Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन हिवाळ्यात आलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होईल, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच हवामान खात्याने देशातील ३१ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवार आणि शनिवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)‌ २०२४-२५ अंतर्गतच्या नियतव्ययात जळगाव जिल्ह्यातील वाढीव निधीच्या मागणीचा सकारात्मक विचार करून‌ वाढ केली जाईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनीपालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिली. जिल्हा वार्षिक योजना २०२४- २५ च्या प्रारूप आराखड्याबाबत मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. जळगाव येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड तसेच जिल्हा प्रशासनातील इतर…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज परिसरातील रांजणगावच्या दत्तनगरातील ४ शाळकरी मुलांचा गुरुवारी बनकरवाडी तलावात बुडून मृत्यू झाला. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (१२), अफरोज जावेद शेख (१४), अबरार जावेद शेख (१२) व कुणाल अनिल दळवी (१२) अशी मृत मुलांची नावे आहेत. दोन भावंडांपैकी अफरोज मदरशात तर अबरार साईराम इंग्रजी शाळेत शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मुले एकाच भागात राहत असल्याने मित्र होती. गुरुवारी सायंकाळी खेळण्याच्या नादात ते घरातून बाहेर पडले. मात्र, उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. बराच वेळानंतर जवळच असलेल्या बनकरवाडी तलावाच्या काठावर या मुलांचे कपडे दिसले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  संपूर्ण देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा उत्सव साजरा केला जात आहे. अयोध्या येथे दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सव साजरा केला जाणार असल्याने जळगावातील शानिपेठ परिसरातील संकल्प महिला मंडळातर्फे घरोघर अक्षदा वितरण करण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जयघोषात अक्षदा आणि माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. प्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती. देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा आनंदोत्सव सुरू असून प्रत्येक गावात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. जळगाव शहरातील शनिपेठेत असलेल्या जय श्रीराम मित्र मंडळ आणि संकल्प महिला मंडळातर्फे अयोध्या येथून आलेल्या मंत्रित अक्षदांचे परिसरात वितरण करण्यात आले. मुख्य चौकात माजी होमगार्ड समादेशक रमेश दलाल यांच्या हस्ते…

Read More

चोपडा : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गावठी पिस्तूलवर मोठी कारवाई सुरु असतांना नुकतेच बोरज अजटी फॉरेस्ट नाक्यासमोर १३ हजर रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस बाळगणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुण शुभम प्रकाश सूर्यवंशी याच्याकडे १३ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस घेऊन फोरेश्ट नाक्या समोर आढळून आला. त्याला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. तपास सपोनि शेषराव नितनवरे करीत आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात नेहमीच काही ना काही धक्कादायक घटना समोर येत असतांना नुकतेच उल्हासनगर शहरात एक हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. सार्वजनिक महिला शौचालयात एका दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. बाळाला परिसरातील नागरिकांनी शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कैंप नंबर ४ सुभाष टेकडी परिसरातील आम्रपालीमगर येथील सार्वजनिक आज सकाळच्या सुमारास एक महिला शौचालयास गेली होती. तेव्हा तिला शौचालयात एक बाळ असल्याचे दिसले. महिला घाबरून शौचालयाच्या बाहेर आली आणि परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी बाळाला शौचालातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्नालयात दाखल…

Read More

चोपडा : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून नेहमीच अल्पवयीन मुलींचे विनयभंग व अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच चोपडा तालुक्यातील अवघ्या दोन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित लोटन पाटील (वय ५६) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दि.९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लोटन पाटील याने अवघ्या दोन वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला तत्काळ अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

Read More

पुणे : वृत्तसंस्था जगभरात २०१९ मध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट JN.1 चा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. शहरांसह राज्यातील गावांतही कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची रुग्ण आढळू लागले आहे. पुण्यातील मुळशी येथेही नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यांने खळबळ उडाली आहे. रुग्णाला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र मुळशी तालुका आरोग्य विभागाकडून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. सोमवारी 10 जानेवारीला राज्यात 98 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर 138 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहे. सोमवारी…

Read More

बंगळुरू : वृत्तसंस्था शहरातील एका एआय कंपनीच्या सीईओ महिलेने आपल्या केवळ चार वर्षीय मुलाच्या हत्येचा कट रचला होता. या कटाचा भाग म्हणून ३९ वर्षीय सूचना मुलाला घेऊन गोव्याला आली आणि तिथे हॉटेलच्या खोलीत त्याचा खून केला, असा संशय असल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीतून कफ सिरपच्या दोन रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हत्येपूर्वी सूचनाने आपल्या मुलाला कफ सिरपचा हेवी डोस दिला असावा, असा पोलिसांना संशय आहे. सूचनाने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून कफ सिरपची बाटली मागवली होती. त्याला खोकला असल्याचे सूचनाने सांगितले होते. मुलाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे. कर्नाटकातील हिरीयुर सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर कुमार…

Read More

लातूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील एका आरोपीने राहत्या घरी स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आईला सांगितल्यावर वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील आरोपीस मंगळवारी उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ३ मे २०१८ रोजी घडली होती. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करून पोलिस उपनिरीक्षक पी. जी. शिरसे यांनी तपास केला. सहायक पोलिस निरीक्षक जी. के. शेख यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाकडून ११…

Read More