Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकीवर घरी जाताना पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घडल ते धक्कादायक
    क्राईम

    दुचाकीवर घरी जाताना पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घडल ते धक्कादायक

    editor deskBy editor deskDecember 25, 2023Updated:December 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील मुंबई पोलीस दलातून एक दुर्देवी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा ड्युटीवरुन घरी जात असताना मांजाने गळा चिरुन पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला आहे. समीर जाधव असं मृत पोलीस अंमलदाराचं नाव आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले समीर जाधव हे नियमितपणे ते रविवारी देखील आपलं कर्तव्य बजावून घरी निघाले होते. बाईकवरुन जात असताना मांजाने गळा चिरुन ते गंभीर जखमी झाले होते. वाकोला ब्रिज येथे हा प्रकार घडला होता.

    समीर यांना जखमी अवस्थेत सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. समीर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर पोलीस दलावरही शोककळा पसरली आहे. मांजाला धार आणण्यासाठी काच आणि लोखंडाच्या किसाचा सर्रास वापर केला जातो. जे अनेकदा लोकांच्या जीवावर बेततं. मांजा बनवण्यासाठी काच आणि लोखंडाच्या किसाचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी काढले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम संधी

    December 13, 2025

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    माझ्यावर एवढं प्रेम का? अमिताभ बच्चन यांचा मनाला स्पर्श करणारा ब्लॉग

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.