेथील रहिवासी आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यावल पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाहले हे करीत आहेत.

Read More

मुंबई : प्रतिनिधी दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा वाद सुरू असताना आता करुणा मुंडे यांनी देखील भगवान गडावर मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मी वंजारी समाजाची सून असल्याने मेळावा घेऊ शकते असेही त्यांनी म्हटलेय. त्यामुळे या मेळाव्याचा वादही पेटण्याची शक्यताय. नामदेव शास्त्रींची भेट घेणार : करुणा मुंडे म्हणाल्या की, मी लवकरच दसरा मेळावा घेणार आहे. दसऱ्याला माझी मुलगी शिवानीचा वाढदिवसही असतो. शेतकरी संघटनांना सोबत घेऊन हा मेळावा घेणार आहे. यात अतुल खोपसे, विष्णू कसबे माझ्यासोबत असणार आहेत. लवकरच नामदेवशास्त्रींची याबाबत परवानगी मिळवण्यासाठी भेट घेणार आहे. 5-6…

Read More