छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील काही रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिकाच सुरू असून नुकतेच लातुरमधील तुळजापूर- औसा महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. यामध्ये ४ जण जागीच ठार झाले. ही घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. श्री घृष्णेश्वर मंदिराजवळ हा अपघात झाला असून यामध्ये ६ वाहनांचा चुराडा झालाय. छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. शनिवारी पहाटे वेरूळ घृष्णेश्वर मंदिर ते खुलताबाद जाणाऱ्या रोडवर घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी २ ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. पहाटेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रस्त्यालगत असलेल्या उभ्या गाड्यांवर दोन्ही ट्रक पलटी झाले. या दुर्घटनेत तब्बल 6 गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील अनेक धक्कादायक घटना सोशल मिडीयावर नेहमीच व्हायरल होत असतात. हल्ली तरुणाईमध्ये जोरदार भांडण होत असल्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. कधी प्रियकरावरून तर कधी लोकल ट्रेनमध्ये, मेट्रोमध्ये तरुणींमध्ये कडाक्याचं भांडण होत असतं. छोट्या- छोट्या गोष्टींवरून झालेली भांडणं विकोपाला गेल्योचेही अनेक उदाहरणं देता येतात. अशातच पुन्हा एकदा दोन तरुणींमध्ये भर रस्त्यात भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत सुरूवीस तुम्ही पाहू शकता की,दोन तरुण आणि दोन तरुणी आपआपसात कोणत्यातरी विषयावरुन बोलत आहेत. आकाशी रंगाचं जॅकेट घातलेली तरुणी तिच्यासमोर असलेल्या तरुणाला रागात बोलत आहे. तसेच गुलाबी रंगाचा जॅकेट घातलेली तरुणीही तिच्यामध्ये काही तरी बोलत आहे.…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घडत असतांना नुकतीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने बाळाला जन्म दिला आहे. हि घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बाभळेश्वरच्या आश्रमशाळेत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाभळेश्वरच्या आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीचे दहावीत शिकणाऱ्या एका मुलाशी प्रेम संबंध जुडून त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि मुलगी गर्भवती झाली. ही माहिती घरातील मंडळींना समजल्यावर दोघांच्या कुटुंबीयांनी एकमताने त्यांचे लग्न लावून दिले. गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील एका रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला. दरम्यान डॉक्टरांना मुलीचे वय कमी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. नंतर पोलिसांनी चौकशी केली असता मुलगा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या म्हसावद पोलीस दुरक्षेत्र हद्दीतील वसंतवाडी येथील बाबुलाल संपत महाजन यांच्या शेतातील गोडाऊन मधुन सुमारे दहा ते बारा क्विंटल कापूस चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने त्यांच्या शेजारी शेतकरी राजेंद्र पाटील हे सकाळी चार वाजेच्यासुमारस आपल्या शेतात विहिरीवर पाण्याची विद्युत पंप चालू करण्यास गेले असता त्यांना आण्णा धोंडु पाटील यांच्या शेतात कापसाच्या बोरी पडलेल्या दिसल्या त्यांना शंका आल्याने त्यांनी आपली मोटारसायकल माघारी फिरवली व सदर माहिती पुरुषोत्तम महाजन यांना सांगितली. त्यांनंतर शेतमालक यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता आपलाच कापूस चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात आले त्यांनी या घटनेची माहिती पोलीस पाटील…
अमळनेर : प्रतिनिधी येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्र महाविद्यालय अमळनेर येथे दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी FDP ( फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.डॉ.एन.के.वाणी हे होते. तर संसाधन तज्ञ व्यक्ती म्हणून रुक्मिणीताई कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. शेख हे होते. कार्यक्रमात अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा महाविद्यालय तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. संसाधन तज्ञ प्राचार्य डॉ. शेख यांनी आपल्या मौलिक विचारात संशोधनाची भूमिका, उपयोगिता आर्टिकल व रिसर्च पेपर यातील फरक तसेच महाविद्यालय व शाखा विकास या संदर्भात अचूक व अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन.के. वाणी यांनी नॅक प्रक्रिया…
ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना संशयाच्या कारणाने होत असतांना एक धक्कादायक घटना ठाणे शहरात घडली आहे. आपल्या पतीला दारूचे व्यसन असल्याने महिलेने दोन्ही मुलांना घेऊन आपल्या दिराकडे राहत होती. या दरम्यान पत्नी व मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पतीने पत्नीसह तिच्या दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कासारवडवली साईनगरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील कासारवडवली येथे दि.२१ रोजी सकाळी भावना अमित बागडी तसेच खुशी अमित बागडी (वय ६) आणि अंकुश अमित बागडी (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. मृत भावना हिचा पती अमित धर्मवीर बागडी यानेच क्रिकेटच्या बॅटने तिघांची हत्या…
नागपूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षापासून शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर कारवाई सुरु असतांना आता काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या बहुचर्चित जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी केदार यांना ५ वर्षांच्या कारावासाची आणि १२.५० लाख रुपये शिक्षा सुनावली आहे. नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून त्यांची आमदारकी रद्द करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. कायद्याने आमदारांना २ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी रद्द होते. त्यानुसार, आता केदार यांना दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोन्याच्या किमतीत वाढ होत असतानाच विद्यमान आर्थकस वर्षांमध्ये दागिन्यांची विक्री मूल्याच्या दृष्टीने १० ते १२ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा इक्रा पतमानांकन संस्थेने आपल्या एका अहवालामध्ये व्यक्त केली आहे. देशांतर्गत दागिन्यांच्या विक्रीतील मूल्य वाढीचा अंदाज आधीच्या ८ ते १० टक्क्यांवरून १०-१२ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे हा अंदाज वाढवण्यात आल्याचे इक्राने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दागिन्यांची विक्री वार्षिक आधारावर १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढण्याची अपेक्षा आहे. अक्षय्य तृतीयेदरम्यान सोन्याची सतत मागणी आणि चढेभाव यामुळे ही वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु महागाई वाढल्यामुळे ग्रामीण मागणी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विद्यमान आर्थिक…
जळगाव : प्रतिनिधी यावल येथील भुसावळ मार्गावरील एका शेतातील बांधावर ५० वर्षीय प्रौढ व्यक्ति मृत अवस्थेत मिळाला असून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा अंदाज असून हे प्रौढ चोपडा तालुक्यातील अडावद येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील अडावद येथील विशाल रमेश मेढे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, यावल ते भुसावळ मार्गावरील रस्त्यावरील टेलीफोन एक्सचेंजच्या कार्यालयासमोर प्रशांत मुरलीधर महाजन यांच्या शेता (गट क्रमांक ७२४ /२) मध्ये पिकपेरणी केली आहे. डुक्कर व इतर मोकाट गुरांचा त्रास होत असल्याने शेतातील कम्पाउंडला बॅटरीने चालणाऱ्या झटका मशिनची तार लावली आहे. या तारांमध्ये असलेल्या वीज प्रवाहाचा शॉक लागून विशाल मेढे यांचा मृत्यू…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ येथील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून आठ लाखांच्या पॉवर केबल चोरीत रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदाराचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरपीएफच्या हवालदारासह तिघांना रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटकेतील संशयितांमध्ये सचिन उत्तम तायडे (वय २५, रा. महादेव टेकडी, हनुमान मंदिर, कंडारी, ता. भुसावळ), राहुल रतन मोरे (वय २३, रा. महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी) व आरपीएफचे हवालदार शशिकांत गणपत सुरवाडे (वय ५७, रा. स्वामी विहार, भुसावळ) यांचा समावेश आहे. दरम्यान, भुसावळातील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून ७ लाख ९४ हजार २२७ रुपयांची १ हजार ६०४ किलो पॉवर केबल चोरीला…

