जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथील शेरी शिवारातून २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंप व केबल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. या साहित्याची किंमत जवळपास तीन लाख रुपये आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी सोनाळा येथील २० शेतकऱ्यांकडील कृषी पंप चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर शेरी शिवारातील कृष्णा बोरसे यांच्या शेतातील कृषी पंप व युवराज सोनवणे, दिलीप गोंधनखेडे, ज्ञानेश्वर देशमुख, नाना पाटील, भागवत बनकर, देवीदास पांढरे, शांताराम पाटील, शांताराम सोनवणे, दादाराव सोनवणे यांच्यासह १५ शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाच्या केबल चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे जवळपास तीन ते साडेतीन लाखांचे आर्थिक…
Author: editor desk
बोदवड : प्रतिनिधी पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही आत्महत्या केल्याची घटना बोदवड तालुक्यात साळशिंगी येथे घडली. या घटनेमुळे दोन मुले पोरकी झाली आहेत. या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील साळशिंगी येथील हरतालिका विनोद महाजन (वय ४०) या महिलेने काही ही कारणामुळे चार-पाच दिवसांपूर्वी विष घेतले होते. तिच्यावर जळगाव येथे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान रविवारी ७ रोजी तिचा मृत्यू झाला. सोमवारी या महिलेचे तिसरे होते. हा कार्यक्रम झाल्यावर या महिलेचा पती विनोद सुभाष महाजन (वय ४५) हा घरी कोणास काहीही न सांगता निघून गेला. यानंतर त्याचा तपास लागला नाही. दरम्यान, शुक्रवारी १२ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील एका १०० फुट विहिरीत पुरुष पडल्याचे काही नागरिकांनी शनी पेठ पोलिसांना कळविले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत रेस्क्यु पथक तयार करून विहिरीत पडलेल्या इसमाला जिवंत बाहेर काढल्याने परिसरात पोलीस यंत्रणेचे कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जुना खेडी रोड ज्ञानदेव नगर 100 फुटी रोड जवळ एक पुरूष विहीरीत पडल्याची घटना दिनांक ११ जानेवारी रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे फोनव्दारे नागरिकांनी कळविले होते. याबाबत शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी तात्काळ एक रेस्क्यु पथक तयार करुन त्यात पोउपनि श्री योगेश ढिकले, मुबारक तडवी, सफौ इद्रिस पठाण, पोहेका विजय खैरे, पो.कॉ मुकुंद गंगावणे, नवजीत चौधरी…
नाशिक : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन झालं. यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले कि, भारत लोकशाहीची जननी असून यात तरुणांच मोठं योगदान आहे. देशातील तरुण तरुणींनी यापुढेही लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे घराणेशाहीला लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे. या प्रक्रियेत तरुणांचा जेवढा सहभाग जास्त असले तितकं देशाचं भविष्य उज्ज्वल असेल. देशाचं भविष्य असलेल्या या तरुण पिढीने येणाऱ्या काळात ही जबाबदारी स्वीकारावी, असं आवाहन पंतप्रधान…
मुंबई : वृत्तसंस्था देशभरात अनेकवेळा लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटना उघडकीस येत असतांना नुकतेच मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाळ चोरी करणाऱ्या महिलेला मालवणी परिसरातून अटक केलीये. तसेच बाळाला सुखरुप आईकडे सुपूर्द केलंय. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कांदिवली परिसरात राहणाऱ्या महिलेची 25 दिवसांपूर्वी कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात प्रसूती झाली. तिला मुलगा झाला मात्र बाळाचे वजन कमी आणि अशक्त असल्याने त्याच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. याच दरम्यान मालवणी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने प्रसूती झालेल्या महिलेची दिशाभूल…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ग्रामीण भागातून अवैध वाहतूक सुरु असतांना नुकतेच नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चंद्रपूर नागपूर मार्गावर गांजाने भरलेला कंटेनर जप्त केला आहे. तब्बाल ५० लाखांच्या गांजा पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज पहाटे चंद्रपूर नागपूर मार्गावरून ट्रक निघाला होता. यावेळी पोलिसांना ट्रकमध्ये गांजा लपवून नेत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून ५० लाखांच्या गांजासह ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालकाच्या कॅबिनमध्ये वेगळा कप्पा तयार करून हा गांजा लपवून नेला जात होता. आज पहाटेच पोलिसांनी हा ट्रक थांबवत तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका महाविद्यालयाच्या परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.११ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयाच्या परिसरातून या अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने पळवून नेल्याची घटना उघड झाल्यानंतर परिवारातील सदस्यांनी अनेक ठिकाणी शोध घेतला पंरतु मिळून न आल्याने भडगाव पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मानराज पार्कजवळ परिसरात शतपावली करतांना मोबाईलवर बोलत असलेल्या प्रौढाचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी लांबवल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. जिल्हापेठ पोलिसांनी तपासचक्रे फिरवित लागलीच संशयित गजानन उर्फ बबन प्रकाश कोळी (वय १९, रा. शिवकॉलनी) याला अटक केली असून त्याच्या दोघ साथीदारांचा शोध घेत आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेला मोबाईल व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहराती मानराज पार्कमधील दौप्रदी नगरात सुमित एकनाथ भामरे (वय ५७) हे वास्तव्यास असून ते जनता बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहे. दि. १० रोजी बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर भामरे हे फोनवर बोलत शतपावली करण्यासाठी निघाले. अॅक्सीस बँकेकडून ते…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आयएमआर महाविद्यालयाजवळ गाडी अडविल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने चौघांकडून ट्रॅव्हल्स चालकाला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना दि. ९ जानेवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कापुर नेथील शेख वसीम (वय २८) ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून काम करतात. दि. ९ जानेवारी रोजी ते (एमएच १९ सीवाय ५२२२) क्रमांकाची ट्रॅव्हल्स घेवून आयएमआर महाविद्यालयाजवळून पुणे जाण्यासाठी निघाले. यावेळी सुनिल जगन तेली, तेजस सुनिल तेली, वरुन सुनिल तेली (सर्व रा. कोल्हे हिल्स) व आकाश संजय पाटील (कोल्हे हिल्स) यांनी चौघांनी शेख वसीम यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथे एका ५ वर्षाच्या बालकाच्या डोक्यावरून स्कूल बसचे चाक गेले. या घटनेत बालकाचा जागीच मृत्यू झाला. हर्षद अनिल हातांगळे असे मृत बालकाचे नाव आहे. या दुर्देवी घटनेनंतर बालकाचे कुटुंब शाेकसागरात बुडाले. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद याच्या डाेक्यावरुन तब्बल दोन वेळा चाक गेले. त्यातच तो चिरडला गेला. त्यामुळे निष्पाप हर्षदचा जीव गेला. यावेळी घटनास्थऴी माेठा जमाव जमला हाेता. हर्षद हातांगळे याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती कळताच त्यांच्या पायाखालची वाऴू सरकली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.

