चोपडा : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून नेहमीच अल्पवयीन मुलींचे विनयभंग व अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच चोपडा तालुक्यातील अवघ्या दोन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी संशयित लोटन पाटील (वय ५६) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लोटन पाटील याने अवघ्या दोन वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला तत्काळ अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे हे करीत आहेत.