मुंबई : वृत्तसंस्था
शहरातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात खिलाफत इंडियाच्या ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली असून खिलाफत इंडियाच्या मेलवरून आरबीआय कार्यालयासहित एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेतही बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. या धमकी सत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या महितिन्सुअर, मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेलय आयडीवरुन ही धमकी देण्यात आलीय. आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. आरबीआयच्या ई-मेल आयडीवर आज सकाळी साडेदहा वाजता ई-मेल आला होता. या ई-मेलमध्ये आज दुपारी दीड वाजता मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट होतील. आम्ही मुंबईतील 11 ठिकाणी हे बॉम्ब ठेवले आहेत, अशी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती.