जळगाव : प्रतिनिधी सोशल मीडियावरील स्नॅपचॅटवर बनावट खाते तयार करुन त्यावर मुलीचा चेहरा लावून अधिल फोटो व्हायरल केले. ही घटना दि. २३ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील एका गावात ४८ वर्षीय शेतकरी वास्तव्यास आहे. दि.७ जानेवारी ते दि. २३ जानेवारी पर्यंत अज्ञात इसमाने त्या शेतकऱ्याच्या मुलीच्या नावाने स्नॅपचॅटवर बनावट खाते तयार केले. त्यावर मुलीचा चेहरा असलेला अश्लील फोटो तयार करुन तो सोशल मीडियावर व्हायरल करीत तीची बदनामी केली. हा प्रकार उघडकीस येताच शेतकऱ्याने सायबर पोलिसात तक्रार दिली, त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुने जळगाव भागातील कोल्हे वाड्यात एका परिचारिकेच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून संपूर्ण संसारोपयोगी वस्तू आणि काही रक्कम जळून खाक झाल्याची ही घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. सकाळच्या वेळी घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुने जळगाव भागातील कोल्हे वाड्यातील शीतल मराठे यांच्या घराला आग लागल्याचे कळताच, माजी नगरसेवक कमलाकर बनसोडे यांनी गल्लीतील लोकांसोबत आग विझविण्यासाठी धाव घेतली. गल्ली अरुंद असल्याने अग्निशमन विभागाचे वाहन या भागात येऊ शकत नसल्याने, स्थानिक नागरिकांनी बादलीने पाणी टाकत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत घरातील बरेच साहित्य आगीत जळून खाक झाले होते. यावेळी अग्निशमन दलाचे…
अमळनेर – प्रतिनिधी तालुक्यातील निम येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना विविध विषयांवर प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले जात असून नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी त्याठिकाणी दाखल झाले आहेत. या कृषिदूतांमध्ये भावेश अनिल सावंत ,प्रल्हाद अशोक आवारे, यश मोतीलाल माळी ,भावेश अरून पाटील ,मनीष अरून पाटील ह्यांचा समावेश असून त्यांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव योजना कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण केले. सरपंच भगवान भिल, उपसरपंच राजेंद्र चौधरी, ग्रामसेवक – जगदीश पाटील,शेतकरी महेश पाटील, स्वप्नील पाटील, घनश्याम पाटील, प्रताप पाटील यांनी कृषिदूतांचे स्वागत केले. कृषिदूतांनी पीक लागवड पद्धती, आधुनिक शेतीची माहिती, माती व पाणी परीक्षण, कीड आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, शेतीविषयक…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव – शिरसोली रस्त्यावरील एका मॉलमध्ये ग्राहकांमध्ये छेडखानीच्या संशयावरून झालेल्या वादातून, मॉलवर एका गटाकडून दगडफेक झाल्याची घटना बुधवारी संध्या. ७.३० वाजेच्या सुमारास घडली, या वादामुळे शिरसोली रस्त्यालगत काही काळ तणाव निर्माण झाला होता. रामानंदनगर पोलिस ठाण्यात परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.२४ रोजी संध्या. ७.१५ वाजता एका मॉलमध्ये एक शासकीय कर्मचारी पत्नी व मुलीसोबत खरेदी करत असताना, त्याच वेळी काही मुली आपल्या आईसोबत खरेदी करत होत्या. समोरच्या ग्राहकाने मुलीकडे पाहिले या संशयावरून संबधित मुलीने त्या पुरुष ग्राहकाला विचारणा केली. त्यातून वाद व दगडफेक झाली. या घटनेत एक पोलिस जखमी झाला.
हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच हिंगोलीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भर रस्त्यात गळा चिरून एक युवकाची हत्या करण्यात आली असून रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला आहे. पोलिसांना घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतलीये. मिळालेल्या माहितीनुसार, आंबा चोंढी फाट्याजवळ ही घटना घडली आहे. एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांनी येथे धाव घेतली. राहुल गवळी रा. जुनोना असं खून झालेल्या मयत तरुणाचं नाव आहे. खूनाचे कारण अद्याप आस्पष्ट आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायरान जमिनीच्या कारणावरून दोन गटात तेढ निर्माण होऊन तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेत एका तरुणावर वार करण्यात आला.…
पालघर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह तरुणीसोबत विनयभंग व अत्याचाराच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच पालघर जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मोबाईलमधील अश्लील फोटो दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला हाेता. त्यानंतर तारापूर पोलीसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई केली. मिळालेल्या माहितीनूसार एका शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईल मधले अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने संबंधित विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केले. त्याबाबतची तक्रार विद्यार्थिनीने तारापूर पोलीस ठाण्यात दिली. पाेलिसांनी घटनेचा तपास करीत संबंधित शिक्षकावर कलम 354 सह पाेक्साे कायदा…
वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शासकीय कार्यालयात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढ झाली असून नुकतेच वर्धामध्ये देखील लाच घेताना एका महिलेला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. मंजूर विहिरीच्या उर्वरित रकमेचा धनादेश देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना बोदड येथे ग्रामसेवक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना (वय ४३) असं आरोपी ग्रामसेवीका महिलेचं नाव आहे. देवळी तालुक्यातील बोदड येथील एका शेतकऱ्यास मनरेगाअंतर्गत सिंचन विहीर मंजूर झालीये. विहिरीकरिता मंजूर उर्वरित रकमेचा धनादेश देण्यासाठी ग्रामसेविका अर्चना किसनराव बागडे यांनी तक्रारदार शेतकऱ्यास दोन हजार रुपयांची मागणी केली. त्या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ठरल्याप्रमाणे मंगळवारी दोन हजारांची लाच…
जळगाव : प्रतीनिधी जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम देत माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील आणि त्यांची कन्या डॉ. केतकीताई पाटील आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील व देवेंद्र मराठे यांचे कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. यानंतर डॉ. उल्हासदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर टिकास्त्र सोडले होते. याप्रसंगी त्यांनी स्पष्टपणे आपली कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार असून आपण देखील लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. या अनुषंगाने आज मुंबईत प्रवेश सोहळा पार पडला. यात डॉ. उल्हासदादा पाटील, डॉ. केतकीताई पाटील, देवेंद्र मराठे…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर एक एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटे २ 2.30 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण निर्मल महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाटया जवळ पहाटेच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. रोहित पवार यांच्या समर्थनात शरद पवार गटाने शक्तीप्रदर्शन केलं आहे. शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जमले आहेत. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे. रोहित पवार सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत ईडी कार्यालयात पोहोचणार आहे. रोहित पवार यांची ईडी चौकशी संपेपर्यंत शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयातच बसून राहणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे स्वत: रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. रोहित पवार यांनीदेखील ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे.

