Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी शनिवार, १३ जानेवारीला काढले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षकांचा समावेश असून, यातील पाचजण जिल्ह्याच्या बाहेर जाणार असून, तीन अधिकारी जिल्ह्यात अकार्यकारी अधिकारी पदावर (‘साईड ब्रैच’) राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मार्च, एप्रिलमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर शनिवारी नाशिक परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. नवीन अधिकारी आल्यानंतर त्यांना सोमवार किंवा त्यानंतर पोलिस ठाणे मिळू शकेल. ज्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून पुढील आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहे. महानिरीक्षकांच्या नंतर…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी येथील पोलीस स्थानकामधील एका हेडकॉन्स्टेबल असलेल्या पोलिसाने आपल्या ‘कस्टडी’तील मुद्देमालावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याने सोने, चांदीचे दागिने आणि १२ लाखांची रक्कम घेत पोबारा केला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात हेकॉ. यशवंत भिका घोरसे (वय ५२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा पोलिस ठाण्यात यशवंत घोरसे हा कार्यरत होता. मुद्देमाल कारकून म्हणून त्याच्याकडे जबाबदारी होती. कस्टडीत असलेल्या १०२.९३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६.४६४ किलोग्रॅम चांदीचे दागिने व १२ लाख ३७ हजार ५७७ रु. रक्कम घेत संशयित पसार झाला. दरम्यान, यशवंतचा भाऊ सुनील घोरसे याने या मुद्देमालापैकी ७३.६३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६.४६४ किग्रॅ चांदीचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दिनांक १२ जानेवारी रोजी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ साहेब व युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरा व क्रीडा आघाडीच्या वतीने जळगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे 12 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान नमो चषक 2024 चे आयोजन करण्यात आले असून आज या नमो चषकच्या स्पर्धे अंतर्गत कबड्डी, क्रिकेट,आट्यापाट्या, वकृत्व स्पर्धा या स्पर्धेचं नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले. जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) व भाजपा जिल्हाध्यक्ष, उज्वला ताई बेंडाळे यांनी स्पर्धकांशी संवाद साधला व त्यांना प्रोत्साहित केले आणि युवा दिनाच्या…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील १२ वर्षीय दिव्यांग अल्पवयीन बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना दि.२२ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरण संशयित हसन खॉ अमीर खा बेलदार (वय ६५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील एका परिसरात १२ वर्षीय दिव्यांग अल्पवयीन बालिका परिवारासह वास्तव्यास असून ती गल्लीत खेळत असताना संशयिताने २२ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता एका रीक्षेत नेत तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडीतेच्या आजोबांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यावरून पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.

Read More

एरंडोल : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागासह शहरात वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढली असून कारवाईसाठी गेलेल्या एरंडोल प्रांताधिकाऱ्याना खाली पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना धक्कदायक प्रकार घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाणपासून अवघ्या 17 किलोमीटरवरील उत्राण येथील गिरणा नदीपात्रात मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी, भालगावचे मंडळ अधिकारी दीपक ठोंबरे, तलाठी शेख शकील, निपाणीचे तलाठी विश्‍वंभर शिरसाठ, पोलीसपाटील प्रदीप तिवारी, महाजन आदींचे पथक उतरले. तेथे 8 ते 10 ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे दिसून आले. पथकाला…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ विद्यार्थ्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला आहे. हि घटना नांदेडच्या भोकर तालुक्यात घडली आहे. मुंबई-निर्मल राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी येथे अज्ञात वाहनाची धडक मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ विद्यार्थ्यांना बसली. या धडकेत दोन्ही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ग्रामीण भागासह शहरी भागात अल्पवयीन मुलीवर विनयभंग, अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ५० वर्षीय व्यक्तीने मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग आणि दोन वेळा गैरवर्तन केलं. आपल्या मुलीला झालेला त्रास लक्षात येताच तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपी काका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलगी तिच्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती. यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत काकाने तिच्याशी गैरवर्तण केलं. त्यामुळे मुलगी सतत घाबरून राहत होती. काकाने अतिप्रसंग आणि गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याने ती कुणाशीच काही बोलत नव्हती. आपल्या…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यभरात मनोज जरांगे पाटलांच्या सभेनंतर आता ओबीसीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या सभेचा धडाका सुरु आहे. आता बीडमध्ये आज ओबीसींची जाहीर महाएल्गार सभा होत आहे. या सभेमुळे छगन भुजबळांची तोफ बीडमध्ये धडाडणार असून सभेसाठी मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेत्या पंकजा मुंडे, ओबीसी जयदत्त क्षीरसागर यांच्यासह अन्य ओबीसी नेत्यांना आयोजकांनी निमंत्रण देखील दिलं आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर ही जाहीर सभा होत आहे. या सभेची तयारी आता पूर्ण झालीये. जवळपास 40 बाय 80 चे भव्य स्टेज उभारले असून 50 हजार खुर्च्या टाकून मैदान देखील तयार करण्यात आले आहे. तर याच सभास्थळाच्या मैदानाच्या परिसरामध्ये मोठमोठे होर्डिंग…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला २३ डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणखीच आक्रमक झाले आहेत. सरकारने तातडीने आरक्षणावर निर्णय घ्यावा, अन्यथा २० जानेवारीला मुंबईत येऊन मोठं आंदोलन करू, असा इशाराच जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नका, अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे. इतकंच नाही, तर कोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलंच फटकारलं देखील आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. २० जानेवारीला मुंबईत ३ कोटींहून अधिक मराठा बांधव धडकणार असल्याचं जरांगे म्हटलं आहे. आरक्षणाशिवाय…

Read More

हावेरी : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या अनेक घटना उजेडात येत असतांना अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला केल्याप्रकरणी पीडित महिलेने सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने स्वतःचा एक व्हिडीओ जारी केल्यानंतर तो सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओनुसार, महिला सांगते की, सहा जण जबरदस्तीने हॉटेलच्या खोलीत घुसले आणि आधी मारहाण केली. मग ते तिला जंगलात घेऊन गेले. तेथे सहा आरोपींसोबत आणखी एकाने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी तिला कारमध्ये बसवून शहरभर फिरवले. महिलेच्या आरोपांवर पोलिसांनी सांगितले की, त्यांना यापूर्वी बलात्काराची माहिती देण्यात आली नव्हती. हावेरीचे एसपी…

Read More