Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेनेचे नेते तथा खा.संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी न्यायालयीन कोठडीतअजूनही दिलासा मिळालेला नाही. राऊतांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडीकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईडीकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. मात्र जोवर आरोपपत्राची कॉपी मिळत नाही, तोवर या खटल्याची सुनावणी दैनंदिनरित्या चालणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ईडी कायम आरोपींना आरोपपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनास आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे शिवसेना आपल्या अस्तित्वासाठीची कायदेशीर लढाई लढत आहे. पक्षातल्या ऐतिहासिक बंडानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट पक्षातून बाहेर पडला. त्यामुळे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्र लिहलं आहे. त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पत्राद्वारे अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विशेष विनंती केली आहे. ज्येष्ठ नेते विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर, अजितदादांनी पावसाळी अधिवेशनात राज्यातील रस्त्यांच्या बाबतीत विषय मांडला होता. यापैकी, मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील विविध समस्यांबाबत त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहीले आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून यामुळे मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर दररोज असा वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक श्री. भूषण मोरे यांच्या मनमानी कारभार विरोधात बँकेच्या आवारातच शेतकऱ्याचे आमरण उपोषण दि. १९ सप्टे, २०२२ सोमवार पासुन सुरू केले आहे. याबाबत सविस्तर असे की, शेतकरी योगेश रामलाल पुरभे रा. मोठा माळी वाडा, धरणगाव हे युनियन बँक ऑफ इंडिया धरणगांव शाखेचे जुने खातेदार असुन प्रतिवर्षी शेतकरी पुरभे व त्यांच्या पत्नीच्या नावे शेतीसाठी नियमित पीककर्ज घेत होते व घेतलेल्या कर्जाची रक्कम नियमीत वेळेवर न चुकता बँकेला परतफेड केली आहे. परंतु मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने शेतात पीक आले नाही. व जे काही पीक हाती आले ते नाईलाजास्तव कमी दराने विक्री करावे…

Read More

धरणगाव ( पिंप्री ) : प्रतिनिधी फोटोग्राफीने दुनियेला आज जवळ आणलं त्यातून मनात असलेली कल्पना प्रत्यक्षात अवतरली आज फोटोग्राफीचा सर्वत्र बोलबाला असताना त्यात आधुनिकता देखील स्विकार झाली . 19 ऑगस्ट रोजी फोटोग्राफी दिवसाचे औचित्य साधत पिंप्री खु येथील धरणगाव तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशन यांनी एकदिवसीय वर्कशॉपचे आज दिनांक 18 सप्टेंबर रविवारी आयोजन केले होते . निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडा येथील विद्यालयात मल्टिपर्पज हॉल मध्ये झाला . प्रसंगी या वर्कशॉपला धुळे येथील सुप्रसिद्ध ट्रेनर म्हणून संजय गवळी सर आणि त्यांची टीम यांनी प्रमुख माहिती दिली .यासाठी मेकअप आर्टीस्ट लिना ठाकूर धुळे , मॉडेल प्रतिक्षा नरवाडे जळगाव , आशिष तडवी जळगाव यांची विशेष…

Read More

पाळधी : प्रतिनिधी येथील सागर कॉलनी या भागाला वीज पुरवठा करणारी डिपी जात्याने नागरिकांवर अंधारात आली तर बीजे असावी पिण्याचे पाणी नसल्याने संतप्त रहिवाशांकडून आज महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पाळधी येथील रेलवे लाईनच्या पलीकडे असलेल्या सागर कॉलनी या भागाला सिंगल फेज डिपीच्या लागले तसेच हा माग रेल्वे लाईन माध्यमातून बीज पुरवठा केला जातो. मात्र, शनिवारी ही डीपी जळाल्याने येथील रहिवाश्यांना अंधारात राहावे लागले तसेच हा भाग रेल्वे लाईन पलीकडे असल्याने पाणी पुरवठा टाकीवरून पाण्याची पाईपलाईन नाही.त्यामुळे रहिवाशांना पाण्यासाठी खाजगी बोरवेलवर अवलंबून राहावे लागते. मात्र वीज बंद असल्याने पिण्याचे पाणीच नसल्याने रहिवाशांनी थ्री फेज डीपीच्या मागणीसाठी वीज वितरण कार्यालय…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यात अतिवृष्टीमुळे, ढगफुटी मुळे शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास जातांना दिसत असून शेतकरी अडचणीत सापडला आहे हवालदिल झाला आहे एवढा खर्च करून आता उत्पन्न येण्यास सुरुवात झाली होती पण सर्व तालुक्यात नुकसान झालेले आहे आणि यावर सर्व तालुक्याचा सरसकट पंचनामा करावा अशी अपेक्षा असतांना शासनस्तरावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही हे असा अन्याय जर होत असेल तर शेतकऱ्यांनी संघटीत झाले पाहिजे असे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी प्रतिपादन केले ते विटनेर येथे शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते. ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर विनोद चौधरी यांनी प्रास्ताविक केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगवी शाखा अध्यक्ष…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल येथील साने गुरुजी प्राथमिक विद्यालय,प्राथमिक शिक्षिका तसेच खडके बु ता.एरंडोल येथील रहिवासी निकिता योगेश पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा सन २०२२ या वर्षाचा “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार” आमदार राजुमामा भोळे यांच्याहस्ते नुकताच अल्पबचत भवन जळगाव येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात प्रदान करण्यात झाला. निकिता पाटील यांनी आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले आहेत.शाळेत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देणे,कोरोना काळात शाळा बंद असल्या कारणाने घरी जाऊन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात शिक्षणाचे काय महत्व आहे हे पटवून दिले. शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या. स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला. प्रभात फेरीचे आयोजन केले.स्वच्छ भारत अभियान योजना अंतर्गत उपक्रम…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील सत्तांतरानंतर आपल्यावरती काही जण टीका करत आहेत. त्यांच्या टिकेले प्रतिटिकेने नव्हे तर कामातून उत्तर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिनांक २० रोजीच्या जिल्हा दौर्‍याच्या नियोजनासाठी पाळधी येथील सुगोकी हॉटेलजवळच्या फार्म हाऊसमध्ये आयोजीत पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या दौर्‍यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाळधी येथील नियोजीत विश्रामगृहाचे भूमिपुजन करणार असून त्यांच्याच हस्ते महात्मा गांधी चौकात रिमोट कंट्रोलने तब्बल २२ कोटी रूपयांच्या आणि सौर उर्जेवर चालणार्‍या राज्यातील पहिल्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, कार्यकर्त्यांनी विरोधकांसोबत कोणतीही तडजोड न करता…

Read More

पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील सासवड रस्ता, ऊरळी देवाची, हॉटेल सोनाई जवळ शिवशाही बस व कंटेनरचा रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषणअपघात झाला. या अपघातात बस आणि कंटेनर यांचा पुढील भागाचा चक्काचूर झाला असून एक प्रवासी ठार झाला असून सहा प्रवासी जखमी झाले आहेत. अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड यांनी माहिती दिली आहे की, या अपघातात काही जण जखमी असून गाडीमधे अडकले असल्याची माहिती अग्निशमन दलाकडे मिळाली असता तातडीने काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्रातील वाहने घटनास्थळी पाठवण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच याबाबतची माहिती अग्निशामक नियंत्रण कक्षास ही देण्यात आली. या घटनेत शिवशाही बस (MH,14 GO 3104), (पंढरपुर-स्वारगेट) व कंटेनर (MH18 AA 7190) यांचा मोठा…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलानी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिर जवळ रोडवर दोन इसम गावठी पिस्टल सोबत बाळगत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून मिळालेल्या माहिती संदर्भात सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथक घटनास्थळी पोहचून सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून दोन बनाबट गावठी पिस्टल सह पाच जिवंत काडतुसे बाजारपेठ पोलिसांनी जप्त केले आहे. सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पोकॉ प्रशांत निळकंठ सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 18/09/2022 रोजी 04:15 वाजेला भुसावळ शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलानी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिर जवळ रोडवर मिळालेल्या…

Read More