जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात महावितरणचे कंत्राटी वायरमन असलेले प्रशांत विकास जगताप (वय ३३) याने तब्बल १ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील ५३ वर्षीय तक्रारदार यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून त्यांनी घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला MSEB जळगांवच्या पथकाने भेट दिली होती. या भेटीनंतर त्यांना आता ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची…
Author: editor desk
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था मुंबई- जालना ताशी १०० कि.मी.च्या वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका बोगीत अचानक सायरन वाजू लागतो आणि काही अंतरावर जाऊन ही रेल्वे उभी राहते. आगीच्या भीतीने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडते; परंतु हा सगळा प्रकार सिगारेटच्या धुरामुळे झाल्याचे स्पष्ट होते आणि प्रवासी सुटकेचा नि:श्वास सोडतात. नाशिक रेल्वे स्टेशन काही अंतरावर असताना मंगळवारी दुपारी ४:३० च्या सुमारास ही घटना घडली. मुंबईहून रवाना झाल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस नाशिक रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती. तोच सी-५ या बोगीतील सायरन जोरजोराने वाजू लागला. तिकीट निरीक्षक, रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोगीत येऊन विचारपूस केली. काहीही माहिती मिळत नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. तेव्हा एका प्रवाशाने…
पारोळा : प्रतिनिधी येथील न्यायालयाने विनयभंग करणाऱ्या गुन्हेगारास एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. हा गुन्हा २०१७मध्ये झाला होता, मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजी भिला चव्हाण (३८, दळवेल तांडा) याने एका महिलेचा विनयभंग केला होता. त्या गुन्ह्याची सुनावणी न्यायमूर्ती एम. एस. काझी यांच्यासमोर पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. पी. बी. मगर यांनी युक्तिवाद केला, गुन्ह्याचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण शिंदे यांनी केला होता.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना पक्षातील आमदारांवर उद्या सुनावणी होणार आहे. या आमदार अपात्रेतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील. राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थीर राहणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीनंतर मालदीव आणि लक्षद्वीप या पर्यटन स्थळांची जोरदार चर्चा होत आहे. मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या फोटोंवर मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने हे प्रकरण चांगलेच पेटले. यादरम्यान आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. फडणवीसांनी हे मालदीव नव्हे म्हणत कोकणातील फोटो शेअर केले आहेत. देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीमध्ये भारतीय…
कोल्हापूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील ठाकरे गट अनेक अडचणीत असतांना पुन्हा एकदा ठाकरे गटाचे तालुकाध्यक्षाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुकाध्यक्षाच्या पराक्रमामुळे कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या अस्मितेला धक्का लागला आहे. एक लाखाला तीन लाख रुपये बनवून नोटा छापून देण्याचा प्रकार तालुकाध्यक्षांने सुरू केला होता. या प्रकरणी पाेलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीचा सूत्रधार अशोक बापू पाटील (वय ५१, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल) हा आहे. त्याच्यासह मेहरूम अल्ताफ सरकवास (वय ४१) आणि सलील रफिक सय्यद (वय ३०, दोघे रा. घटप्रभा, जि. बेळगाव, कर्नाटक) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाखाची रोकड आणि नोटा…
बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ग्रामीण भागात व शहरात स्त्री भ्रूणहत्येच्या घटना नेहमीच घडत असतांना नुकतेच बीडच्या परळीमध्ये पुन्हा एकदा मुलीला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ८ महिन्यांच्या मुलीला अनोळखीने पोत्यात गुंडाळून परळीपासून 6 किलोमीटर अंतरावर मालेवाडी रोडवर फेकून दिलं. परिसरातील एका व्यक्तीने याविषयी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या 8 महिन्याच्या चिमुकलीचे प्राण वाचले आहेत. सध्या या चिमुकल्या मुलीवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने फोन करून माहिती दिली की, मालेवाडी रोड लगत एका मुलीला पोत्यात गुंडाळून फेकलं आहे. मात्र हे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेनेच्या शिवसेनेच्या ठाकरे की शिंदे, कुणाचे आमदार अपात्र होणार? यावर उद्या म्हणजेच बुधवारी (१० जानेवारी) जाहीर होणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. अशातच अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक गंभीर आरोप केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणखी वेळकाढूपणा करतील, उद्या रात्री ११:५९ पर्यंत वेळ खेचतील मग निकाल जाहीर करतील, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. न्यायमूर्तीच आरोपीला भेटत असतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची, असा खोचक सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. न्यायाधीश आणि…
नागपूर : वृत्तसंस्था देशभरातील अनेक शहरात नवजात शिशुना अनेक ठिकाणी फेकल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच नागपूर शहरातून अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबधातून २१ वर्षीय तरुणी गर्भवती झाली. तिने बाळाला जन्म दिला. मात्र, बदनामीच्या भीतीने तिने बाळाला उकिरड्यावर फेकून दिलं. थंडीचा कडाका असल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत निर्दयी मातेला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणी मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तरुणी गर्भवती झाली. गावात बदनामी होईल आणि कुटुंबीय…
सोलापूर : वृत्तसंस्था माढा तालुक्यातील पडसाळी येथे चारशे रुपयांच्या देवाणघेवाणीवरून चाळीस वर्षीय महिलेला तिघांनी रस्त्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला ५० टक्के भाजली असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शोलेबाई समिंदर काळे (रा. भेंड ता माढा) असे पिडीत महिलेचे नाव आहे. मीना संज्या काळे, मंगल पवार, दीपक पाटील (सर्व रा. कुर्मदास साखर कारखाना पडसाळी ता. माढा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोलेबाईकडून आरोपी मीना संज्या काळे, मंगल पवार यांच्याकडून ४०० रुपये येणे होते. पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस या अगोदरही शिवीगाळ केली होती. घटनेच्या वेळी दोन्ही आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यात एका २६ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एका विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहरातील एका परिसरात २६ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून गेल्या जून २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ या दरम्यान गावातील एका तरुणाने विवाहीतेचा अंघोळ करताना बाथरूम मधील व्हिडीओ काढून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तर विवाहितेच्या मुलाला उचलून नेण्याची व नवऱ्याला मारून टाकण्याची धमकी देवून फिर्यादीच्या घरात घुसून तीन ते चार वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून धरणगाव शहर पोलिसात एका तरूणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…

