Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरात मागील महिन्यात शिवपुराण कथा मोठ्या उत्साहात पार पडली होती. पण आता जिल्हावासीयासाठी पुन्हा एकदा  पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन चाळीसगाव येथे दि.१६ ते २० जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील मालेगावरोड स्थित सुमारे ४० एकर परिसरात १६ ते २० जानेवारीपर्यंत प्रभू श्रीराम महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाविकांची उपस्थिती या महाशिवपुराण कथेला लाभणार आहे. खासदार उन्मेश पाटील, अपर पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची पाहणी करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाययोजनांची चचर्चा केली. याप्रसंगी पोलिस निरीक्षक संदीप पाटील,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरासह ग्रामीण भागात अनेक चोरी व घरफोडीचे सत्र सुरु असतांना नुकतेच शहरातील आदर्श नगरात मैत्रिणीच्या घरी लग्न असल्याने तेथे जाताना शिक्षिका अर्चना हितेंद्र ढुमे (४९) यांचे फ्रिजरमध्ये ठेवलेले ३ लाख ४५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाले. रामानंदनगर पोलिसांत शिक्षिकेच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीसह तिच्या मैत्रिणीवर संशय असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खासगी शाळेतील शिक्षिका अर्चना ढुमे यांच्या मैत्रिणीकडे नागपूर येथे विवाह सोहळा असल्याने त्या ३० डिसेंबर रोजी पहाटे तेथे गेल्या होत्या. घराची चावी शेजाऱ्याकडे असल्याने ती चावी घेऊन दुमे यांच्याकडे काम करणारी मोलकरीण विद्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रेल्वे स्थानकाजवळ अप रेल्वे मार्गावर भुसावळ-सुरत मेमो या धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एक अनोळखी तरुण ठार झाला. ही घटना सोमवार, ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता घडली, या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव रेल्वेस्थानक जवळील रेल्वे खंब्बा नंबर ३०५ जवळ अपलाइन वरील रेल्वे रुळावरून भुसावळ ते उधना मेमो रेल्वे जात असताना तिचा धक्का लागल्याने अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी तरुण ठार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच पारोळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या तीन जणांना वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जितेंद्र भालेराव (वय ३०) वर्षे रा. धरणगाव हा जागीच ठार झाला. हा अपघात महामार्गावर अमळनेर नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळी ७.४५ वाजता घडला. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने रास्ता रोको आंदोलन केले, या आंदोलनामुळे सहा ते सात किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४८, एटी ७६८२ हा ट्रक पारोळ्याकडून येत होता. त्याची धडक एमएच १९ बीके ०४४२ क्रमांकाच्या दुचाकीला बसली. त्यात दुचाकी चालक जितेंद्र भालेराव हा जागीच ठार झाला. धनंजय साठे (वय…

Read More

धुळे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात महिलासह तरुणी आमिषाला बळी पडत विनयभंग सह अत्याचाराच्या घटना घडत आहे. नुकतेच धुळ्यातील एका ४० वर्षीय महिलेला नोकरी लावून देतो असे सांगून ठाणे येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. हा प्रकार २० मे २०२० ते १३ जून २०२३ या कालावधीत घडला. याप्रकरणी भडगाव तालुक्यातील गिरड येथील संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, घरकाम करणाऱ्या या महिलेला त्याने ठाणे येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेतले. तिला शीतपेयामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच, त्याचे व्हिडीओ चित्रण करून ते समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. संशयिताने तिला अहमदाबाद, सुरत येथे तसेच धुळ्यात…

Read More

नवी मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणातून अनेक हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील तुर्भे येथून समोर आली आहे. महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या प्रियकराला होता. यातूनत त्याने तिची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. अमित रवींद्र कौर ( वय 35)असं मृत महिलेचं नाव आहे. मृत महिला एका खासगी बँकेच्या मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. तर शोएब शेख (24) असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. दोघांची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. अमित कौरचा काहीच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी परिसरातील व्ही सेंक्टरमधील सानप पॉलीमर कंपनीसमोर केमीकल पावडर भरलेल्या आयशर ट्रकच्या कॅबीनमध्ये अचानक आग लागल्याची घटना बुधवारी १० जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. ही आग नेमकी कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही, परंतू ट्रकच्या कॅबिनमधील सामान जळून मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव औद्योगीक वसाहत मधील व्ही सेक्टरमधील सानप पॉलीमर इंडस्ट्रीजसमोर आयशर ट्रक क्रमांक (केए ५१ सी ५४९९) हा पार्कींगला लावलेला होता. बुधवारी १० जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ट्रक चालक कुमार परमसेवम रा. सेलम, तामिलनाडू हा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या राजधानीत अनेक गुन्हेगारी घटना घडत असतात, अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय तरुणाची क्रूरतेने हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तरुणावर कुत्रा सोडला होता. नंतर शॉलने त्याचा गळा आवळून चाकूने हल्ला केला. यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. क्रूरतेनं तरुणाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समयपूर येथे गुरप्रीत आपल्या कुटुंबासह राहत होता. आई, बाबा, मोठा भाऊ आणि दोन बहिणी असं सुंदर कुटुंब कायम हसत खेळत आयुष्य जगत होतं. मात्र मुलाच्या निधनामुळे आता त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी गुरप्रीत आणि…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात वाहतूक पोलीसासोबत हुज्जत घालण्याच्या घटना नेहमीच चर्चेत येत असतांना नुकतेच कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका मद्यधुंद तरुणाने पोलिसाशी हुज्जत घालत शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे शिविगाळ करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांने सांगितलं असून याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला होता. तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलिसांनी अडवलं . कागदपत्रांची तपासणी करत या तरुणाने मद्यप्राशन केल्याचं लक्षात आल्याने पोलिसांनी त्याची ब्रेथ एनलायझरने तपासणी सुरू केली. यावेळी या तरुणाने व त्याच्यासोबत…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे क्रिकेट खेळत असताना २९ वर्षीय तरुणाच्या छातीत कळ येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. यात महेश पांडुरंग बर्डे (वय २९) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी गावाजवळच्या मैदानात महेश व त्यांचे काही मित्र क्रिकेट खेळत होते. मात्र, अचानक महेशच्या छातीत दुखू लागल्याने मित्रांनी त्याला तत्काळ सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More