चोपडा : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गावठी पिस्तूलवर मोठी कारवाई सुरु असतांना नुकतेच बोरज अजटी फॉरेस्ट नाक्यासमोर १३ हजर रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस बाळगणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुण शुभम प्रकाश सूर्यवंशी याच्याकडे १३ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस घेऊन फोरेश्ट नाक्या समोर आढळून आला. त्याला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. तपास सपोनि शेषराव नितनवरे करीत आहे.