जळगाव : प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यात सोनसाखळी लांबविणाऱ्या चोरट्याला सोमवारी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलिसांनी सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली आहे. प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे (वय-३१, रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषराव खैरे (वय-६५) या वृद्ध महिलेची रविवारी सकाळी ११ वाजता खामगाव शहरात पायी जात असताना दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन धूमस्टाईल लांबवल्याची घटना घडली होती. या संदर्भात खामगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार बुलढाणा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल नीलसिंग चव्हाण यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत संशयित आरोपी प्रशांत साबळे…
Author: editor desk
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील ऐनपूर येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन सोमवारी दुपारी त्याचे पर्यवसान दंगलीत झाले. दोन्ही दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षक व एक पोलिस यांचासह एकूण ७ जण जखमी झाले. या प्रकरणी २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी सकाळी गावातील बसस्थानकाजवळ दोन्ही गटांतील लोक समोरासमोर आले तेंव्हा काही जणांमध्ये वाद झाला. या वादातून तुफान दगडफेक सुरू झाली. याची – माहिती मिळताच बसस्थानक आवारात पोहोचलेल्या पोलिसांपैकी निंभोरा येथील फौजदार तुषार पाटील आणि रावेर येथील हे.कॉ. ज्ञानेश्वर चौधरी हे जखमी झाले. ज्ञानेश्वर चौधरी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे दोन्ही गटांतील एकूण २१…
धुळे : वृत्तसंस्था तालुक्यातील अकलाड मोराणे येथील एका निवासी शाळेत केतन विनायक मोरे नावाच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्या परिस्थितीअभावी पालकांनी त्याला स्पर्धा परीक्षेस नकार दिल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केतन याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी व्हायचे होते. त्याने वडिलांना ही बाब बोलून दाखविली होती. परंतु, आपल्याला स्पर्धा परीक्षेचा खर्च झेपणार नाही, असे वडील म्हटल्याची बाब मनाला केतनने लावून घेतली. रविवारी सकाळी शाळेतील वसतिगृहाच्या बाथरूममध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.
नंदुरबार : वृत्तसंस्था सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसवर रविवारी मध्यरात्री नंदुरबारनजीक दगडफेक झाल्याची घटना घडली. रेल्वे पोलिस आणि नंदुरबार शहर पोलिसांनी शोधमोहीम राबविल्यावर दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी एक जण मनोरुग्ण असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसऱ्याला चौकशी करून सोडून देण्यात आले. या घटनेची लोहमार्ग पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११ ताजता नंटरबार स्थानकाच्या अलीकडे एक किलोमीटर अंतरावर आली असता एका डब्यावर काही दगड आदळले. यामुळे प्रवासी भयभीत झाले. पुढे नंदुरबार स्थानकावर महामार्ग पोलिसांनी दगड आदळलेल्या कोचची पाहणी केली. त्यानंतर महामार्ग पोलिस, नंदुरबार शहर, उपनगरचे पोलिस घटनास्थळाकडे रवाना झाले. त्या भागात शोधमोहीम हाती…
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या लवकरच बिगुल वाजणार असल्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचे भाजपा व शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रणशिंग एकाच दिवशी फुंकणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची चुरस पहावयास मिळणार आहे. निवडणुकीसाठी आतापासूनच जळगाव जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून मोर्चा बांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे 15 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदारसंघात आतापासूनच निवडणुकीचे पूर्वतयारीसाठी लगबग सुरू झालेली दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव दौरा हा महत्त्वाचा ठरणार आहे. जळगाव येथे क्लस्टर बैठक घेतली जाणार असून…
जळगाव : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे गेल्या दीड वर्षापासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेऊन राजीनामा दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. ते आज भाजपात प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ व वरिष्ठ नेते तसेच गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची चर्चा गेल्या दीड वर्षापासून सुरू होती. नांदेड जिल्हा हा अशोक चव्हाण व काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अशोक चव्हाण हे भाजपामध्ये सोबत जाणार असल्याची चर्चा होती. आज विधानसभा अध्यक्ष…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील २३ वर्षीय गृहिणी बाजारात आली असता दोघांनी नशेत असतांना तिचा हात पकडून तुला तोंड दाखवायच्या लाईकीची ठेवणार नाही म्हणत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जळगावातील मुख्य चौकात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकाला दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत २३ वर्षीय गृहिणी वास्तव्यास असून दि.८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गृहिणी फुले मार्केट परिसरात बाजार येत असतांना दोन इसमांनी तिचा पाठलाग करीत दुपारी ४ वाजेच्या सुमारास महिलेला शहरातील मुख्य चौकात दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी महिलेचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तर…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहर गुन्हेगारीच्या माध्यमातून मोठ्या चर्चेत येत असताना नुकतेच पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खूनाची घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईचा खून केला आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खडकी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत ५५ वर्षीय आईचा मुलाने निर्घुन पद्धतीने खून केला आहे. ज्ञानेश्वर असं आरोपी मुलाचं नाव आहे. आईला संपवल्यावर त्याने घरातून पळ काढला असून तो फरार आहे. गुंभाबाई शंकर पवार असं मृत आईचं नाव आहे. आपल्या पोटच्या मुलाला वाढवताना लहानाचं मोठं करताना हा दिवस कधी पहावा लागेल याचा तिने विचारही केला नसेल. मुलाने आईची हत्या आपल्या राहत्या घरात केली.…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला आहे. गहू, हरभरा, तूर या पिकाला गाटपीटीचा चांगलाच तडाखा बसला आहे. बळीराजा पुन्हा एकदा हवालदील झाला आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका हा विदर्भाला बसला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावली आहे. पावसासोबतच काही भागांमध्ये गारपीट देखील झाली. हरभरा, गहू, तूर, भाजीपाला आणि फळबागांना या गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला असून, ऐन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वर्धा जिल्ह्यात…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी डोकेवर काढत असतांना नाशिक शहरात देखील मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढू लागली आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादाचा बदला घेताना तिघांनी एका रिक्षाचालकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याचा निर्घुण खुन केला. शंकर गाडगीळ (वय ३५, रा. घरकुल वसाहत, नाशिक) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चुंचाळे भागात शनिवारी रात्री पावणे बारा वाजता घडली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. सोनु नवगिरे, सोनू कांबळे आणि महेंद्र कांबळे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक शंकर गाडगीळ आणि आरोपी यांच्यात शनिवारी दुपारी किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी हा वाद मिटला.…

