मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात नेहमीच काही ना काही धक्कादायक घटना समोर येत असतांना नुकतेच उल्हासनगर शहरात एक हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. सार्वजनिक महिला शौचालयात एका दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. बाळाला परिसरातील नागरिकांनी शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कैंप नंबर ४ सुभाष टेकडी परिसरातील आम्रपालीमगर येथील सार्वजनिक आज सकाळच्या सुमारास एक महिला शौचालयास गेली होती. तेव्हा तिला शौचालयात एक बाळ असल्याचे दिसले. महिला घाबरून शौचालयाच्या बाहेर आली आणि परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी बाळाला शौचालातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्नालयात दाखल केले. सदर घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. यानंतर आजूबाजूच्या परिसरात चौकशी करत नवजात बाळाच्या आईचा शोध सुरु केला आहे.